Chanakya niti marathi suvichar
या लेखामध्ये आपण Chanakya niti marathi suvichar लिहिले आहेत.भारतातील एक महान विद्वान, तत्वज्ञानी म्हणून आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना ओळखतो. आचार्य चाणक्य हे खूप मोठे तत्वज्ञानी होते, तसेच ते एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणीदेखील होते. आचार्य चाणक्य यांचे विचार खूपच महान होते.
चाणक्यांनी चिंतन करून निरनिराळ्या विषयावर ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आजही त्यांचे मार्गदर्शन आणि ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. शिवाय आर्य चाणक्यांचे ज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात सुखी आणि समाधानी होण्यासाठी उपयोगी ठरते.जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीचे पालन केले तर त्याला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा वेळी या नवीन वर्षात चाणक्याचे काही विचार लक्षात ठेवले तर यश निश्चित आहे.
Chanakya niti marathi suvichar
परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत, मात्र जीभ एकच आहे.याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे मात्र बोलावे मोजकेच…
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो.ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…
ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा, जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो, त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.अशा लोकांना दुर्बल समजले जाते.अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते
साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.
दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.
जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही
इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे.
सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल.
एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देने व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देने व्यर्थ आहे.
आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :-1) आनंदात वचन देवु नका.2) रागामध्ये उत्तर देवू नका.3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.
बुद्धीमान व्यक्ती तीच आहे,जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही,घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही,पैशांचा अपव्यय करत नाही,आयुष्यात मिळालेला धोका, अपमानआणि मनातील चिंता स्वतः पुरतीच मर्यादित ठेवते.
जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका, काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल,प्रयत्न केल्यावरच मिळेल.
कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ.कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे,त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि.ज्याला तुमच्यावर विश्वास नाही, तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.
जर तुम्ही दुःखी असाल तर,तुम्ही भुतकाळात जगत आहात हे ओळखा.जर तुम्हाला चिंता सतावत असेल,तर तुम्ही भविष्यकाळात जगत आहात हे ओळखा.जर तुम्ही शांत असाल तरच,तुम्ही वर्तमानकाळात जगत आहात.
जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचेही लाभ होईल,कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे.आणि कोणावर दया कराल तर तो,तुम्हाला याद करेल,कारण दयाचा उलट शब्द याद आहे.
एका राजाची ताकत त्याच्या शक्तीशाली हातात असते, विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्य, तारूण्य आणि मधुर वाणीत असते.
जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही.
आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका,ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही,त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात.स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची हि सवय तुमच्यासाठीघातक सिद्ध ठरू शकते.
फुलाचा सुगंध फक्त वातावरणात पसरतो, पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात.
जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरुवात केली, तर तोही एक दिवस कंगाल बनेल.
बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो,त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्या शिवाय पहिले स्थान सोडू नका.
कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते ,कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते, जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल.
ज्याप्रमाणे नशा करणाऱ्या व्यक्तीला बरोबर कि चूक याची जाणीव नसते,स्वार्थी व्यक्तीला देखील बरोबर कि चूक हे समजत नाही.मुळात स्वार्थ हाच खूप मोठा नशा आहे.
तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आई वडिलांवर वापरू नका, विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे.
जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही, जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात.
तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं, कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.
जो मित्र तुमच्यासमोर गुळगुळीत बोलतो आणि तुमच्या पाठीमागे तुमचे काम बिघडवतो त्याला सोडून दिलेले बरे. चाणक्य म्हणतात की तो मित्र एखाद्या भांड्यासारखा असतो ज्याच्या वरच्या बाजूला दूध असते पण आत विष भरलेले असते.
ब्राह्मणांचे सामर्थ्य हे विद्या आहे, राजांचे सामर्थ्य हे त्यांचे सैन्य आहे, वैश्यांचे सामर्थ्य हे त्यांचे धन आहे आणि शूद्रांचे बळ इतरांची सेवा करण्यात आहे. ज्ञान प्राप्त करणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. सैनिकांनी आपले बळ वाढवत राहणे हे राजाचे कर्तव्य आहे. व्यापाराने संपत्ती वाढवणे हे वैश्यांचे कर्तव्य आहे, लोकांची उत्तम सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हीं हे Chanakya niti marathi suvichar वाचले असतील तर अशे मी गृहीत धरतो.तुम्हीं हे सुविचार इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.