मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female
Hi Friends, तुमचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात लग्न झालेली जोडपी आपल्या जोडीदाराच्या नावाने उखाणे घेतात. ज्या लोकांचे नवीन लग्न झाले आहे त्यांना लग्नामध्ये विविध प्रसंगी किंवा नंतर सुध्दा नातेवाईक नवरा व नवरी दोघांनाही उखाणे घ्यायला लावतात.जुन्या लग्न झालेल्या लोकांनाही विविध सणावेळी उखाणे घ्यायला सांगतात.उखाणे घेतल्याशिवाय नातेवाईक सोडत नाही.अशा वेळी मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female साठी सहजपणे मिळत नाही. त्यासाठी अगोदरच आपण अशे उखाणे तयार केले तर आपल्याला बरे पडेल.ही अडचण दूर करण्यासाठी मी मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female तुमच्या पर्यंत आणले आहेत.यामध्ये आपल्याला विविध प्रसंगीचे व नवीन उखाणे आपल्याला मिळतील.या उखाण्यांचा तुम्हांला उपयोग होईल अशी आशा करतो.
Marathi Ukhane For Male| मराठी उखाणे पुरुष
1. कळी उमलेल,फूल हसेल मोहरून येईल सुगंध….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
2. काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात
3.चंद्रा ला पाहून भरती येते सागराला….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
4.काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून …….राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
5.गाडीत गाडी डेक्कन क्वीन ……… आहे माझी ब्युटी क्वीन
6.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ……….__च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
7. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी ….म्हणजे लाखात सुंदर नार
8.झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी
9.ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ………….- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
10.दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
11.देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
12.देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ…..ने दिला मला पतीराजांचा मान !!!!!
13.दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी, …..चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी
14.दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!
15.दनवनात अमृताचे कलश …. आहे माझी खूप सालस
16.निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान …..चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान
17.पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले ,त्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले
18.बहरली फुलांनी निशिगंधाची पाती ….. चे नाव घेतो लग्नाच्या राती
19.मातीच्या चुली घालतात घरोघरी ….. झालीस माझी, आता चल माझ्या बरोबरी
20.मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली
21.मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा …………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
22.लग्नात्त लागतात हार आणी तुरे …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
23.वड्यात वडा बटाटावडा,… मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
24.संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका …..चे नाव घेतो सर्व जण ऐका
25.सहानुभूतीच्या गुलाबी पाकळ्यात प्रेमाची भर पडताच, तयार होतो प्रेमाचा गुलकंद, …………. नावातच सामावलाय माझा आनंद
26.हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली,हो नाही म्हणता म्हणता संमती दिली आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ……..माझी झाली.
27.पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले
28.खिशात माझ्या प्रेमाची लेखणी …..माझी सगळ्यात देखणी
29.प्रेमाच्या रानात , नाचतो मोर,…….शी केल लग्न नशीब माझे थोर
30.कृष्णाला बघून, राधा हसली …… माझ्या, हृदयात बसली
31.छोटीशी तुळस, घराच्या दारी, तुमची ……., माझी जबाबदारी
32.रुप तिच गोड,नजर तिची पारखी, शोधूनही सापडणार नाही,……सारखी
33.सुंदर झाडावर, कोकिळा गाते गाणी ….च्या सुख दुःखात,मी तिचा साथी
34.पक्षांचा थवा, दिसतो छान …..आली जीवनात ,वाढला माझा मान
35.सोण्याचा दिवा,कापसाची वात आयुष्य भर देईन,….ची साथ
36.सोण्याची वाटी,सोण्याचे ताट ……येण्याने आली,सुखाची वाट
37.उन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर साथ देईन ……..ची, आयुष्याच्या वाटेवर
38जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी ……..च नाव घेतो,ती माझी अर्धांगिनी
39.पाउस पडला शेतात,वास येतो मातीला आयुष्यभर साथ देईन, वचन देतो……..ला
40.मैत्री आणि नात्यात,नसावा स्वार्थ ………मुळेच माझ्या, जीवनाला अर्थ
41.सुराविना कळला,साज संगीताचा, ………नावात गवसला, अर्थ जीवनाचा
42.काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद
43.देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी
44.नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे.
45.हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
Marathi Ukhane For Female|मराठी उखाणे महिला
1.मंदिरात वाहते फुल आणि पान, … रावांचे नाव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
2.कपाळाच कुंकु, जसा चांदण्याचा ठसा, … रावांचे नाव घेते, सारे जण बसा.
3.रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांच्या नांवाचा, भरला हिरवा चुडा.
4.सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नाव घेते, …च्या घरात.
5.कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
6.संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
7.अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नाव घेताना कसला आला आळस
8.लावीत होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
9.शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.
10.आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे.
11.सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
12.राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.
13.घातली मी वरमाला हसले… राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
14.धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.
15.पौणि॔मेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.
16.आज आहे श्रावणी पोळा ….. च्या जीवावर शृंगार केले सोळा.
17.आशीवार्दाची फुले वेचते मी वाकून…….चे नाव घेते तुमचा मान राखून
18.उभी होते मळ्यात नझर गेली खळ्यात हजाराची कंठी ………रावांच्या गळ्यात
19.कुंकु लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, ….. आहेत माझे पूर्व संचित
20.गणेशा च्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात..गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात ………._ रावांची साथ लाभली सून बनून आले मी ह्या घरात
21.गर्द आमराई त्यामध्ये पोपटाचे थवे, ……….चे नाव माझ्या ओठी यावे
22.चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा … आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा
23.चांदीच्या ताटात फणसाचे गरे ,……….राव दिसतात बरे पिच्चरला नेतील तेव्हाच खरे
24.जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले …. रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले
25.ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे
26.माणीत मणी काळे मणी …….. राव माझ्या मनाचे धनी
27.गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
28.आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
29.गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, …रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
30.सुशिक्षीत घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.
31.सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, … रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
32.आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा … ….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा
33.पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’, ….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
34.धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा
35.भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची—– रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची
36.आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण—– रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
37.संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान—– रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान
38.नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा—– रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा
39.खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अमृतापेक्षा गोड
40.इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर
41.काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत ….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत
42.नाव घ्या नाव घ्या करु नका गजर….. रावांच नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
43.मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर, ….. ह्याचं नाव घेते, घास भरवते नंतर
44.नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू …. चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
45.माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा…. नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा
46.रामाने राज्य दिले भरत ने नाकारले ……….रावांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले .
47.शब्दा शब्दानी बनते वाक्य वाक्य वाक्यानी बनते कविता …..माझे सागर मी त्यांची सरिता
48.शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने, …….रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
49.सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड …चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड
50.साखर असते गोड । मिरची असते तिखट … .रावांचे नाव घेते आडनावा सकट