60+Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे

60+Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या कडे भारतीय संस्कृतीत विशेष करून हिंदू संस्कृतीत लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी दोघांनाही वेगवेगळ्या सणांमध्ये आणि घरगुती कार्यक्रमात आपले घरचे आणि जवळचे नातेवाईक उखाणे घ्यायला सांगतात त्यावेळी नवरा आणि नवरीला उखाणे घ्यावे लागतात.नवीन नवरीला तिच्या सासरकडील नंनद, सासू ,दीर उखाणे घ्यायला सांगतात .अशा वेळी अचानक कोणी उखाणे घ्यायला सांगितले तर लगेच नवरीला उखाणे घ्यायला जमत नाही.असे Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे सहजपणे उपलब्ध झाले तर उखाणे घ्यायला सोपे पडते.म्हणून मी या लेखात वेगवेगळ्या सणांमध्ये आणि कार्यक्रमात घ्यावे लागणारे सुंदर आणि सोपे उखाणे लिहिले आहेत.

60+Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे

60+Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,……. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,…….रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,…….रावांचे नाव घेते …….च्या दिवशी

काढ्यात काढा पाटणकर काढा,…….रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,……..रावांचे नाव घेऊन सोडले कांकण

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन……..रावांचे नाव घेते…..ची मी सुन

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,……. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,…….रावांना भरविते जिलेबिचा घास

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,……….रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,………रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,……. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती

संसाररुपी पुस्तकाचे उघडले पहिलेपान ………रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान.

माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने….राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा………रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला…….रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा……..रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी……..रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी

वृक्षवेलींच्या सान्निध्यात देहभान हरपते, ….…चे नाव घेऊन आशीर्वाद मागते.

मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, ..……च्या करिता सोडते आज माहेर.

राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन …….चे नाव घेऊन सोडते मी कंकण.

सत्यनारायणाची केली पूजा, घेतला भक्तीने प्रसाद …….च्या साठी मागितला आशीर्वाद.

संध्याराणीने रेखिली चंद्राची कोर…….च्या साठी मी पूजिली मंगळागौर.

अश्विनीच्या तेजाने फुलली वसुंधरा …….चे नाव घेते आज आहे दसरा.

विजयाचे तोरण उभारले चैत्रप्रतिपदेच्या दिनी …….नी घातले मंगळसूत्र अन् झाले मी सुवासिनी.

चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट……..नाव घेते सोडा माझी पाठ.

मांगल्याच्या तेजाने अजळतो देव्हारा देवाचा …….च्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा.

शब्द सुमने गुंफून तयार होते काव्यमाला…….चे नाव घेते ……ची बाला.

अंबरठ्याचे माप ओलांडून,…….च्या घरची झाले सून,…….ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.

गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,…….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,……रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.

अथांग वाहे सागर,संथ चालते होडी,परमेश्वर सुखी ठेवो,…….नी माझी जोडी.

शंकराची पूजा पार्वती करते वाकून,…….. नाव घेते सर्वांचा मान राखून

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,……… रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …..रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,……… रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात …. रावांची आणि माझी साता जन्माची साथ.

संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी ………रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहु दे माझी व ……… रावांची प्रेम ज्योती

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे…….रावांची राणी

नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे ……. रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,..…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार …….. रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,……. रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस,साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते ……..ना जिलबीचा घास..

शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण, ……..चे नाव घेते हळदीकुंकू हेच कारण.

स्वच्छता नी टापटीप आरोग्याचे मूळ ……..च्या जीवनासाठी सोडले चे कूळ.

देवाची मूर्ती घडविताना आनंदीत होतो शिल्पकार ……..ची सेवा हाच माझा अलंकार.

औरंगाबादला प्रसिद्ध आहे वेरूळ अजिंठा लेणी, ……..ना घालते घास दूधफेणी

कवीच्या परिचयात भावनांची उपरती ……..चे प्रेम हीच माझी संपत्ती.

जमीन दुभंगून सीता झाली गुप्त ……ना वरून आईवडिलांना केले मुक्त.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,…….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, ……. ची राणी झाले मी आहे भाग्यवान.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,………रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,…. चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी.

हळद घेतली,कूंकु घेतलं,घेतली निरंजन आणी काडेपेटी,……….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी.

जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ,…….रावांचे नाव घेते, आहे हळदीकुंकवाची वेळ.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,……..चे नाव घेते, सार्‍या जणी बसा.

कवीची कविता मनापासून वाचावी ……रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.

मे महिना म्हणजे, लग्नाचा Season,आणि …… रावांचे नाव घ्यायला, भेटले आहे आज खरे Reason .

सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरीनवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी मोठ्यांदा बोलते नका टवकारु कान……..रावांचे नाव घेते राखून तुमचा मान

सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास …….. रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास

मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस…….. रावांच नाव घ्यायला मला नाही‌ आळस

सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला लाभे जन्म………. रावांचे सौभाग्य लाभो जन्मोजन्म

रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा……… चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा

नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा ………. रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा

वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालीनता……. रावांच्या हास्यात दिसते जीवनाची सफलता

पंढरपुरात आहे रुक्मिणी अन् विठोबा,……….रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा.

चांदीच्या ताटात लाडू भरले काठोकाठ,……….राव बसले जेवायला समया लावल्या तीनशे साठ.

सागराला आली भरती, नदीला आला पूर,…..रावांच्या प्रेमासाठी आईवडील केले दूर

निळ्या निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे,……रावांच्या संगतीने उजळले माझे जीवन सारे.

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,……..नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा

अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात,भातावर वरण, वरणावर तूप,तुपासारखे रूप, रूप सारखा जोडा,…..रावांचे नाव घेते वाट माझी सोडा

सुपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकू कशी.पायात पैंजण घालू कशी,…….बसले मित्रांपाशी,कपाटाची चावी मागू कशी.

इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर,……रावांचे नाव घेते….ची सिस्टर.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,……..रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,…… रावांचे नांव घेऊन करेन कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,…….रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,आई-वडी विसरले………रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

Marathi Ukhane For Bride| सोपे उखाणे हा लेख तुम्हांला कसा वाटला ते तुम्हीं आम्हांला कमेंट करून नक्की सांगा, तसेच तुमच्याकडे Marathi Ukhane Bride असतील ते ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्हीं ते या लेखामध्ये समाविष्ट नक्की करू. Marathi Ukhane For Bride|सोपे उखाणे हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा ही नम्र विनंती.Marathi Ukhane या लेखामध्ये प्रत्येक शुभेच्छाच्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे त्यातील तुम्हांला आवडलेला उखाणा कॉपी करून तुम्हीं ज्या वेळेस तुम्हांला घ्यायचा असेल तेव्हा तुम्हीं तो पाठ करून आपल्या नवरदेवासाठी घेऊ शकता.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts