Aai Quotes in Marathi

Aai Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आईबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम Aai Quotes in Marathi या लेखातून व्यक्त करणार आहोत.आई म्हणजे आपलं सर्वस्व.या जगात आपला प्रवेश झाला तो फक्त आपल्या आई वडिलांना मूळे त्यामुळे आपण हे जग पाहू शकतो.आई एवढे प्रेम या दुनियेत आपल्यावर कोणीच करू शकत नाही.जर आई आणि देव आपल्या समोर असतील तर पहिले आईला नमस्कार करावा एवढे आईचे स्थान उंच आहे.आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

आई म्हणजे अथांग भरलेला मायेचा सागर जो कधीच आटत नाही.कोणी पाठिंबा देऊ या नको देऊ पण आई आपल्या सुख दुःखात नेहमी पाठीशी उभी राहते.आपल्या स्वप्नांना बळ देण्याचे काम आईच करते.आई म्हणजे मायेचे आभाळ त्याच्या विस्ताराला काहीच मर्यादा नाहीत.अशा आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही.अशा आईबद्दल प्रेम आपल्याला काही शब्दातून, ओळीतून व्यक्त करता आलं पाहिजे.आईसाठी असे काही Quotes मी Aai Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत ते तुम्हीं जरुर वाचा आणि आणि आपल्या आईबद्दलचे प्रेम या शब्दांतून व्यक्त करा.

Aai Quotes in Marathi

Aai Quotes in Marathi

आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी.

दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध आईला मारलेली मिठी.

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.

आई सोबत फक्त ५ मिनिटे हसा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम गेल्यासारखे वाटेल.

स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करत असते ती आई कुठे काय करते

आईच मन मला कधी कळलंच नाही दूर जाता आई पासून कधी करमत हि नाही लव यू आई

मुळाच्या आधारा शिवाय जसे कोणतेही झाड मोठे होत नाही तसे मी मोठा होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी आई लव यू आई

पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात मी तर माझ्या माऊलीच्या माझ्या आईच्या पाया पडतो कारण तेच माझे पंढरपूर

घार जेव्हा आपले भक्ष्य शोधण्यासाठी आकाशात घिरट्या घालत असते तेव्हा तिचे सर्व लक्ष आपल्या पिलांना पाशी असते तसेच तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते ती म्हणजे तुमची आई

आईच्या इतके जवळचे जगात कोणीही नाही मला जन्म दिलास तू तुझे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीत लव यू आई

रोज तुला बघितल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही तुझ्या हातचे जेवल्याशिवाय माझे पोट भरत नाही काय करू आईचे प्रेम कधी कमी होत नाही लव यू आई

आईचं प्रेम हे एखाद्या गौळणी सारखं असतं स्वतः सर्व चटके खाऊन कोणतही दुःख गाळून आपल्याला एक निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्याचे प्रयत्न करते

आठवणीतून कधी तू जात नाहीस कितीही कामात असलीस तरी मला फोन करायचे कधी विसरत नाही कितीही रागावलो मी तुझ्यावर तरी तू माझ्यावर कधी रागवत नाहीस म्हणूनच तर आई तुला सोडून कुठे मी जात नाही

देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही.आईची पुजा करुन देव मिळवता येतो…….

माझे जीवन तेव्हाच झाले सुरू जेव्हा आयुष्यात माझी आईच झाली माझी गुरु लव यू आई……

स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करत असते ती आई कुठे काय करते…….

मुळाच्या आधाराशिवाय जसे कोणतेही झाड मोठे होत नाही तसे मी मोठा होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी आई लव यू आई……

आईच्या डोळ्यातल्या आरशात कधीतरी झाकून बघा कितीही मोठे झालात तर त्यात तुम्ही लहानच दिसता…!

सगळ्यांना आराम करण्यासाठी सुट्टी मिळते पण आईला सुट्टी कधीच नसते..!

आई तुझ्या असण्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आहे,तुझ्या शिवाय हे जीवन अर्थहीन आहे..!

तुम्ही प्रेमाच्या किती पण गोष्टीं करा परंतु आईशिवाय खऱ्या प्रेमाची व्याख्या पूर्णच होऊ शकत नाही..!

संपूर्ण जग फिरलो पण आई शिवाय सुंदर या जगामध्ये काहीच नाही..!

ऑनलाईन दुनियेत तात्पुरती नाती खूप भेटतील पण शेवट पर्यंत तुमची काळजी घेणारी एकच व्यक्ती ह्या जगात आहे ती म्हणजे आई..!

माझ्यासाठी कष्ट करणारी माझी आई त्या आईवर प्रेम करणारे मी तिचे लेकरू

या विडिओ मध्ये आपण आईचे महत्व सांगणारे साठ विचार बघणार आहोत. चला तर मग आईचे प्रेम बघूया.

जगात तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ति शोधत असाल.. तर तुमच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा.तुम्हाला कधीच कोणाची गरज पडणार नाही.

आई माझा विचार करणे कधीच सोडत नाही.कितीही कामात असली तरी मला फोन करायला विसरत नाही.कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही.म्हणून तर आई… तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.l

जपून मला तुझ्या पोटाशी या जगात आणलेस आई…तूच माझा ईश्वर आणि परमात्मा कुणीच तुझ्या हूण मोठे नाही.

स्वर्गातही जे सुख मिळणार नाही ते आईच्या चरणाशी आहे….कितीही मोठी समस्या असू दे आई या शब्दातच समाधान आहे.

पहिला शब्द जो मी उच्चारला तो आई पहिले घास जीने भरवीला ती म्हणजे आई बोट पकडून चालायला शिकवले ती माझी आई मी आजारी असतांना जिने रात्र जागून काढली ती माझी आई.

आई ह्याचं एकमेवं नाव जी धारण करून तुमचं अस्तित्व वाढेल.”

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्या शिवाय माझं विश्व काहीच नसेल.

चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.

आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात.. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा

गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची

आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही

तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात

कधी वाटतं भरभरून बोलावं मनातलं सगळं तुला सांगावं अगं मग तुझ्याकडूनही काही ऐकावं अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग मला काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग पण मला तू हवी आहेस आई

कधी उलट बोललो असेल तुला मी कधी रागावलो असेल तुझ्यावर मी तर माफ कर मला पण तुझ्या पेक्षा ही जास्त मला तुझी काळजी आहे तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे लव यू आई

जेव्हा आपण घरातून बाहेर जातो तेव्हापासून ते आपण घरी सुखरूप परत येईपर्यंत जी व्यक्ती सर्वात जास्त आपली काळजी करते ती म्हणजे आपली आई

माझ्या पायाला ठेच लागल्यावर वेदना तिला होतात कारण तिचा जीव हा माझ्यात वसतो माझी आई लव यू आई

देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही.

आईने मला बोट धरून चालायला शिकवले आईनेच मला जीवन जगायला शिकवले

तिच्या प्रेमळ पदराची छाया माझ्यासाठी जीवनाचे अमृत आहे स्वर्गाची तर मला माहीत नाही पण माझ्यासाठी स्वर्ग सुख माझी आईच आहे

बिछाना कितीही महागडा असो,पण सर्वात चांगली झोप आईच्या कुशीतच येते

समजू नाही शकलो आई बाळाचे हे नाते,दुखापत बाळाला होते अन् हंबरडा फोडून आई रडते

मरायला नाहीतर आईशिवाय जगायला जीव घाबरतो..

जेव्हा जेव्हा कागदावर लिहिले मी आईचे नाव लेखणी सुद्धा आदराने बोलली होऊन गेलेत चारधाम

“तिच्या नुसत्या ‘बांगड्यांचा’आवाज जरी ऐकला तरी मनाला धीर मिळतो.”आई….

मायेने जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवणारी आई ज्याच्या जवळ नाही, असा श्रीमंतही असतो भिकारी.

घर सुटते पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचे पान कधीच मिटत नाही जन्मभर चालून – चालून जेव्हा पाय थकून जातात शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात

आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते निर्दयी या जगापासून दूर जावेसे वाटते.कुणी ना येथे कुणाचा, सारिच नाती खोटी..तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते.

स्वर्गात पण जे सुख नाही नाते आई तुझ्या चरणाशी आहे..कितीही मोठी समस्या असुदेत फक्त आई या नावातच समाधान आहे..

आकाशाचा जरी केला कागद…अन् समुद्राची केली शाई…तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही

आई गरीब असो या श्रीमंतपण स्वतःच्या मुलांना कधीच काही कमी पडु देत नाही…

जास्त काहीच नकोय मला फक्त संपुर्ण आयुष्य तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही तर आईच्या डोळ्यातून निघणाऱ्या आनंदाश्रूसाठी मोठं व्हायचं..

स्वतः आजारी असताना सुद्धा मुलांच्या पोटाचा विचार करणारी आईच असते..

आयुष्यामध्ये बरीच माणस भेटतात पण प्रत्येक वेळी आपल्याला समजुन घेतील असे फक्त आई वडीलच असतात…

कितीही मोठी समस्या असुदेत आई या नावातच मी समाधानी आहे

आईसाठी लिहिलेली कविता

माय माझी हाय रं माझ्ं ते मायेचं आभाळ

माझ्यासाठी माझी माय आहे ते भाग्याचे कपाळ

 

जिच्या मी उदरी जन्मलो , जिच्या मी प्रेमात वाढलो

वाढता वाढता मी तिच्या मुळं माझ जगणं शिकलो

 

कधी आटत नाही तो माझ्यासाठी तिचा प्रेमाचा सागर

कधी फुटत नाही ती माझ्यासाठी तिची मायेची घागर

 

किती वर्णावे ते सुख जेव्हा असतो तिच्या मी कुशीत

किती भाग्य आहे माझं मोठं ती आहे माझ्या नशिबात

 

माय तुझ्याविना जगणं म्हणजे ते आत्माविना शरीर

माय तुझ्यामुळे फुलला तो माझा सुखाचा ग संसार

 

 

 

 

आई बद्दल लिहिलेले हे Quotes तुम्हांला आवडले असतील तर तर हे Quotes तुम्हीं तुमच्या सोशल नेटवर्किंग साइटवर Status म्हणून ठेवू शकता.Aai Quotes in Marathi हे तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये शेयर पण करा.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts