Sant Dnyaneshwar information in Marathi
आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.त्यांनी आपल्या ज्ञानाने मानव समाजाला जगण्याची योग्य दिशा दाखविली.संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत एकनाथ,संत जनाबाई,संत तुकाराम अशा अनेक संताची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे.आज आपण या महान संतापैकी संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत.म्हणूनच मी या लेखामध्ये Sant Dnyaneshwar information in Marathi लिहिली आहे.संत ज्ञानेश्वर हे प्राचीन भारतामधील एक अतुलनीय संत त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध मराठी कवी होते. तेराव्या शतकामधील एक महान संत असण्याबरोबरच ते महाराष्ट्राच्या
संतसंस्कृतीचे प्रमुख प्रणेते म्हणून त्यांची ओळख पुढे प्रचलित झाली. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून एक अमूल्य अशी भेट दिली.आज आपण या लेखामध्ये त्यांचा जन्म,त्यांचे बालपण, त्यांचे कार्य आणि त्यांची समाधी यांची सविस्तर माहिती बघणार आहोत
Sant Dnyaneshwar information in Marathi
संत ज्ञानेश्वर यांचा थोडक्यात परिचय
संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) हे 13 व्या शतकातील महाराष्ट्रीय संत आणि कवी होते ज्यांनी भक्ती चळवळीत मोठी भूमिका बजावली.संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले.
आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढपूरला जातात.संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून एक अमूल्य अशी भेट दिली. मानवतेला भक्ती त्याचबरोबर समता याची प्रामुख्याने समज दिली, मानवी समानतेचा उपदेश देखील दिला.
संत ज्ञानेश्वरांचा जन्म
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर असलेले आपेगाव हे या पूज्य संताचे जन्मस्थान आहे.
ज्ञानेश्वर महाराजांचे कुटुंब
विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई हे त्यांचे आईवडील होते वनिवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे होती.लहान वयातच वडिलांकडून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले.
ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्णी हे मुळचे आपेगाव पैठण या ठिकाणचे.पुढे विठ्ठलपंत काही कारणास्तव आळंदी या ठिकाणी आले. विठ्ठलपंत हे ईश्वर भक्तीत रममाण होते. सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा झाली. ज्ञानेश्वरांचे (Sant Dnyaneshwar Maharaj) वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळात संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले.आळंदीच्या शास्री-पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले. वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामूक झाली. निवृत्ती सात दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले. पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले. त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्ती नाथांना गुरू केले.
आई वडिलांच्या संस्कारात ही मुल लहानाची मोठी होऊ लागली पण समाज त्यांना जवळ करेना कारण ही संन्यास्यांची मुल म्हणून त्यांना समाज हिनवू लागला.त्यांची केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली. आई वडिलांच्या देह त्यागानंतर देखिल लोकांनी त्यांना त्रास देणं काही सोडलं नाहीं. एका संन्याशी व्यक्तींची मुलं म्हणुन त्यांना लोकं अन्न, पाणी देखिल देत नव्हते. ते भिक्षा मागायला गेले तर लोकं घराचे दरवाजे लावून घेत असतं. त्यांच्यावर दगड, सेनाचा मारा करत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते आपली विद्वत्ता सिध्द करण्यासाठी पैठण ला रवाना झाले. त्या काळी पैठण हे न्यायपीठ होतं. पुढे तिथे ही त्यांना प्रवास कठीणच करावा लागला.
संत ज्ञानेश्वरांचे काही चमत्कार
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते.श्रीक्षेत्र आळंदीच्या धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र मागितले. त्यामुळे ही भावंडे पैठण येथे गेली. पैठण येथील धर्मसभेमध्ये त्यांना अनेक सत्त्वपरीक्षांना सामोरे जावे लागले.
त्या वेळी समोरून ‘वाकोबा’ नावाचा कोळी आपल्या ‘गेनोबा’ नावाच्या रेड्यास घेऊन जात असतांना धर्मसभेतील एका धर्मपंडिताने ज्ञानदेवांना विचारले, ‘‘त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का ?’’ तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, ‘‘तोची माझा आत्मा ॥’’ ‘हे सिद्ध करून दाखव’, असे सांगितल्यावरून संत ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’ (ही ऋग्वेदाची पहिली ओळ आहे.)तेव्हापासून तो रेडा हा संत ज्ञानेश्वर यांचा पहिला शिष्य झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने संत ज्ञानेश्वर यांना शुद्धीपत्र बहाल केले.
आळंदीमध्ये विसोबा चाटी नावाचा ब्राह्मण होता. तो अतिशय सनातनी होता आणि साधू मुनींची खिल्ली उडवत असे. एकदा निवृतीनाथानी मुक्ताबाईला तव्यावरचे “मांडे” खाण्याची इच्छा वक्त केली. त्यांनतर आपल्या घरी ताव नसल्याने मुक्ताबाई तव्यासाठी संपूर्ण गावामध्ये फिरून तवा ची पाहणी करीत होती. तवा कुठेच गावामध्ये मिळत नव्हता आणि त्यांना गावामध्ये तवा कोण देत सुद्धा नव्हता. करणं त्या दुष्ट विसोबा ने पूर्ण गावामध्ये सांगून ठेवले होते. मुक्ताबाई ला कोणी तवा देऊ नये.
तवा मिळत नसल्याने मुक्ता बाई रडत बसल्या कारण जर “मांडे ” खायला नाही दिले तर दादा रागवणार हि भीती त्यांना होती . तेव्हा संत ज्ञानेश्वर यांनी मुक्ताबाई ना रडताना पाहिलें आणि त्यांनतर त्यांनी ते मांडे आपल्या पाठीवरती भाजायला लावले. त्यावेळी ते मांडे मुक्ताबाई ने त्यांच्या पाठीवर ते भाजले. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांची पाठ पूर्ण लाल झाली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन व सर्वोत्तम ग्रंथांतील एक म्हणून गणली जाणाऱ्या ‘ज्ञानेश्वरी’च्या लिखाणाला त्यांनी नेवासा येथे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुरुवात केली. यावरून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभेची कल्पना करता येते.ज्ञानेश्वरी या ग्रंथास ॔ भावार्थदीपिका॔ असेही म्हणतात.
ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ ‘अमृतानुभव’ हा होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म एक्याचा ग्रंथ आहे. यात 800 ओव्याचा समावेश आहे. चांगदेव पासष्टि” या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश दिला. चांगदेव हे महान योगी होते. ते 1400 वर्ष जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नाही, यासाठी संत ज्ञानेश्वराणि लिहिलेले 35 ओव्याचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टि ग्रंथ होय.
ज्ञानेश्वर महाराजांचे साहित्यिक योगदान केवळ शैक्षणिकच नव्हते, तर सामाजिक सुधारणेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे विचार भेद ओलांडतात आणि प्रेम आणि शौर्याचा संदेश देतात. त्यांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत आणि लोकांना प्रेम भक्तीचे महत्त्व विचार करायला भाग पाडतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीचा मूळ मंत्र होता – “ज्ञान देवा तुझे चरणी.” त्यांचे अध्यात्मिक तत्वज्ञान आणि शुद्ध भक्तीच्या सरावाने लाखो लोकांना त्यांचे अंतरंग समजले. त्यांच्या तात्विक विचारांमुळे आत्मा, ब्रह्मा आणि विश्वाचे सार समजून घेण्यात मदत झाली आणि मानवी जीवनाला आध्यात्मिक दिशेने प्रस्थापित करण्यात मदत झाली.
समाधी
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21 वर्षी आळंदी येथे ईद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली..१२९६ च्या कार्तिकाच्या शेवटच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी थेट आळंदी येथे समाधी घेतली. या हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन नामदेवांनी त्यांच्या “समाधीचे अभंग” या अभंगात केले आहे. ज्ञानेश्वरांच्या जाण्यानंतर, त्यांच्या भावंडांनीही या जगातून निघून जाणे पसंत केले.
आम्हांला आशा आहे की Sant Dnyaneshwar information in Marathi ही पोस्ट तुम्हांला नक्कीच आवडली असेल . तुम्हीं हा लेख इतर लोकांना पण शेयर करा ही नम्र विनंती.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१)संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?
संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावात ज्ञानेश्वरी हा मूळ मराठी ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वर यांचे भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हे एक महत्वपूर्ण निरुपण आहे.
२)ज्ञानेश्वरांनी समाधी कशी घेतली ?
ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे भूमिगत खोलीत समाधी घेतली.
३)संत ज्ञानेश्वरांची शिकवण काय होती ?
त्यांनी अनुयायांना धर्मग्रंथांवर विसंबून राहण्यास मनाई केली आणि एका निराकार देवावर विश्वास ठेवण्यास शिकवले . त्यांनी लोकांना इंद्रियसुखांपासून वर्ज्य केले आणि मद्यपान, विलासी जीवनशैलीपासून परावृत्त केले आणि लोकांना साधे जीवन जगण्यास प्रोत्साहित केले आणि जीवनाचे मुख्य उद्दिष्ट ईश्वरप्राप्ती होते.