Shivneri Fort Information in Marathi

Shivneri Fort Information in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्राचे जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.त्या शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information in Marathi या लेखात मी लिहिली आहे.शिवाजी महाराजांचे संपूर्ण बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले.छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब जनतेसाठी अपार मेहनत घेतली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी आपले संपूर्ण जीवन बहाल केले.त्याच्यांमूळेच आज आपण ताठ मानेने आणि स्वातंत्र्यपणे जगत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यात अनेक किल्ले होते त्यापैकी एक शिवनेरी किल्ला त्या शिवनेरी किल्ल्याची माहिती मराठी माणसाला असली पाहिजे आणि कधीतरी शिवनेरी किल्ला बघण्यासाठी गेलं पाहिजे.शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि इतर अनेक गोष्टी बघायला मिळतात.

Shivneri Fort Information in Marathi

Shivneri Fort Information in Marathi

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचा‌ जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता.शिवनेरी किल्ला हा‌ महाराष्ट्रा‌तील एक महत्त्वाचा किल्ला आहे.शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे संपूर्ण बालपण गेले.शिवनेरी किल्ला हा दुर्ग प्रकारातील किल्ला आहे.१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता त्यामुळे या गडाला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे.महाराष्ट्र राज्यातील पूणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला आहे.पूणे पासून शिवनेरी किल्ल्याचे अंतर १०५ किलोमीटर आहे.

शिवनेरी हा किल्ला १७ व्या शतकात यादवांनी सुमारे ३५०० फूट उंचीवर नाणेघाट डोंगरावर बांधला होता.शिवनेरी किल्ला हा किल्ल्याच्या चारही बाजूंनी चढायला कठीण आहे.या‌ किल्ल्याला चारही बाजूंनी उंच व कठीण चढाव असल्यामूळे याला सर करून जाणे अशक्य आहे त्यामुळे या किल्ल्याला जिंकणे थोडे कठीण आहे.शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आणि जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील प्रतिमा आहेत.शिवनेरी किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडी सारखा आहे.भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहरात आहे त्यामुळे या ठिकाणी हून गड स्पष्टपणे दिसतो.

डॉ. जॉन फ्रायर हे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांनी १६७४ साली शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती. त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे त्या पुस्तकात, या किल्ल्यावर एक हजार कुटुंबांना सुमारे ७ वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

इसवी सन ११७० ते १३०८ पर्यंत पूणे जिल्ह्यावर चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे राज्य होते.याच कालखंडात नाणेघाट टेकडीवर यादवांनी शिवनेरी किल्ला बांधला.इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला.१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली.

पुढे १५९५ मध्ये अहमदनगरच्या सुलतानाने छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे आजोबा मालोजी भोसले यांना हा किल्ला भेट म्हणून दिला होता. त्यानंतर शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला.छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. १६५० पर्यंत शिवनेरी किल्ला हा मराठ्यांचा ताब्यात होता नंतर परत तो मुघलांच्या ताब्यात गेला..स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले.

पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.सन १० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला.१८२० मध्ये इंग्रज-मराठा युद्धानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.१५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर परत तो भारत सरकारच्या अधिपत्याखाली आला.भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

शिवाई देवी मंदिर

शिवनेरी किल्ल्यावर प्रसिद्ध शिवाई देवीचे मंदिर आपल्याला पहायला मिळते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर मुख्य मार्गापासून डावीकडे वळाल्यावर पाचव्या दरवाजातून आत जाऊन पुढे शिवाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. हे मंदिर म्हणजे मोठ्या खडकामध्ये खोदलेल्या सहा ते सात मोठ्या गुहाच आहे. या मंदिरामध्ये शिवाई देवीची मूर्ती पाहावयास मिळते.शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी शिवाई देवीला नवस केला होता मला जर शूरवीर पुत्र झाला तर मी तुझे नाव ठेवीन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ही शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवण्यात आली.

बदाम तलाव

शिवनेरी किल्ल्यावर बदाम आकाराचा एक तलाव आहे व तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजमाता जिजाऊंचे स्मारक देखील आहेत हा तलाव बदाम आकाराचा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी व राजमाता जिजाऊ यांनी या तलावाला बदाम तलाव असे नाव दिले.

गंगा जमुना पाण्याचे झरे

गंगा जमुना पाण्याची दोन झरे शिवनेरी किल्ल्यावर आहेत व दोन गंगा जमुना पाण्याच्या टाक्या देखील आहेत पर्यटक‌‌ ते  पाणी पिण्यासाठी वापरू शकतात.

अंबरखाना

किल्ल्यावर प्रवेश केल्यावर जर मागच्या दाराने तुम्हीं प्रवेश केला तर तुम्हांला अंबरखाना‌ बघावयास मिळतो. तेव्हा त्या काळी अंबर खाण्याचा उपयोग अन्नधान्य साठवणुकीसाठी केला जात असे.

शिवकुंज

शिवनेरी किल्ल्यावर ते शिवकुंज पहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यावरील हे एक अप्रतिम स्मारक आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या शिवकुंज स्मारकाची स्थापना केली. या वास्तूचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले.

शिवाजी महाराजांचा जन्म झालेला वाडा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या वाड्यात झाला तो वाडा २ मजली आहे आणि आता पण ही इमारत चांगल्या स्थितीत आहे.खालच्या मजल्यावर शिवाजी महाराजांचा पाळणा दिसून येतो.आजबाजूला पण इमारतींचे अवशेष दिसून येतात.

कडेलोट टोक

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कडेलोट टोक तयार केले होते.या कडेलोट टोकाची‌ उंची जवळ जवळ १५०० फूट आहे.

महादेव‌ कोळी चौथरा

मोगलांनी महादेव कोळ्यांचा पराभव करण्यासाठी शिवनेरीला वेढा टाकला त्यात महादेव कोळींचा पराभव झाला. मोगलांनी  महादेव कोळ्यांचे अतोनात हाल केले नंतर  माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात.

शिवनेरी किल्ल्यावरचे दरवाजे

शिवनेरी किल्ल्यावर वरच्या माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत जायला सात दरवाजे लागतात.

महादरवाजा

पीर दरवाजा

परवानगीचा दरवाजा

हत्ती दरवाजा

शिपाई दरवाजा

फाटक दरवाजा

कुलूप दरवाजा

शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा

साखळी वाट

जुन्नर शहरात पोहचल्यावर नव्या बसस्टँड समोरच्या रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. चार रस्ते येथे एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या मार्गाने साधारणपणे एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या  बाजूच्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी‌‌ गडाच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या मदतीने आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर पोहचता येते. ही वाट  थोडी कठीण असून गडावर पोहचण्यास साधारणपणे पाऊण तास लागतो.या वाटेला साखळी वाट असेही म्हणतात.

सात दरवाज्यांची वाट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या मार्गाने चालत गेल्यावर एक डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यासाठी साधारणपणे दीड तास लागतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला‌ Shivneri Fort Information in Marathi या लेखातील मी लिहिलेली शिवनेरी किल्ल्याची माहिती नीट समजली असेल असे मी गृहीत धरतो . तुम्हीं ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेयर करा ही नम्र विनंती.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

शिवनेरी किल्ला महाराष्ट्रा राज्यातील पूणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी आहे.

शिवनेरी किल्ला कोणी बांधला?

इसवी सन ११७० ते १३०८ पर्यंत पूणे जिल्ह्यावर चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे राज्य होते.याच कालखंडात नाणेघाट टेकडीवर यादवांनी शिवनेरी किल्ला बांधला.

शिवनेरी किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत?

पायथ्यापासून वर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे ४००-५०० पायऱ्या चढून जावे लागेल. या पायऱ्या पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागतो.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts