100+Marathi Ukhane For Female
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या महाराष्ट्रात विशेष करून हिंदू संस्कृतीत लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी दोघांनाही वेगवेगळ्या सणांमध्ये आणि घरगुती कार्यक्रमात आपले घरचे आणि जवळचे नातेवाईक उखाणे घ्यायला सांगतात त्यावेळी नवरा आणि नवरीला उखाणे घ्यावे लागतात.जास्त करून लोक स्त्रियांना उखाणे घ्यायला लावतात.अशा वेळी अचानक कोणी उखाणे घ्यायला सांगितले तर लगेच उखाणे घ्यायला जमत नाही.असे Marathi Ukhane For Female सहजपणे उपलब्ध झाले तर उखाणे घ्यायला सोपे पडते.म्हणून मी या लेखात वेगवेगळ्या सणांमध्ये आणि कार्यक्रमात घ्यावे लागणारे सुंदर असे उखाणे लिहिले आहेत.
Marathi Ukhane For Female
वृक्षवेलींच्या सान्निध्यात देहभान हरपते, ……चे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, ……च्या करिता सोडते आज माहेर.
राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन ..…चे नाव घेऊन सोडते मी कंकण.
सत्यनारायणाची केली पूजा, घेतला भक्तीने प्रसाद ……च्या साठी मागितला आशीर्वाद.
संध्याराणीने रोखिली चंद्राची कोर……च्या साठी मी पूजिली मंगळागौर.
अश्विनीच्या तेजाने फुलली वसुंधरा ..…चे नाव घेते आज आहे दसरा.
विजयाचे तोरण उभारले चैत्रप्रतिपदेच्या दिनी ..…नी घातले मंगळसूत्र अन् झाले मी सुवासिनी.
चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट……नाव घेते सोडा माझी पाठ.
मांगल्याच्या तेजाने उजळतो देव्हारा देवाचा ..…च्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा.
शब्द सुमने गुंफून तयार होते काव्यमाला..…चे नाव घेते ….ची बाला.
अंबरठ्याचे माप ओलांडून,..…च्या घरची झाले सून,….ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.
सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस,साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते ..….ना जिलबीचा घास..
शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण, ..….चे नाव घेते हळदीकुंकू हेच कारण.
स्वच्छता नी टापटीप आरोग्याचे मूळ ..…च्या जीवनासाठी सोडले चे कूळ.
देवाची मूर्ती घडविताना आनंदीत होतो शिल्पकार ..…ची सेवा हाच माझा अलंकार.
सुशील सद्गुणी घरात लक्ष्मी करते वास,..…ना घालते फेणीचा घास.
औरंगाबादला प्रसिद्ध आहे वेरूळ अजिंठा लेणी, ..…ना घालते घास दूधफेणी
कवीच्या परिचयात भावनांची उपरती ..…चे प्रेम हीच माझी संपत्ती.
जमीन दुभंगून सीता झाली गुप्त ..…ना वरून आईवडिलांना केले मुक्त.
मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर, ..….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,.….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, .…. ची राणी झाले मी आहे भाग्यवान.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,..….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,.…. चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,..….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…… रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,.….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,.…. रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.
शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,माझ्या ह्रुदयांत कोरली,..….रावांची सुंदर मूर्ती.
हळद घेतली,कूंकु घेतलं,घेतली निरंजन आणी काडेपेटी,..….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी.
जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ,..….रावांचे नाव घेते, आहे हळदी कुंकवाची वेळ.
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,..….चे नाव घेते, सार्या जणी बसा.
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,..….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.
जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,..….रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
अथांग वाहे सागर,संथ चालते होडी,परमेश्वर सुखी ठेवो,..….नी माझी जोडी.
शंकराची पूजा पार्वती करते वाकून,..… नाव घेते सर्वांचा मान राखून
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,..…. रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …..रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल
सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,..…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात
शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात …… रावांची आणि माझी साता जन्माची साथ.
संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी …..रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहु दे माझी व ..….. रावांची प्रेम ज्योती
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे……रावांची राणी
नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे ……. रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,..…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार ……. रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,….. रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार
कवीची कविता मनापासून वाचावी ……रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.
मे महिना म्हणजे, लग्नाचा Season,आणि …… रावांचे नाव घ्यायला, भेटले आहे आज खरे Reason .
सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी मोठ्यांदा बोलते नका टवकारु कान….. रावांचे नाव घेते राखून तुमचा मान
सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास ..…. रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस…… रावांच नाव घ्यायला मला नाही आळस
सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला लाभे जन्म.…… रावांचे सौभाग्य लाभो जन्मोजन्म
नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा .…… रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा
वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालीनता……. रावांच्या हास्यात दिसते जीवनाची सफलता
पंढरपुरात आहे रुक्मिणी अन् विठोबा,…….रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा.
पेरूच्या बागेत राघू आले गमतीला……… नाव घेते सवासणीच्या पंक्तीला
चांदीच्या ताटात लाडू भरले काठोकाठ,……राव बसले जेवायला समया लावल्या तीनशे साठ.
सागराला आली भरती, नदीला आला पूर,…..रावांच्या प्रेमासाठी आईवडील केले दूर
सोन्याचे दागिने सोनाराने बनविले,……रावांचे नाव घेण्यासाठी तुम्हा सर्वांनी अडविले.
आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास,…..ला भरविते जिलेबीचा घास.
निळ्या निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे,……रावांच्या संगतीने उजळले माझे जीवन सारे.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,…….नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा.
सांजवात लावताना येते माहेरची आठवण,……रावांसाठी झाली सासरी पाठवण.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,……चे नाव घेते पत्नी या नात्याने.
अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात,भातावर वरण, वरणावर तूप,तुपासारखे रूप, रूप सारखा जोडा,……रावांचे नाव घेते वाट माझी सोडा
सुपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकू कशी.पायात पैंजण घालू कशी,…….बसले मित्रांपाशी,कपाटाची चावी मागू कशी.
इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर,……रावांचे नाव घेते…….ची सिस्टर.
सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप, ………. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप
माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी..….. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,…….रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,रावांचे नाव घेते ..….ची सून
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,……रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,
विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,……रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,….. च्या घराण्यात .….. रावांची झाले महाराणीई
जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,……रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,…… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
मंदिरात वाहाते, फुल आणि पान,….… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,…… रावांच्या नावाचा, भरला हिरवा चुडा.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,…… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,…… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,….… रावांचे नांव घेऊन करेन कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,……रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,…… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,आई-वडी विसरले……रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,
चांदीचे जोडवे पतीची खुन,…… रावांचे नांव घेते,…… ची सुन.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन,….… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?इच्छापूर्ती
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,…… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
करवंदाची साल चंदनाचे खोड,…… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.
सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,…… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा….…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.
सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,……रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले
लग्नाचे दोन क्षण होत आहेत पूर्ण ……रावांचे नाव घेते जीवन झाले आता संपूर्ण.
माहेर आणि सासर दोन्ही घरे असतील मोठ्या मनाची …..रावांसोबत माझे लग्न म्हणजे गोष्ट आहे सन्मानाची
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी …….रावांमुळे आली, आयुष्याला गोडी
नदीतील वाळू चाळणीने चाळू ……. राव म्हणतात चल पब्जी खेळू
निळया निळ्या आकाशा खाली थुई थुई नाचतो मोर ..….रावांसारखे पति भाग्य माझे थोर
त्रिकोणी रुमालावर जाळी काढते क्रमा क्रमाने ……रावांच नाव घेते तुमच्या इच्छेप्रमाणे.
चटणीला तड़का दिला जीरा मोहरीचा……. राव आहेत जणू हिरा कोहिनूरचा.
नवरात्रीच्या मंडपात दांडिया खेळते छान ……. रावांच नाव घेऊन देते हळदी, कुंकवांच वान.
Marathi Ukhane For Female हा लेख तुम्हांला कसा वाटला ते तुम्हीं आम्हांला कमेंट करून नक्की सांगा, तसेच तुमच्याकडे Marathi Ukhane Female असतील ते ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्हीं ते या लेखामध्ये समाविष्ट नक्की करू. Marathi Ukhane For Female हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा ही नम्र विनंती.Marathi Ukhane या लेखामध्ये प्रत्येक शुभेच्छाच्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे त्यातील तुम्हांला आवडलेला उखाणा कॉपी करून तुम्हीं तुमच्या पतीला पाठवू शकता.