Buddha Quotes in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी या लेखामध्ये बौद्ध धर्माचे जनक महान महामानव गौतम बुद्धांचे विचार Buddha Quotes in Marathi यामध्ये लिहिले आहेत. गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते.गौतम बुद्ध हे अतिशय शांत होते.त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.त्यांचे विचार हे विलक्षण होते.मानवी जीवन सुखी करण्यासाठी त्यांनी विचार सांगितले आहेत.हे विचार मानवी जीवनाला दिशा देणारे आहेत .हेच विचार , Quotes मी Buddha Quotes in Marathi या लेखामध्ये आहेत.गौतम बुद्धांचे विचार प्रत्येक मनुष्याला प्रेरणा देणारे आहेत.
गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्रे सांगितली आहेत.साध्या आणि प्रभावी उपदेशामुळे बौद्ध धर्म देश-विदेशात खूप लोकप्रिय झाला.बौद्ध धर्माने ब्राह्मणवादाचा आणि यज्ञ, बळी इत्यादी प्रचलित धार्मिक विधींचा मोठ्या प्रमाणात निषेध केला.भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला आणि समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करून अनेक लोक केवळ त्यांच्या जीवनातच यशस्वी झाले नाहीत तर त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे.
Buddha Quotes in Marathi
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.– गौतम बुद्ध
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.– गौतम बुद्ध
भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.– गौतम बुद्ध
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो.– गौतम बुद्ध
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.– गौतम बुद्ध
शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, सगळी माणसे सारखीच आहेत.– गौतम बुद्ध
पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.– गौतम बुद्ध
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.– गौतम बुद्ध
ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंबदेखील त्याच्या हृदयात नाही.– गौतम बुद्ध
पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.– गौतम बुद्ध
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.– गौतम बुद्ध
दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.– गौतम बुद्ध
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.– गौतम बुद्ध
एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. – गौतम बुद्ध
जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे. – गौतम बुद्ध
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो -गौतम बुद्ध
तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही. तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे -गौतम बुद्ध
Gautam Buddha Quotes in Marathi
यशाचं कोणतेही गमक नाही. यश म्हणजे मेहनत, तयारी आणि अपयशातून मिळालेल्या शिकवणीचा योग्य परिणाम होय.- गौतम बुद्ध
ध्यानधारणा केल्याने बुद्धी वाढते, चिंतनाने अज्ञान नाहीसे होते. आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतात याचा मार्ग शहाणपणाने निवडा -गौतम बुद्ध
सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे – उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करूणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात-गौतम बुद्ध
तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते-गौतम बुद्ध
तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात.-गौतम बुद्ध
या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे.-गौतम बुद्ध
दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे. – गौतम बुद्ध
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. – गौतम बुद्ध
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. – गौतम बुद्ध
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. – गौतम बुद्ध
आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. – गौतम बुद्ध
जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.– गौतम बुद्ध
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. – गौतम बुद्ध
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Buddha Quotes in Marathi विचार कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.