Paneer Chilla Recipe in Marathi
सकाळी मुलांच्या शाळेत जायच्या गडबडीत डब्यासाठी झटपट होणारी डिश आहे. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये पनीर चिला बनवायचा असेल तर त्याची सोपी आणि झटपट Paneer Chilla Recipe in Marathi रेसिपी जाणून घ्या.
महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये अनेक प्रकार मोडले जातात. यातला एक कॉमन पदार्थ म्हणजे बेसनचा चिला. बेसनपासून बनवलेला चिला चविष्ट आणि जास्त आरोग्यदायी असतो. चिला बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची अशी एक पद्धत असते. काहीजण चिला बनवताना त्यात भाज्या एकत्र करून बनवतात. लहान मुलांना भाज्या फार कमी आवडतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी पनीर चिला बनवू शकता. मुलांना चीजमधून भरपूर प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात. पनीर चिला हा चवीला उत्तम आहे बनवायला देखील सोपा आहे. सकाळी मुलांच्या शाळेत जायच्या गडबडीत डब्यासाठी झटपट होणारी डिश आहे. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये पनीर चिला बनवायचा असेल तर त्याची सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या.
Paneer Chilla Recipe in Marathi
साहित्य
बेसन – २ कप
किसलेले पनीर – १ कप
कांदा – १ छोटा
हिरवी मिरची – २
कोथिंबीर – १/४ कप
चाट मसाला – १/२ चमचा
हळद – १/४ चमचा
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
तेल गरजेनुसार
कृती
पनीर चिला बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसनाचे पीठ घ्या.
त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा.
तयार केलेल्या मिश्रणात हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्स करा.
त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून तयार केलेले मिश्रण एकजीव करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल पसरून घ्या. पॅन गरम झाला की त्यात बेसनाचे मिश्रण घालून त्याचा गोलाकार पोळा काढून घ्या.
त्यावर किसलेले पनीर आणि चाट मसाला घाला.
आता मंद आचेवर पनीर चिला सोनेरी रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
तयार झालेला पनीर चिला एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खायला द्या.
हिरवी चटणी
आता आपण हिरवी चटणी कशी बनवावी हे बघून घेऊ.
साहित्य
मुठभर कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
10 बारा पुदिन्याची पाने
1 इंच आले
4 लसणाच्या पाकळ्या
1 टीस्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
2 टीस्पून दही
1 टीस्पून साखर
कृती
कोथिंबीर, पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
आले, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, साखर, मीठ मिक्सर जारमध्ये घालून पाणी न वापरता वाटून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, दोन चमचे दही घालून चांगले बारीक वाटून घ्या
खुप छान टेस्टी हिरवी चटणी तयार होते.