मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female
Marathi Ukhane Gruhpravesh|मराठी गृहप्रवेश उखाणे
1.रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ……….रावांच नाव घेते सोडा माझी वाट
2.जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… ….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
3.माहेरी साठवले, मायेचे मोती… ….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती
4.नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात… ….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात
5.गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ….. नाव घेते सोडा माझी वाट
6.उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
7.चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ………. रावां समवेत ओलांडते माप
8.नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.
9.सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.
10.सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी
11.अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वांग्याची फोड ***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्
12.अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा—–रावांच्या नावावर भरते लग्नाचा चुडा
13.आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा विष्णू आणि महेश , ……च नाव घेवुन करते मी गृहप्रवेश
14.सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात —– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
15.पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप —– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन गृहप्रवेश करते आज
16.आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस —–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
17.चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल —– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल
18.श्री विष्णूंचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
19.गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर, ….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर
20.नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले… ….. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
21…… ची लेक झाली, ….. ची सून… ….. च नाव घेते, गृहप्रवेश करून !
22.लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
23.शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात, … रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात
24.सासू लावेल आई सारखी माया सासरे ठेवतील आशिर्वादाचा हात …. सोबत संसार करण्यासाठी येवु द्या ना मला घरात
Marathi Funny Ukhane|मराठी विनोदी उखाणे
1.साखरेचे पोते सुई ने उसवले, ….. ने मला पावडर लाऊन फसवले
2.नागाला पाजत होते दूध आणि साखर ….. रावांना आवडते फक्त जाॅनी वॉकर
3.डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया ….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया
4.आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची……. म्हणजे जगदंबा
5.चांदीच्या ताटात फणसाचे गरे ….. राव दिसतात बरे पण वाकतील तेव्हा खरे
6.नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद …… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात
7.पाव शेर रवा पाव शेर खवा ….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा
8.भल्या पहाटे करावी देवाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा
9.एक बाटली दोन ग्लास, माझी बायको फर्स्ट क्लास
10.काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत ….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत
11.इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ….. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
12.ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन …. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!
13.Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी ….. ला लागली ५०००० ची लॉटरी
14.काचेच्या ग्लासात कोकम सरबत ….रावां शिवाय मला नाही करमत
15.बागेत बाग राणीचा बाग… अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
16.Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले … राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले
17.मनी नाही भाव … म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव … म्हणे देवा मला पाव ……. हेच माझे राव … अब मेरा डोका मत खाव
18.मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून
19.खोक्यात खोका टिवीचा खोका,खोक्यात खोका टिवीचा खोका …….माझी मांजर मी तिचा बोका
20.”मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.”
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही हे मराठी उखाण्यांच वाचन केले असाल तर मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हांला ते आवडले असतील तर कृपया ते तुम्ही इतरांना पण शेयर करा जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल.