Marathi Suvichar for Students

Marathi Suvichar for Students
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi Suvichar for Students या लेखामध्ये मी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आणि प्रेरणा मिळण्यासाठी काही मराठी सूविचार लिहले आहेत.हे सूविचार वाचून विद्यार्थी आपल्या जीवनात बदल घडवू शकतोविद्यार्थीदशेतील काळ हा त्यांच्या आयुष्यातील खूप महत्वाचा काळ असतो. त्या काळात मन संस्कारक्षम असते. संघर्ष हा आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे हे लहानपणापासूनच मुलांना शिकवले पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्यांना नैराश्याशी लढण्याचे सामर्थ्य येईल. विद्यार्थ्यांनी हे सुविचार नेहेमी वाचावे.

 

असे सूविचार वाचल्याने मूलांच्या बालमनावर चांगले संस्कार घडतात त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.मूलांची भावी पिढी संस्कारक्षम आणि उत्तम घडविण्यासाठी Marathi Suvichar for Students हे सूविचार विद्यार्थ्यांनी वाचणे गरजेचे आहे

Marathi Suvichar for Students

Marathi Suvichar for Students

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

 

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

 

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.

 

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

 

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

 

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

 

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

 

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

 

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

 

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

 

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

 

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच

 

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

 

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

 

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

 

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

 

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

 

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

 

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

 

 

नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

 

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

 

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

 

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

 

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

 

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

 

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

 

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

 

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

 

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

 

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

 

आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

 

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

 

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

 

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

 

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

 

तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे –  गौतम बुद्ध

 

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल. –  धीरूभाई अंबानी

 

जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात, त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला. –  धीरूभाई अंबानी

 

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालंनाही तर? याची त्याला भिती वाटते. –  पु.ल. देशपांडे

 

 

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल . –  बिल गेट्स

 

जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. –  बिल गेट्स

 

देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात. –  बेंजामिन फ्रैंकलिन

 

पाण्यासारखे बना सतत वाहत राहा कारण पाण्याला माहित आहे थांबलात कि सडलात. –  ब्रूस ली

 

महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही. –  रवींद्रनाथ टागोर

 

जर आपण प्रत्येक भुंकणार्‍या कुत्र्यावर थांबुन आणि दगडफेक केली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. बिस्किटे हातात ठेवणे आणि पुढे जाणे चांगले. –  लोकमान्य टिळक

 

आपले ध्येय कोणत्याही जादूने साध्य होणार नाही, परंतु आपल्याला आपले ध्येय गाठावे लागेल. अशक्त होऊ नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो. –  लोकमान्य टिळक

 

काय करायचे आहे हे ठरवणे हे जेवढे महत्वाचे आहे काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा तेवढे महत्वाचे आहे –  स्टीव जॉब्स

 

मोठ काम करण्याचा एकच मार्ग आहे जे काम करत आहात ते प्रेमाने करा –  स्टीव जॉब्स

 

व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो . –  स्वामी विवेकानंद

 

समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे. –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल. –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. –  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

शिक्षण समृद्धीच्या काळात दागिन्यासारखे तर अधोगतीची काळात आधार देणारे असते.

 

शहाण्याला शब्दांचा मार

 

तुमच्या प्रतिस्पर्ध्याला बुद्धीने नामोहरम करा.

 

ज्ञानचं अंतिमतः मुक्ती देते.

 

आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.

 

आळस हा माणसाचा शत्रू आहे.

 

खोटे बोलणे हि भित्रेपणाची खूण आहे .

 

सरावाने कुशलता प्राप्त होते.

 

परिश्रम हीच खरी देव पूजा.

 

साधे राहणीमान, उच्च विचार.

 

अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.

 

स्वतःचा अवगुण शोधणे हीच गुणांची पूर्तता.

 

जो कर्तव्याला जगतो, तोच कौतुकास पात्र होतो.

 

यशाचा कोणताही मंत्र नाही.

 

संयम हे शौर्याचे लक्षण आहे.

 

अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा.

 

प्रयत्न, कष्ट, चिकाटी हे यशाचे तीन मार्ग आहेत.

 

नाव ठेवणे सोपे, तर नाव कमवणे आवघड असते.

 

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे.

 

ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत बरी.

 

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

 

मुक्या प्राण्यावर सदैव प्रेम करा.

 

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक.

 

संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेतात.

 

गेलेली वेळ पुन्हा येत नाही.

 

परिस्थिती कोणतीही असो हार न मानता लढायला शिका.

 

कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.

 

नेहमी खरे बोला.

 

गरजवंतांना नेहमी मदत करा.

 

शिका, मोठे व्हा आणि स्वतःचे भविष्य स्वतः घडवा.

 

एकी हेच बळ.

 

माफी मागून छोटं व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका.

 

केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

 

वेळ आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

 

क्षमा वृत्ती ठेऊन क्रोध जिंकावा.

 

सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.

 

ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समानतेचा विस्तार.

 

शिक्षण म्हणजे समाजसुधारणा होय.

 

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

 

सत्याने मिळते तेच टिकते.

 

मरावे परी किर्तीरुपी उरावे.

 

अनुभव हा महान शिक्षक आहे.

 

जो मनाला जिंकतो, तो जगालाही जिंकू शकतो.

 

आळसामुळे सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण गोष्टी अशक्य होतात. म्हणून आळस करू नये..!!

 

जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल

 

कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल

 

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.

 

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात

 

अंधाराला घाबरू नका, कारण तारे अंधारातच चमकतात.

 

चुका करणे वाईट नाही, परंतु चुका करूनही न शिकणे खूप वाईट आहे.

 

 

हे सूविचार तूम्हांला आवडले असतील तर तुम्हीं ते कृपया इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.जेणेकरून दुसऱ्या पण विद्यार्थ्यांना हे सूविचार वाचून आपल्या जीवनात बदल घडवता येईल.

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts