80+Marathi Ukhane For Male
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.हिंदू संस्कृती मध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना उखाणे घ्यायची पद्धत आहे.लग्न झाल्यावर वेगवेगळ्या सणांमध्ये आणि घरगुती कार्यक्रमात घरातील आणि जवळचे नातेवाईक लोक उखाणे घ्यायला सांगतात.नवरीला उखाणे घ्यायला सांगितले तर नवरी मूलगी उखाणे सहजपणे घेते पण नवऱ्या मुलाला कधी कधी उखाणे घ्यायला जमत नाही.अशा वेळी नवरदेवाचं हसू होत.त्यासाठी अगोदरच उखाणे तयार करून ठेवले तर नवरदेवाची फजिती होत नाही.असे Marathi Ukhane For Male मी या लेखा मध्ये लिहिले आहेत.हे उखाणे तुम्हीं त्या त्या प्रसंगी घेऊ शकता.
80+Marathi Ukhane For Male
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ……….. चे नाव, कायम ओठी यावे.
गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल…..माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.
नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे …चे रूप, आहे खूपच देखणे
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नाव घेऊन राखतो सर्वाचा मान.
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.
काय जादु केली, जिंकलं मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, … चं नाव आहे अमृता पेक्षा ही गोड.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय,
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.
भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथसौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!
चंद्र आहे चांदणीच्या संगती आणि ….. आहे माझी जीवनसाथी
चंद्राला पाहून भरती येते सागराला….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन…. मुळे झाले संसाराचे नंदन.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
हा दिवस आहे आमच्या करिता खास,…..ला देतो गुलाब जामुन चा घास.
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे…. चे नाव माझ्या ओठी यावे.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजनसौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !!!!!
सोन्याचा कप आणि चांदीची बशी….. माझी आहे जणू काही उर्वशी.
पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.
श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.
लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून….. ला पडली भूल आली प्रेमात फसून
घर असावं नेहमी क्लीन अँड नेट…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान ….चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
पिवळं सोनं पांढरीशुभ्र चांदी …..ने काढली माझ्या नावाची मेहंदी
अभिमान नाही संपत्तीचा,गर्व नाही रूपाचा… ला घास घालतो वरण-भात तूपाचा
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुंजन सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध ….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे
जगाला सुवास देत उमळली कळी भाग्यने लाभली मला … प्रेमपुतळी
जाईच्या वेणीला चांदीची तार माझी ….म्हणजे लाखात सुंदर नार
जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध ….. च्या सहवासात मी झालो धुंद
जो करील आदर पत्नीचा त्याचा संसार सुखाचा ,संगम झाला कृष्णा कोयनेचा हा खेळ ईश्वराचा ,जेव्हा मन मोकळे झाले ………चे,तेव्हा पुष्पहाराने स्वागत केले ……. चे.
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,…सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,…..चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान …..चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान
निसर्गावर करू पाहत आहे आजच्या मानव मात अर्धांगिनी म्हणून… ने दिला माझ्या हातात हात
पुढे जाते वासरू, मागून येते गाय…ला आवडते नेहमी दुधावारची साय
मातीच्या चुली घालतात घरोघरी ….. झालीस माझी, आता चल माझ्या बरोबरी
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी,वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा…………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
लग्नात्त लागतात हार आणी तुरे…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,…….. ची व माझी जडली प्रिती
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Marathi Ukhane For Male हे आवडले असतील तर तुम्हीं comment करून सांगा.हे उखाणे तुम्हीं तुमच्या नातेवाईकांना पण शेयर करा ही नम्र विनंती.