मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे.आज मी या पोस्टमध्ये मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles लिहिली आहेत.अशीकोडी सोडवायला मजा येते आणि आपले बुद्धी पण तल्लख होते आणि आपल्या ज्ञानात पण भर होते.आपली विचार करण्याची गती वाढते.आपलं जनरल नॉलेज वाढतं .मराठी कोडी व उत्तरे हा खेळ आपण ग्रुप बनवून खेळावा मग आणखीन मजा येते.मी या लेखामध्ये उत्तम अशी मराठी कोडी (Riddles) लिहिली आहेत ती तुम्हीं जरूर वाचा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण ज्ञानात भर पडेल.
मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles and Answers
गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?
उत्तर -ताट
दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
उत्तर -काजवा
बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती
उत्तर-नारळ
दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते.
उत्तर-चप्पल
अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे
पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही,
आणि शहर आहे पण पाणी नाही
उत्तर – नकाशा
असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून
तुमचे कान पकडतो?
उत्तर – चष्मा
अशी कोणती वस्तू आहे
जी सर्व मुले खातात
परंतु त्यांना ती आवडत नाही?
उत्तर – पालकांचा मार किंवा ओरड
मी तरुण असतो तेव्हा उंच असतो
आणि जेव्हा मी म्हातारा होतो
तेव्हा मी ठेंगणा होतो,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – मेणबत्ती किंवा पेन्सिल
लोक मला खाण्यासाठी विकत घेतात,
पण ते मला कधीही खात नाहीत,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – प्लेट आणि चमचा
अशी कोणती गोष्ट आहे
जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.
उत्तर – तहान
एक वानर एक खारुताई
आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते,
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील ?
उत्तर – नारळाच्या झाडावर केळी नसतात
चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी बीना पानी,
18 चोर त्या शहरी 1 राणी,
आला 1 शिपाई
सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…
उत्तर – कॅरम बोर्ड गेम
आहे मला तोंड परंतु मी काहीच खात नाही,
दिसते मी झोपलेली, पण असते सारखी पळतही,
माझ्याशिवाय तुमचे, जगणेच शक्य नाही
मी कोण काढा शोधुन ?
उत्तर – नदी
नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण…?
उत्तर – कांदा
जगभर मी फिरतो,
पण जमिनीवर ठेवत नाही पाय,
दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो,
रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – चंद्र
मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर – वांगे
चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजार म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण
उत्तर – हातमोजे
बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती
उत्तर – नारळ
अशी कोणती गोष्ट आहेे,
जिचा रंग काळा आहे?
ती प्रकाशात दिसते…
पण अंधारात दिसू शकत नाही…
उत्तर -छाया (सावली)
माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
सांगा मी आहे कोण
उत्तर – कीबोर्ड
अशी कोणती गोष्ट आहे,
जी आपण जागी असल्यावर वर जाते
आणि झोपी गेल्यावर खाली येते.
उत्तर – डोळ्यांच्या पापण्या
एक रहस्य बॉक्स पाहिला,
ज्याला नाही कव्हर
किंवा लॉक केलेला नाही..
खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,
त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??
उत्तर – अंडी
तीन अक्षरांचे माझे नाव
वाचा उलटे किंवा वाचा सरळ
मी आहे प्रवासाचे साधन
सांगा पाहू माझे नाव
उत्तर – जहाज
एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
पहिल्या खोलीत भयानक आग असते
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे
उत्तर – तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही.
नसते मला कधी इंजीन
नसते मला कसलेही इंधन
आपले पाय चालवा भरभर
तरच धावणार मी पटपट
सांगा मी आहे तरी कोण ?
उत्तर – सायकल
प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे
तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता
परंतु उजव्या हाताने नाही
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर-उजवा कोपरा
बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- घड्याळ
तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
सांगा पाहू मी कोण?
उत्तर -वाहक {Conductor}
बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर- बासरी
पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- पेन
रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- नकाशा
प्रत्येकाकडे असते मी
सगळे सोडून जातील
पण मी कधीच सोडून जाणार नाही
उत्तर- सावली
ना खातो मी अन्न
ना घेतो मी तुमच्याकडून पगार
तरीही देतो पहारा दिवस रात्र
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर- कुलूप
ऊनात चालताना मी येतो
सावलीत बसता मी जातो
वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो
सांगा पाहू मी कोण
उत्तर- घाम
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती.
त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही.
असे का?
उत्तर – त्या माणसाच्या डोक्यावर केसच नव्हते.
पंख नाही तरीही उडतो,
हात नाही तरीही भांडतो…
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – पतंग
एका इमारतीच्या 25 व्या मजल्यावरील एक माणूस
खिडकी स्वच्छ करीत आहे.
अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो.
पण त्याला दुखापत होत नाही.
हे कसे शक्य आहे?
उत्तर – कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या
प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती.
जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही…
उत्तर – वय
रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे.
1 – मंदिर
2 – शाळा
3 – दवाखाना
मग सांगा,
सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
उत्तर – अँबुलन्स आग विझवित नाही.
तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल,
ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?
उत्तर – दहा रुपयाची अगरबत्ती घेईन
आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल.
असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही,
राहण्यासाठी महाल नाही
आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही,
तरीही तो राजा आहे.
उत्तर – सिंह
तुम्ही मला पाण्यात पाहू शकता
पण मी कधीही ओली होऊ शकत नाही,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – प्रतिबिंब
मी हवेपेक्षा हलका आहे परंतु
दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – बुडबुडा
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.