Misal Pav Recipe in Marathi

Misal Pav Recipe in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या महाराष्ट्रात खाण्याचे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत त्यापैकी मिसळ पाव हा खूप फेमस असा खाद्यपदार्थ आहे.मिसळचं नाव ऐकताच सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.म्हणूनच आज आपण Misal Pav Recipe in Marathi मराठी मध्ये कशी बनवायची हे बघणार आहोत.

मिसळ हा पदार्थ त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या झणझणीत पणामूळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.आज आपण या Post मध्ये मिसळचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत.हे सर्व प्रकार तुम्हीं तुमच्या घरी बनवून बघु शकता.ही Misal Pav Recipe एकदा तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही रेसिपी नक्कीच आवडेल. तसेही ही रेसिपी बनवणे काही अवघड काम नाही. आणि त्याच करिता तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेले साहित्य व मसाल्यांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता.

Misal Pav Recipe in Marathi

Misal Pav Recipe in Marathi

आपण आता महाराष्ट्रात बनवल्या जाणाऱ्या विविध मिसळीचे प्रकार बघणार आहोत.हे सगळेच मिसळचे प्रकार खूप चविष्ट आणि झणझणीत आहेत.सगळे प्रकार तुम्हीं तुमच्या घरी बनवून बघा.

कोल्हापूरी मिसळ

कोल्हापुरी मिसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य

• १ वाटी मटकी+१ बटाटा

• तळण्यासाठी तेल

• १ टोमॅटो+१ कांदा+ गरम मसाला

• फरसाण+ पोहे कुरमुर्याचा चिवडा

• कोथिंबीर + लिंबू + ब्रेडचे स्लाईस

• ३-४ लसूण पाकळ्या

• १ इंच आले

• २-३ मिरी + २-३ लवंगा

• १ लहान काडी दालचिनी

• १ तमालपत्र

• १ चमचा जिरेपूड,धनेपूड

• अर्धी वाटी खवलेला ओला नारळ

• १ कांदा + २ टोमॅटो

• ४-५ लहान चमचे लाल तिखट

• फोडणीसाठी तेल

• आमसुल किंवा चिंच

• मीठ

 

कोल्हापूरी मिसळ बनविण्याची पद्धत

 

• मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.

 

• मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.

 

• कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.

 

• कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.

 

• नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसऱ्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)

 

• १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत घालून त्यात चवीपुरते मीठ घालावे.

 

• लहान कढईत गॅस बारीक करुन उरलेल्या तेलात हिंग, हळद आणि ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी . मीठ घालावे . आंबटपणासाठी २-३ आमसुलं किंवा चिंचेचा कोळ घालावा.आपल्या गरजेनुसार पाणी घालून १ उकळी काढून घ्यावी.

 

• उसळ आणि कट तयार झाला की कांदा बारीक चिरून घ्यावा.

 

• नंतर एका डिशमध्ये थोडी उसळ घ्यावी आणि त्यात १ पळी कट घालावा.त्यावर चिवडा फरसाण आणि कांदा घालावा आणि त्यावर लिंबू पिळून पावाबरोबर खायला सुरुवात करावी.

 

चटकदार मिसळ

चटकदार मिसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य

• मोड आलेले धान्य पाव किलो

• दोन बटाटे , तीन मोठे कांदे

• चार ते पाच हिरव्या मिरच्या

• एक वाटी ओल्या नारळाचा चव

• दीड वाटी चिरलेली कोथिंबीर

• तिखटपूड , हिंग , दोन लिंबू

• मोहरी , हळद , दोन टोमाटो

• कढीपत्ता दहा ते बारा पाने

• आले-लसूण पेस्ट एक चमचा

• फरसाण व शेव १२५ ग्रॅम

• चवीनुसार मीठ , तेल .

 

चटकदार मिसळ बनविण्याची पद्धत

• मोड आलेले धान्य थोडेसे भाजून घ्यावेत . बटाटा , टोमाटो , कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे . लिंबू चिरून ठेवावेत .

 

पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी , जिरे , कढीपत्ता , मिरची , हळद , तिखटपूड , आले-लसूण पेस्ट टाकावी .

 

• नंतर त्यात बटाटा , टोमाटो टाकून मोड आलेले धान्य टाकून दोन मिनिटे ढवळत राहावे . हवे असेल तेवढे गरम पाणी टाकून शिजवावे .

 

• आता एका डिशमध्ये तयार झालेली उसळ घ्यावी आणि त्यात वरून कट टाकावा त्यावर कोथिंबीर , शेव , कांदा व फरसाण टाकावा.आता त्यावर लिंबू पिळून पावाबरोबर खायला सुरुवात करावी.

 

उपवासाची मिसळ

उपवासाची मिसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप बटाट्याचा उपवासाचा चिवडा

उकडलेले 4 बटाटे

2 चमचे ओलं खोबरं

2 चमचे दाण्याचे कूट

2 चमचे साजूक तूप

1 चमचा जिरे

4-5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

कडिपत्ता

चिरलेली कोथिंबीर

आल्याचे बारीक तुकडे

आवश्यकतेनुसार मीठ

 

शेंगदाणा आमटी बनविण्यासाठी साहित्य

 

2 चमचे साजूक तूप

1 चमचा जिरे

4 चमचे शेंगदाणे कूट

अर्धा कप उकडलेले शेंगदाणे

2 चमचे गूळ

5-6 आमसूल

5 कप ओले खोबरे

6-7 हिरव्या मिरच्या

आल्याचे तुकडे

चिरलेली कोथिंबीर

आवश्यकतेनुसार मीठ

 

उपवासाची मिसळ बनविण्याची पद्धत

• सर्वात आधी शेंगदाणे उकडून घ्यावे आणि बटाटे कुकरमध्ये शिजवून त्याची सालं काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात.

• एका कढईत तूप घालून घ्या त्यात जिरे चांगले तडतडू द्या. त्यानंतर त्यात आल्याचे तुकडे, मिरची तुकडे, ओले खोबरे, कोथिंबीर, कडिपत्ता घालून परतून घ्या आणि वरून बटाट्याच्या फोडी घालून भाजी करून घ्या. लक्षात ठेवा मीठ, शेंगदाण्याचे कूट आणि थोडीशी साखर बटाट्याच्या फोडीवरच पेरून ठेवा. भाजी करताना थोडासा पाण्याचा हबका मारून शिजवून घ्या.

 

• आमटी बनविण्यासाठी दाण्याचे कूट, खोबरं, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर हे सर्व थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून चांगले वाटून घ्या. एकदम बारीक पेस्ट न करता थोडीशी जाडसर ठेवा .

 

• एका टोपात तूप घाला. त्यात जिरे घालून खमंग फोडणी करा. त्यात ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून परतून घ्या आणि त्यानंतर वरील वाटण घाला. तुम्हाला जितकी जाडसर आमटी हवी असेल त्या अंदाजाने पाणी घाला. वरून गूळ, आमसूल, मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं घालून व्यवस्थित मंद आचेवर आमटी शिजू द्या. मध्ये मध्ये आमटी ढवळत राहा.

 

• आता एका वाटीमध्ये आधी बटाट्याची उपवासाची भाजी घाला. त्यावर दाण्याची आमटी किंवा उसळ घाला आणि वरून बटाट्याचा उपवासाचा चिवडा घाला. ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

 

वडा मिसळ

वडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य

चिरलेला कांदा

उकडलेले बटाटे

बारीक कापलेली मिरची

कडीपत्ता

हळद

आले पेस्ट

बारीक चिरलेली कोथींबीर

लसूण पेस्ट

तेल, हिंग, जिरे, मोहरी

बेसन

कोल्हापुरी तिखट

चमचाभर मोहन

तळायला तेल

मीठ

 

मिसळचा कट बनविण्यासाठी लागणारे साहित्य

1 वाटी टोमॅटो पेस्ट

1 वाटी कांदा पेस्ट

1 वाटी पापडी अथवा गाठी

1 वाटी ओलं खोबर

एक वाटी बटाटा भाजी

1 तमालपत्र,

4 लवंगा,

1 दालचिनी

दीड चमचा लसूण पेस्ट

कोकम

मीठ

 

वडा मिसळ बनविण्याची पद्धत

• उकडलेल्या बटाट्याचे चांगले बारीक तुकडे करुन घ्या.

 

• एका कढईत कांदा, जीरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, मिरच्या घालून फोडणी द्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्या.

 

• आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्‍या भागात लसणीची पेस्ट चांगली मिसळा. जेणेकरून एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे आपल्याला खायला मिळतील आणि मग या मिश्रणाचे मोठे गोळे बनवून घ्या.

 

• एका भांड्यात बेसन, हिंग, कोल्हापुरी तिखट, मीठ, कोथिंबीर कापून, कडिपत्ता कापून मिक्स करा, चमचाभर मोहन यात घाला आणि पाण्याने भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवून घ्या.

 

• त्यानंतर वरील गोळे यात बुडवून त्याचे वडे तळून घ्या

 

• दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात थोड्याशा तेलात तमालपत्र, लवंगा, दालचिनी परतून घ्या. त्यावर कांदा पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत चांगले परतून घ्या.

 

• त्यानंतर आता त्यात ओले खोबरे घालून परतून घ्या. मग टोमॅटो पेस्ट घालून साधारण शिजवून घ्या.

 

• वरील सगळे मिश्रण मिक्सरवर छान बारीक वाटून घ्या आणि त्यात बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.

 

• आता अजून एका पातेल्यात जरा जास्त तेल घ्या. तेल गरम झाले की गॅस बंद करा आणि त्यात कोल्हापुरी तिखट पावडर घाला. मात्र हे जळणार नाही याकडे लक्ष ठेवा. भराभर पळीने हलवत रहा.

 

• आता त्यात वरील पेस्ट घालून पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेवढे पाणी, मीठ अन कोकम घालून याला एक चांगली उकळी काढा. तुमची मिसळीची तर्री तयार

 

• एका बाऊलमध्ये बटाटावडा ठेवा आणि त्यावर ही तर्री घाला. वरून कांदा आणि कोंथिबीर पेरा आणि गरमागरम पावासह खायला घ्या.

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts