Palak recipe in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी या लेखामध्ये Palak recipe in Marathi लिहिली आहे.पालक ही भाजी मानवी शरीराला खूप फायदेशीर आहे.म्हणून मी यामध्ये पालक भाजीची काही रेसिपी लिहिल्या आहेत.टेस्टमुळे अनेक लोक हिरव्या पालेभाज्या खाणे टाळतात. पण मित्रांनो हे लक्षात घ्या की, पालक एक असे सुपरफूड आहे, ज्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत. म्हणूनच आपण पालक खायलाच पाहिजे.
पालक (Spinach) सगळ्यात पोषककयुक्त भाजी आहे. ज्यामध्ये एक नाही तर असंख्य पोषकतत्व लपलेले आहेत. न्यूट्रिएंट्सचा खजाना म्हणून या भाजीला संबोधलं जातं. पालकमधून शरीराला पुरेशा प्रमाणात आर्यन, फायबर, विटामीन मिळते. हिवाळ्यात अतिशय हिरवा गार पालक तुम्ही आहारात नक्कीच घेऊ शकता.
Palak recipe in Marathi
पालक वडी
रोजच्या जेवणात आपल्याला काहीतरी तोंडी लावायला चटकदार हवं असत. अशावेळी आपण लोणचं, पापड, चटणी, वड्या असे अनेक पदार्थ खातो. आपल्या भारतीय थाळीमध्ये तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवल्या जातात.यात कोथिंबीर वडी, अळूची वडी अधिक आवडीने खाल्ली जाते. शक्यतो ज्या पालेभाज्या खाण्यासाठी घरातले नाकं मुरडतात, अशा पालेभाज्यांची वडी (Palak Vadi) बनवली तर ती चटकन खाल्ली जाते(Palak Vadi Recipe).
पालक (Crispy Palak Vadi) ही अशी पालेभाजी आहे, जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाच फारशी आवडत नाही. याच पालकचा वापर करुन आपण झटपट होणारी टेस्टी पालक वडी (Healthy Palak Recipe) बनवू शकतो. जेणेकरुन तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत असा पदार्थ होईल व पालक देखील खाल्ला जाईल. एक जुडी पालक वापरुन आपण खमंग खुसखुशीत पालकाच्या वड्या बनवू शकतो. पालक वडी कशी बनवावी याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य
१. पालक – अर्धी जुडी (बारीक चिरलेली)
२. बेसन – १ कप
३. तांदळाचे पीठ – १/२ कप
४. सफेद तीळ – १/२ टेबलस्पून
५. जिरे पावडर – १ टेबलस्पून
६. धणे पावडर – १/२ टेबलस्पून
७. हळद – १/२ टेबलस्पून
८. लाल मसाला – १ टेबलस्पून
९. लसूण मिरची पेस्ट – १ टेबलस्पून
१०. कोथिंबीर – १ कप
११. गुळ आणि चिंचेचा कोळ – १/२ टेबलस्पून
१२. ओवा – चिमुटभर
१३. मीठ – चवीप्रमाणे
१४. तेल – तळण्यासाठी
१५. पाणी – गरजेनुसार
कृती
१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला पालक घ्यावा.
२. यात बेसन, तांदळाचे पीठ, सफेद तीळ, जिरे पावडर, धणे पावडर, हळद, लाल मसाला घालावा.
३. त्यानंतर यात लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, गुळ आणि चिंचेचा कोळ, ओवा, चवीनुसार मीठ घालावे.
४. आता हे मिश्रण एकजीव करून थोडेसे पाणी घालून जाडसर पीठ मळून घ्यावे.
५. त्यानंतर एका चाळणीला तेल लावून त्यात तयार मिश्रण ठेवून ते व्यवस्थित वाफवून घ्यावे.
६. वाफवल्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात.
७. या वड्या गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
पालक वडी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम पालक वडी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.
पालक – बटाट्याची भजी
पाऊस पडला की गरमागरम भजी खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. भजी अनेक प्रकारची केली जाते. बटाटा, कांदा, पालक किंवा इतर भाज्यांची भजी केली जाते. कांदा – बटाट्याची भजी आपल्याकडे आवडीने खाल्ली जाते.
पण आपण कधी पालक – बटाट्याची भजी खाऊन पाहिली आहे का? पालक – बटाट्याची भजी करणं तशी सोपी सोपी आहे.काही वेळात झटपट तयार होते. यासाठी आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही. झटपट काही मिनिटात पालक – बटाट्याची भजी तयार होतील शिवाय आपणही भजी खास टिफिनसाठीही देऊ शकता . पालक – बटाट्याची भजी करण्याची योग्य पद्धत आपण आता पाहूयात.
साहित्य
१.पालक
२.बटाटा
३.बेसन
४.हिरवी मिरची
५.हळद
६.लाल तिखट
७.ओवा
८.जिरं
९.आलं – लसूण पेस्ट
१०.मीठ
११.कोथिंबीर
१२.तांदुळाचं पीठ
१३.बेकिंग सोडा
कृती
१.सर्वात आधी बटाट्याचे साल काढून, किसून घ्या. एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली पालक घाला. नंतर त्यात एक वाटी बेसन, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, ओवा, जिरं, आलं – लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
२.नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. शेवटी २ चमचे तांदुळाचे पीठ आणि चिमुटभर खायचा सोडा घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं भज्यांचे बॅटर तयार.
३.दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बॅटरचे छोटे गोळे सोडून तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी पालक बटाट्याची भजी खाण्यासाठी रेडी. पाऊस पडल्यानंतर आपण या भजीचा आस्वाद नक्कीच लुटू शकता.
Palak recipe in Marathi ही रेसिपी तुम्हांला नक्की आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो.हे रेसिपी तुम्हीं तुमच्या घरी नक्की करून बघा आणि हे रेसिपी तुम्हीं इतरांना पण शेयर करा.