Marathi Ukhane For Groom| सोपे उखाणे मराठी
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या महाराष्ट्रात हिंदू संस्कृती मध्ये लग्नामध्ये वधू किंवा वराला उखाणे घ्यायची पद्धत आहे.लग्न झाल्यावर वेगवेगळ्या सणांमध्ये आणि घरगुती कार्यक्रमात घरातील आणि जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारातील लोक उखाणे घ्यायला सांगतात.नवरीला म्हणजेच वधूला उखाणे घ्यायला सांगितले तर नवरी मूलगी उखाणे सहजपणे घेते पण नवऱ्या मुलाला कधी कधी उखाणे घ्यायला जमत नाही.अशा वेळी नवरदेवाची फजिती होते.त्यासाठी अगोदरच उखाणे तयार करून ठेवले तर नवरदेवाची पंचायत होत नाही.असे Marathi Ukhane For Groom|सोपे उखाणे मराठी मी या लेखा मध्ये लिहिले आहेत.हे उखाणे तुम्हीं त्या त्या प्रसंगी घेऊ शकता.
Marathi Ukhane For Groom| सोपे उखाणे मराठी
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा……..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ……..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….….चे नाव घेतो…च्या घरात
फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ………च्या रूपाने झालो मी बेभान
तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो …….ची लाल ओढणी
ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, ……..चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात………च्या संग
हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि……..किती टिंगू
झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते ….आणि माझी जोडी
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, …..… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
भाजीत भाजी मेथीची, .……माझ्या प्रितीची.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, …..… चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ……. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन …….. ने दिला माझ्या हातात हात.
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, ….… देतो मी लाडवाचा घास.
कोरा कागज काळी शाई, ….… ला रोज देवळात जाण्याची घाई
गोऱ्या गोऱ्या गालावर तीळ काळा काळा…….. च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा.
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला ……..चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात……चे नाव घेतो असु द्या लक्षात.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ……. सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
नवग्रह मंडळात शनीचे आहे वर्चस्व…….आहे माझे सर्वस्व.
मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस….. तू फक्त मस्त गोड हास.
पाण्याने भरलेला कलश त्यावर आंब्याची पाने फुले….. चे नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…….च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, ….… आज पासुन माझी गृहमंत्री.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली……. माझ्या मनात
रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर ………माझी प्यारी.
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, ……. मिळाली आहे मला अनुरुप
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी ……. व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..… चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, …..… गेली माहेरी की होतात माझे हाल
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …….चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, ……. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, …… चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
गाडीत गाडी डेक्कन क्वीन……… आहे माझी ब्युटी क्वीन
चंद्रा ला पाहून भरती येते सागराला …… ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ……….च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
जाईच्या वेणीला चांदीची तार माझी ………म्हणजे लाखात सुंदर नार
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला सौ……….सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…….ची अखंड राहो प्रीती !!!
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले त्यावर सोन्याच्या अगंठीने …… चे नाव लिहिले
मातीच्या चुली घालतात घरोघरी …….झालीस माझी, आता चल माझ्या बरोबरी
हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिलीआणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ……..माझी झाली.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …….. चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी………माझी सगळ्यात लेखणी
प्रेमाच्या रानात , नाचतो मोर,…….शी केल लग्न नशीब माझे थोर
कृष्णाला बघून, राधा हसली…… माझ्या, हृदयात बसली
छोटीशी तुळस, घराच्या दारी,तुमची ……. माझी जबाबदारी
रुप तिच गोड,नजर तिची पारखी,शोधूनही सापडणार नाही,……सारखी
पक्षांचा थवा, दिसतो छान…..आली जीवनात ,वाढला माझा मान
सोण्याची वाटी,सोण्याचे ताट……येण्याने आली,सुखाची वाट
उन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर साथ देईन ……..ची, आयुष्याच्या वाटेवर
सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव…….च्या मेहंदीत, माझे नाव
जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी……..च नाव घेतो,ती माझी अर्धांगिनी
पाउस पडला शेतात,वास येतो मातीला आयुष्यभर साथ देईन, वचन देतो……..ला
मैत्री आणि नात्यात,नसावा स्वार्थ………मुळेच माझ्या, जीवनाला अर्थ
सुराविना कळला,साज संगीताचा,………नावात गवसला, अर्थ जीवनाचा
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, …..… सोबत जीवनात मला आहे आनंद.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, …..… माझ्या जीवनाची सारथी.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, …….. चे नाव घेतो लग्नाच्या राती.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, ……… चे रुप आहे अत्यंत देखणे
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, ……… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
अभिमान नाही संपत्तीचा,गर्व नाही रूपाचा……… ला घास घालतो वरण-भात तूपाचा
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड……… चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड
आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर ….. च्या आगमनाने पडली त्यात भर
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी, ……..ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुंजन सौ…….सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!
उगवला रवी, मावळली रजनी…… चे नाव सदैव वसे माझ्या मनी
उमाचा महादेव आणि सितेचा राम ….. आलि जीवनी आता आयुषयभर आराम
कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध ….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,……सह घेतले मी सप्तपदीचे फेरे
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ सौ…….ने दिला मला प्रेमाची साथ
चांदीच्या वाटीत दही भाताचा काला सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
जगाला सुवास देत उमळली कळी भाग्यने लाभली मला … प्रेमपुतळी
Marathi Ukhane For Groom| सोपे उखाणे मराठी हा लेख तुम्हांला कसा वाटला ते तुम्हीं आम्हांला कमेंट करून नक्की सांगा, तसेच तुमच्याकडे Marathi Ukhane Groom असतील ते ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्हीं ते या लेखामध्ये समाविष्ट नक्की करू. Marathi Ukhane For Groom|सोपे उखाणे मराठी हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा ही नम्र विनंती.Marathi Ukhane या लेखामध्ये प्रत्येक शुभेच्छाच्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे त्यातील तुम्हांला आवडलेला उखाणा कॉपी करून तुम्हीं ज्या वेळेस तुम्हांला घ्यायचा असेल तेव्हा तुम्हीं तो पाठ करून आपल्या बायकोसाठी घेऊ शकता.