Mazi Aai Marathi Nibandh

Mazi Aai Marathi Nibandh
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम मी तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये आपली माय , माऊली, जननी, जन्मदात्री म्हणजेच आपली आई हिच्या बद्दल Mazi Aai Marathi Nibandh लिहिला आहे.आईबद्दल कितीही लिहिले तरी ते कमीच आहे तिची तुलना या जगात कुणाही बरोबर होऊ शकत‌ नाही. आईमूळेच आपण हे जग बघू शकलो.आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही.आई बद्दल लिहिले तर एक मोठे महाकाव्य होवू शकते पण मी या लेखामध्ये आईवर छोटासा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे बघुया मला जमतंय का आईवर थोडं लिहायला.कधीतरी वर्षातून एकदा मदर्स डे साजरा करण्यापेक्षा दररोज मातृदिन साजरा करता आला पाहिजे.आपल्या आईबद्दल चार ओळी तरी लिहिता आल्या पाहिजेत म्हणून मी या लेखात आईची महिमा सांगणारा एक छोटासा Mazi Aai Marathi Nibandh निबंध लिहिला आहे.

Mazi Aai Marathi Nibandh

Mazi Aai Marathi Nibandh

आई हा शब्द दिसायला छोटा असला तरी या शब्दाची महिमा खूप मोठी आहे.आई म्हणजे ज्याची सुरुवात आणि शेवट कुठे आहे याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही ते आभाळ.आई म्हणजे देवाळातल्या देवापेक्षाही महान असा मूर्तीमंत देव जिच्यापुढे कोणीही मोठं नाही.आईमूळे आपला जन्म झाला आणि आपण या जगात आलो आणि हे सुंदर जग आपल्याला बघायला मिळाले.  आई म्हणजे मायेचा महासागर ज्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्या मायेच्या‌ सागरातील थोडंस जरी प्रेम संपल तरी तिचा मायेचा, प्रेमाचा सागर कधीच आटत नाही‌. तिचा मायेचा हात नेहमी आपल्या पाठीशी असतो.

 

म्हटलंच आहे ‌’स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’.हे तंतोतंत खरं आहे कारण आई शिवाय आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही.आपण कितीही यश, प्रसिद्धी जरी मिळवली तरी ते यश आणि प्रसिद्धी कवडीमोल आहे त्याला काहीही किंमत नाही.आपल्या आईच्या कुशीत आपल्याला स्वर्गाची अनुभूती होते आणि तिच्या मांडीवर डोके ठेवताच मनात कितीही विचारांच वादळ, टेंशन जरी असेल तरी तिच्या मांडीवर सुंदर सुखाची झोप येते.

 

आई म्हणजे आपला‌ पहिला गुरु ज्या गुरूने आपल्याला पहिल्यांदा आई बोलायला शिकवले.आपला हात हातात धरून चालायला शिकवले. आईने आपल्याला चांगले संस्कार दिले त्या संस्कारा मुळेच आज आपण या जगात एक माणूस म्हणून उत्तम आहोत.माझी आई पण सेम अशीच आहे जिच्या डोळ्यात नेहमी मला तिची माझ्यासाठी असणारी काळजी, प्रेम आणि माया दिसते.माझ्या आईनं मला वाढविण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत.मला मोठं करण्यासाठी तिने काहीही कसर सोडली नाही.दिवसरात्र फक्त माझाच विचार केला.माझा जन्म झाल्यावर ती स्वतःची स्वप्ने विसरली आणि माझ्या स्वप्नांसाठी जगू लागली.आता मला फक्त तिच्यासाठी जगायचं आहे तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.आई बरोबर असली की कोणाचीही भीती वाटत नाही.तिचा‌ हात आपल्या नेहमी पाठीशी असतो.थोडक्यात सांगयच झालं तर माझ्या आयुष्याची सुरुवात ज्या व्यक्तीमुळे झाली ती माझी आई आहे.

Mazi Aai Essay in Marathi

जिच हृदय नेहमी माझ्यासाठी प्रेमाने, मायेनं, करूणेनं ओथंबून भरून वाहत असतं ती म्हणजे माझी आई.माझी आई म्हणजे माझ्या हदयाचा हळवा कोपरा.आई म्हणजे नुसती एक व्यक्ती नाही तर ती देवाहून ही खूप महान आहे.देव स्वतः या जगात येऊ शकत नाही पण देवाने आईच्या रूपात दिवसरात्र सोबत असणारा साक्षात देव पाठवला आहे.जिची महिमा अपरंपार आहे.आजारी असताना माझ्या उशाजवळ दिवसरात्र बसून माझी काळजी घेणारी माझी आई आहे.जेव्हा तिला कळलं की ती एका बाळाची आई होणार आहे तेव्हाच तिनं आपलं संपूर्ण जीवन माझ्याकरिता बहाल केलं.मग ते नऊ महिने पोटात वाढवणं असो आणि नंतर जन्म झाल्यानंतर लहानचं मोठं करणं असो.

 

माझ्या जीवनाचा प्रत्येक टप्पा तिच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.जिथं जिथं मी पडलो तिथं तिथं तिने मला वरती उठायला हात दिला आणि जेव्हा मी रडलो तिथं तिने तिच्या पदराने माझ्या डोळे पुसून मला आधार दिला.कधी हरलो‌ तर परत लढण्याचे बळ दिले आणि जिंकलो तर मला मिठीत घेऊन माझ्या पाठीवरून हात फिरवला.

 

माझी आई म्हणजे मायेचं, प्रेमाचं छोटंसं तळं नाही आहे तर तो कधीही न आटणारा मायेचा महासागर आहे.जरासा खेचला की तो तूटणारा साधा दोरा नाही आहे तर कितीही ओढला,खेचला तरीही न तूटणारा माझी आई मांजा आहे.माझ्या आईमूळे माझ्यासारख्या गंजणाऱ्या लोखंडाच आज सोनं झालं आहे.आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उंच भरारी घेताना आपला जेव्हा तोल जातो तेव्हा आपल्या पंखांना बळ देण्याचे काम आईच करते.या जगामध्ये येऊन आज मला धन्य झाल्यासारखं वाटतं कारण जिची तुलना या विश्वातील कोणत्याच गोष्टीबरोबर होऊ शकत‌ नाही अशा महान माझ्या आईच्या पोटी माझा जन्म झाला आहे त्यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं.

 

माझ्या जीवनातील सगळ्यात  मोठं सुख म्हणजे माझी आईच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य असतं आणि ती आनंदात असते.म्हणूनच सांगतोय मित्रांनो आपल्या आईला आपल्या जीवाच्या पलीकडे जपा,तिचा आदर करा,तिची काळजी घ्या.आपल्या आईला दुःख देणारा व्यक्ती जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही.मला तर माझी आई माझ्या प्राणांहूनही प्रिय आहे.मी तिला स्वप्नांत सुध्दा दुःख देण्याचा विचार करू शकत नाही कारण मला माझ्या आईपेक्षा काहीही अनमोल नाही.

 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा आईची महानता सांगणारा Mazi Aai Marathi Nibandh कसा वाटला ते तुम्हीं comment करून नक्की सांगा आणि इतरांना पण हा निबंध शेयर करा ही नम्र विनंती.

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts