Ganpati Aarti Marathi
Hii, मित्रांनो तूंम्हा सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे.गणपती हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे.संकटमोचक,विघ्नविनाशक असा आपल्या सर्वांचा लाडका गणेश बप्पा.गणपतीची आरती केल्याने मन प्रसन्न राहते.या पोस्टमध्ये आपल्याला Ganpati Aarti Marathi मध्ये वाचायला मिळतील.
Ganpati Aarti Marathi
1.सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
2.तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥
मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥
तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥
तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥
मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरयो ॥
3.गजानना श्री गणराया
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥
सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
4.दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
5.युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती जे॥५॥
6.लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ध्रु॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥जय॥२॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥जय॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥जय॥४॥
7.येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप, हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०१॥
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०२॥
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०३॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०४॥
8.आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा, कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा
वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०१॥
लोपलें ज्ञान जगीं
हित नेणती कोणी, नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी ॥०२॥
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०३॥
कनकाचे ताट करीं
उभ्या गोपिका नारी
गोपिका नारी, नारद तुंबरही
साम गायन करी, गायन करी
आरती ज्ञानराजा ॥०४॥
प्रगट गृह्य बोले
विश्व ब्रह्मचि केलें
ब्रह्मचि केलें
रामाजनार्दनीं
चरणीं मस्तक ठेविलें
आरती ज्ञानराजा ॥०५॥
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०६॥
9.आरती करू तुज मोरया
आरती करु तुज मोरया ।
मंगळगुणानिधी राजया ।
आरती करु तुज मोरया ॥
सिद्धीबुद्धीपती संकटनाशा ।
विघ्ननिवारण तूं जगदीशा ॥
आरती करु तुज मोरया ॥०१॥
धुंडीविनायक तू गजतुंडा ।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा ॥
आरती करु तुज मोरया ॥०२॥
गोसावीनंदन तन्मय झाला ।
देवा देखोनिया तुझ शरण आला ॥
आरती करुं तुज मोरया ॥०३॥
10.वक्रतुंड एकदंत गौरिनंदना
वक्रतुंड एकदंत गौरिनंदना ।
आरती मी करितों तुज हे गजानन ॥
पाशांकुश शोभे करी दु:खभंजना ।
रत्नजडीत सिंहासन बुद्धिदीपना ॥
सुरनरमुनि स्मरती तुला येति दर्शना ॥०१॥
वक्रतुंड एकदंत गौरिनंदना ।
आरती मी करितों तुज हे गजानन ॥
रिद्धिसिद्धि करीती सदा नृत्यगायना ।
देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना ॥
विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना । वक्रतुंड एकदंत ॥०२॥
11.घालीन लोटांगण, वंदीन चरण
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे
नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
गणपती बाप्पांच्या आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणॆ हेचि आता ॥
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
उडाला उडाला कपि तो उडाला
समुद्र उलटोनी लंकेशी गेला
लंकेशी जाऊनी चमत्कार केला
नमस्कार माझा त्या मारूतीला ॥
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे॥
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानु कोटी
मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥
अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र,
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र,
जया आठविता घडे पुन्यराशी,
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. ॥
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे.
कवि वाल्मिकीसारिखा थोर ऐसा,
नमस्कार माझा तया रामदासा.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥
तुम्हीं या आरत्या कृपया इतरांना पण शेयर करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न(FAQ).
प्रश्न १.गणपती कोण आहे?
उत्तर –गणपती हा महादेव व पार्वती यांचा पुत्र आहे.गणपतीला सर्व देवतांच्या अगोदर प्रथम पूजेचा मान आहे.गणपतीची अनेक नावे आहेत उदाहरणार्थ मोरया, विनायक, दामोदर, गणेश, एकदंत.गणपतीला बुध्दी आणि समुध्दीचा स्वामी मानला जातो.हिंदू धर्मातील गणपती एक पू्ज्य देवता आहे.
प्रश्न २.गणपतीची बहिण कोण आहे? उत्तर- गणपतीच्या बहिणेचे नाव अशोकसुंदरी आहे. तिचा विवाह राजा नहुष यांच्या बरोबर झाला होता.
प्रश्न ३.गणेश चतुर्दशीचे महत्व काय? उत्तर -गणपती चतुर्थी हा गणेशाला समर्पित एक प्रमुख हिंदू सण आहे. तो भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायांद्वारे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान, भक्त त्यांच्या घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि प्रार्थना, भजन (भक्तीगीते) आणि आरती (विधी) करतात. शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपतीच्या प्रस्थानाचे प्रतीक असलेल्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले जाते.