Motivational Poem in Marathi
Hii Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी या लेखात Motivational Poem in Marathi या कविता लिहिल्या आहेत.कोणतेही अशक्यप्राय काम करताना कधी कधी अपयश येते, आपलं ध्येय पूर्ण होत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास खचतो अशा वेळी Motivation ची गरज असते. प्रेरणादायी कविता , सुविचार असं काहीही वाचल्याने परत एकदा उठून लढण्याचे बळ येतं आणि आपला आत्मविश्वास परत येतो म्हणून मी या लेखामध्ये महान अशा कवींच्या Motivational Poem in Marathi या कविता तुमच्यापर्यंत आणल्या आहेत त्या तुम्हीं नक्की वाचा.
Motivational Poem in Marathi
कविता – विझलो आज जरी मी
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
कवी – सुरेश भट
कविता – चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें;
वेद्या मुशाफ़िराला सामील सर्व तारे.
मी चालतों अखंड चालायचें म्हणून;
धुंदींत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीड तोडलें कीं अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मीं फ़ाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.
आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचें;
बेसावधास कैसे डसणारे हे निखारे.
कवी – विंदा करंदीकर
कविता – आयुष्याला द्यावे उत्तर
असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुनी देताना…
संकटासही ठणकावुनी सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
कवी – विंदा करंदीकर
कविता – एक प्रयत्न अजून कर
पडला अशील हजारदा
पराभवाच्या भयाण रात्री
रडला असशील हजारदा
पण झाले गेले आता विसर,
मूठ आवळ अश्रू आवर
लक्ष्यावरती रोख नजर
अन् एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
संकट गगनी गडगडते,
उरी समस्या कडकडते
तना-मनाला चिरा फाडूनी,
उभे चराचर डगमगते
मग तूही त्रिशूळ डमरू धर,
डमडम डमडम डमडम कर
आरुढ हो तू सर्वांवर अन्
प्रलयंकारी तांडव कर
एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
वाट समुद्री बिकट आती
अन् लाटांची नाग गती
अपमानाने, हेटाळणीने
तुझी बहकली नाव किती
विस्फोटाने तूही उसळ,
खळखळ खळखळ तुही खवळ
स्वार होऊनी लाटांवरती
कर स्वतःला दृढ अढळ
एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
पहा आग ही धगधगते
उष्ण झळाही झगझगते
उदासिनता,अती जीर्णता,
असहायता ही भगभगते
या अग्नीला ध्वस्त कर,
वा स्वतःला उध्वस्त कर
जन्म घेऊनी राखेमधूनी,
पुन्हा नव्याने पंख पसर
एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
पडला अशील हजारदा
पराभवाच्या भयाण रात्री
रडला असशील हजारदा
पण झाले गेले आता विसर,
मूठ आवळ अश्रू आवर
लक्ष्यावरती रोख नजर
अन् एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
कवी – धीरज नवलखे
कविता – यश – अपयश
बुडणाऱ्याला त्याचा यशाचा किनारा कधीच मिळत नाही
तरणाऱ्याला मात्र त्याच्याशिवाय कुणाचीच गरज लागत नाही
असावी लागते जिद्द, चिकाटी , मेहनत त्याच्या ती मनगटात
नाहीतर मिळते फक्त हार अन् ती निराशा त्याच्या ती पदरात
ध्येय मोठं असेल तर अनेक यातना,चटके ते सोसावेचं लागतात
पण आधीच हार मानणाऱ्याला त्याच्या मार्गातील फक्त काटेच
समोर दिसतात
जिंकायचे असेल तर त्यागी अन् एकलव्य सारखं एकनिष्ठ
असावं लागतं
तसं नसेल तर मात्र अपयशाचं दुःख ते निरंतर पचवावं लागतं
जिकणं येवढं सोपं असतं तर सगळेच राजे झाले असते
यश-अपयश हे शब्द कधीच कुणाच्या ओठी आले नसते
कविता – फक्त तू खचू नकोस
संधी मिळेल तुलाही
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस,
प्रेम तुझ्यावर करणारे
कितीतरी लोक आहेत,
तुझ्यासाठी जोडणारे
खूप सारे हात आहेत,
असे अशा आपल्यांसाठी
तू ही थोडं हसून बघ,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस…
कविता – हिम्मत करने वालों की कभी हार नही होती..
लहरों से डरकर नौका पार नहीं होती…
हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती…
नन्ही चींटीं जब दाना लेकर चढ़ती है…
चढ़ती दीवारों पर सौ बार फ़िसलती है…
मन का विश्वास रगों में साहस भरता है…
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, ना अखरता है…
मेहनत उसकी बेकार हर बार नहीं होती…
हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती…
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है…
जा जा कर ख़ाली हाथ लौटकर आता है..
मिलते ना सहज ही मोती गहरे पानी में…
बढ़ता दूना विश्वास इसी हैरानी में…
मुट्ठी उसकी ख़ाली हर बार नहीं होती…
हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती…
असफलता एक चुनौती है… स्वीकार करो…
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो…
जब तक ना सफल हो नींद-चैन को त्यागो तुम…
संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम…
कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती…
हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती…
कवी – हरिवंश राय बच्चन
कविता – तुम्हीं लढा
समजा परिस्थिती प्रतिकूल आहे,
रस्त्यावर ठिपके आहेत
नात्यांची धूळफेक झाली आहे
पण स्वतःचा अडथळा बनू नका
तुम्ही जागे व्हा
स्वतःचा मार्ग बनवा
सूर्य अंधारात हरवला आहे
पण अजून रात्र झालेली नाही
सकाळ झाली आहे
आशा तुमच्या सोबत आहे
जो म्हणाला तू एकटा आहेस
तूच तुझी पहाट हो
तुमचा स्वतःचा कायदा व्हा
सत्याचा विजय हेच तुमचे ध्येय असू दे
तुमच्या हृदयाचा संयम,
तू कधीही हरत नाहीस
भ्याड ते असतात जे लढाई सोडून जातात
तू परमवीर,
तुम्ही लढा
तुम्ही लढा
या रणांगणावर,
तुम्ही तुमचा विजय लिहा
ही लढाई जिंकून,
तू वीर अमित हो
तू स्वतः सर्वशक्तिमान आहेस,
धैर्याने जगणे म्हणजे काहीतरी
तुम्ही लढा
फक्त लढा
कविता – कदम मिला कर चलना होगा
बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
हास्य-रूदन में, तूफ़ानों में,
अगर असंख्यक बलिदानों में,
उद्यानों में, वीरानों में,
अपमानों में, सम्मानों में,
उन्नत मस्तक, उभरा सीना,
पीड़ाओं में पलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
उजियारे में, अंधकार में,
कल कहार में, बीच धार में,
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
जीवन के शत-शत आकर्षक,
अरमानों को ढलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
सम्मुख फैला अगर ध्येय पथ,
प्रगति चिरंतन कैसा इति अब,
सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ,
असफल, सफल समान मनोरथ,
सब कुछ देकर कुछ न मांगते,
पावस बनकर ढ़लना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
कुछ काँटों से सज्जित जीवन,
प्रखर प्यार से वंचित यौवन,
नीरवता से मुखरित मधुबन,
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
कवी – अटल बिहारी वाजपेयी
कविता – थोडं जगून बघ
जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ
जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ,
चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस
प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ,
अपयश आलं तर ते निरखून बघ
यश आलं तर ते थोडं वाटून बघ,
डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ,
स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ,
जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे थोडं तोलून मापून बघ,
जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडवून बघ
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला ही Motivational Poem in Marathi पोस्ट कशी वाटली ते तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.
.