Nachni recipe in Marathi
Nachni recipe in Marathi या पोस्टमध्ये आपण नाचणीच्या काही रेसिपी बघणार आहोत.नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.अशक्तपणा दूर होतो.कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.म्हणून मी या लेखामध्ये नाचणी च्या काही हेल्दी रेसिपी लिहिल्या त्या तुमच्या घरी नक्की करून बघा .
Nachni recipe in Marathi
नाचणी कटलेट
नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीची भाकरी खाण्यास कंटाळा करणारी मुलं, नाचणीपासून बनवलेले कटलेट मात्र आवडीने खातील, यात शंकाच नाही! नाश्त्यासाठी हेल्दी आणि चविष्ट नाचणीचे कटलेट बनवा. चला तर मग जाणून घेऊया नाचणीचे कटलेट कसे बनवायचे ते.
साहित्य
1 टीस्पून धने पावडर
1/4 कप नाचणीचे पीठ
1 कांदा
1 टीस्पून लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
4 चमचे ब्रेड क्रम्ब्स
2 उकडलेले बटाटे
2 टीस्पून ऑइल
1 गाजर
1 टीस्पून लाल मिरची पावडर
1/2 टीस्पून गरम मसाला पावडर
2 टीस्पून ऑइल
कृती
सर्व प्रथम कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. दोन्ही वस्तू एका भांड्यात ठेवा.
आता उकडलेले बटाटे मॅश करा. मॅश केलेले बटाटे चिरलेल्या भाज्यांसह एकमेकांत मिसळा.
आता त्यात नाचणीचे पीठ, मीठ, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि लसूण पेस्ट घाला. ते चांगले मिसळा आणि त्याचे मिश्रण तयार करा. त्यात तीन ते चार चमचे पाणी घालून परत एकदा चांगले मिसळा.
एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्ब्स ठेवा. तयार मिश्रणापासून लहान कटलेट बनवा आणि ब्रेड क्रम्ब्समध्ये रोल करा.
आता कढईत तेल गरम करून त्यात कटलेट टाका. कटलेट गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा. त्यात चवीनुसार इतर मसाले देखील टाकू शकता. ते अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवण्यासाठी त्यात इतर भाज्याही तुम्हीं टाकू शकता.
नाचणीचे लाडू
सकाळच्यावेळेस नाश्ता करण्यासाठी प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही. अशावेळी लाडू, पौष्टीक चिवडा यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.अनेकांना डायबिटीस असतो तर काहीजण वजन वाढण्याच्या भितीने साखर खात नाहीत अशावेळी तुम्ही साखर, गूळ न वापरता नाचणीचे पौष्टीक लाडू बनवू शकता.
हे लाडू करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत लागणार नाही अगदी कमीत कमी वेळात तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता.या लाडूंमध्ये तुम्ही आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रुट्स किंवा भोपळ्याच्या बीया, मिक्स बीयाद्धा घालू शकता.नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर्स, प्रोटीन असते ज्यामुळे तब्येतीसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात. गर्भवीत महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
साहित्य
नाचणीचे पीठ
२ वाटी साजूक तूप
ड्रायफ्रुट्स
बिया काढलेले खजूर
मीठ
कृती
सगळ्यात आधी एका कढईत नाचणी भाजून घ्या. नाचणी भाजायला ८ ते १० मिनिटं लागतील. नाचणी भाजताना सतत चाळत राहा. नाचणी चाळल्यानंतर एका ताटात काढून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात मीठ आणि नाचणी घालून नाचणी बारीक करून घ्या. त्यात २ वाटी साजूक तूप घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. १० ते १२ मिनिटं तूप आणि नाचणी व्यवस्थित भाजून घ्या. याचा सुवास संपूर्ण घरात दरवळेल.
नाचणीचे पीठ एका भांड्यात काढून कढईत बीया काढलेले खजूर व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घ्या. एका ताटाला तूप लावून त्यात खजूर, भाजलेले ड्रायफ्रट्स काढून घ्या.
त्यात नाचणीचे पीठ घाला. हे सर्व साहित्य मिक्सरला लावून बारीक करून घ्या. बारीक केलेलं मिश्रण एका ताटात काढून या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू करून घ्या.आता तयार आहेत पौष्टीक नाचणीचे लाडू.
नाचणीची इडली
महाराष्ट्रीय कुटुंबात रविवारचा नाश्ता म्हणजे काहीतरी वेगळं खायला मिळणार, असं ठरलेलं असतं.अशा वेळी कांदेपोहे, उपमा, शिरा, मेदू वडा, इडली, डोसा, असे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. पण, आज आपण रविवारच्या नाश्त्यासाठी खास रोजच्या इडलीपेक्षा वेगळी अशी नाचणीची इडली कशी बनवतात ती रेसिपी पाहणार आहोत. बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी चवीलाही वेगळी आहे.तर आता आपण पाहूयात नाचणीची इडली कशी बनवतात ते.
साहित्य
नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) – दोन वाट्या
उकडा तांदूळ – दोन वाट्या
उडीद डाळ – एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.
कृती
सर्वप्रथम उदीड डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यांत भिजवून ठेवा. मेथीचे दाणेदेखील एका भांड्यात भिजवत ठेवा. जवळपास पाच तास हे असेच ठेवायचे.
त्यानंतर तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटून घ्या आणि उडीद डाळ आणि मेथीही एकत्र वाटा. सगळं वाटून झालं की, नीट एकजीव करा. चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण शक्यतो रात्री फुगण्यासाठी ठेवा. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगेल. शक्यतो हे मिश्रण मोठ्या भांड्यात ठेवा. कारण- ते खूप फुगलं, तर ते भांड्यातून बाहेर सांडतं.
त्यानंतर पीठ पुरेसं फुगलं की डावेनं हळूहळू ढवळा. यामुळे पीठ चांगलं एकजीव होतं.
त्यानंतर इडली बनविण्याच्या भांड्यातच पुरेसं पाणी घ्या. त्यातील साचांना व्यवस्थित तेल लावून, त्यात पीठ घाला.
पाणी उकळलं की, त्यात इडलीचा साचा ठेवून झाकण लावा. १२-१३ मिनिटं इडल्या चांगल्या वाफवा. वाफेद्वारे येणाऱ्या वासावरून तुम्हाला अंदाज येईल की, इडल्या तयार झाल्या आहेत की नाही. आता तयार इडल्या थोड्या थंड झाल्यावर त्या एका डिशमध्ये काढा. अशा प्रकारे तयार नाचणीच्या इडल्या तुम्ही चटणी किंवा सांबाराबरोबर खाऊ शकता.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हीं या Nachni recipe in Marathi तुमच्या घरी बनवून नक्की बघा आणि आम्हांला comments करून कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.