Mhani in Marathi|मराठी म्हणी व अर्थ
मी या लेखामध्ये Mhani in Marathi|मराठी म्हणी व अर्थ लिहिल्या आहेत.म्हणी म्हणजे एक अशी लोकप्रिय वचनं किंवा सुभाषितं जी आपल्या जीवनातील सत्य, अनुभव, किंवा नैतिकता सांगणारी असतात. उदाहरणार्थ, “गाढव मेलं ओझ्याने अन् शिंगरू मेलं हेलपाट्याने अशी एक म्हण आहे.
Mhani in Marathi|मराठी म्हणी व अर्थ
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा-क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी-थोडक्यात, हव्या असलेल्या गोष्टीला आधी ‘नकार’ द्यायचा, आणि नंतर ती मिळवण्यासाठी काहीतरी कारण शोधायचं
अचाट खाणे अन् मसणात जाणे -खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
अडला हरी, गाढवाचे पाय धरी-एखाद्या बुद्धिमान मानसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते .
अडाण्याचा गेला गाडा, वाटेवरची शेते काढा -अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .
अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही-कोणत्याही गोष्ट / काम पूर्णत्वास नेताना काही ठरविक साच्यातील अनुभवांना /टप्प्यांना सामोरे जावे लागते . जसे तोंडातून चावल्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने आपण नेहमी अन्नग्रहण करू शकत नाही .
अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली- अनुभवातून माणसाला ज्ञान प्राप्त होते.
अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये-ज्या मनुष्याची ओळख देख नाहीं त्यास जरुर तर खाण्यापिण्यास द्यावें पण घरीं आश्रय देऊं नये. अपरिचिताशीं संबंध दुरुन दुरुनच ठेवावा, फारशी लगट करुं नये. नाहींतर पश्चात्तापास कारण व्हावयाचें.
अपमानाची पोळी, सर्वांग जाळी -अपमान करुन एखाद्यानें खावयास घातलें असतां त्या अन्नानें शरीरास समाधान वाटावयाच्या ऐवजीं अतिशय संताप होत असतो
अपापाचा माल गपापा-लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
अल्प बुध्दी, बहु गर्वी – कमी बुद्धीच्या माणसास गर्व अधिक असतो
अळी मिळी गुपचिळी-आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ-अयोग्य माणसाची संगतकेल्याने प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात.
असतील शिते तर जमतील भूते-एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्याभोवती माणसे जमा होतात.
असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी-स्वत: काहीही उद्योग न करता देवावर विसंबून सर्व सुखाची अपेक्षा करणे
अस्तुरीचा बात अन् इड्याले नको काथ-मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतो.
अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो .
आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे
अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो , त्याचे मुळीच काम होत नाही
अंगात चोळी आणि गावाला आरोळी-असमाधनी लोकांना देवाचा आधार
अंगापेक्षा बोंगा जड – परिस्थितीपेक्षा अवडंबर खूप असणे
अंथरूण पाहून पाय पसरावेत-ऐपत पाहून खर्च करावा
अंधारात केले पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखाद्यी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येते.
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये -ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते
एक घाव दोन तुकडे -एकाच झटक्यात वादग्रस्त गोष्टींचा निकाल
एक ना धड भाराभर चिंध्या- सगळेच निरोपयोगी आणि अपूर्ण
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात – दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा
एकटा जीव सदाशिव – एकट्या माणसाला कशाचीही काळजी नसते.
एकदा कानफाट्या नांव पडले की पडलेच
एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे- एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे
इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिति निर्माण होणे .
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच-माणसाचा मूळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी-संसारिक स्थिती सारखीच चांगली नसते.
कर नाही त्याला डर कशाला?-ज्या मनुष्यानें एखादा अपराध केलेला नसेल त्याला त्याबद्दलची भीति वाटण्याचे कारण नाही. ज्याच्या अंगी दोष नसतो तो उजळ माथ्यानें फिरतो. जो अपराधी असतो त्याला नेहमी धास्ती वाटत असते
करायला गेलो एक अन् झाले एक- करायचे होते एक आणि झाले भलतेच
काखेत कळसा अन् गावाला वळसा -काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा होईल.
कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर -आपण कानांनी जे ऐकतो, त्यापेक्षा डोळ्यांनी जे पाहतो, त्यावर अधिक विश्वास ठेवा
कानामागून आली नि तिखट झाली – मागून येऊन वरचढ होणे.
कानाला ठणका नि नाकाला औषध – रोग एकीकडे औषध भलतीकडे
कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी – काम साधण्यापुरते गोड बोलणे
काळ आला होता पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे असा होतो
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते
कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?-कुंपणानेच शेत खाणे म्हणजे ज्याने राखावे,रक्षण करावे सांभाळावे अशी अपेक्षा होती त्यानेच स्वतः संभाळायला दिलेल्या मालमत्तेची चोरी करणे
खाऊन माजावे पण टाकून माजू नये-पैशाचां, संपत्तीचा गैरवापर करू नये
खाण तशी माती-आई- बाळाप्रमाणेच मूले
इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिति निर्माण होणे .
इन मिन साडेतीन – एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे
गाढवाला दिला मान, त्याने केले उभे कान-मूर्खाचा थोडासा आदर केला असतां तो लागलीच अभिमानानें फुगतो.
गरजवंताला अक्कल नसते-गरजू माणूस वाटेल ते दूषण लावून घेण्यास व बोलणी ऐकण्यास साहजिक तयार असतो. तो अगतिक बनतो व शहाणा असून मूर्ख ठरतो
गरज सरो अन् वैद्य मरो- ज्याने आपली गरज भागविली त्याला विसरून जाणे
गरजवंताला अक्कल नसते-गरजू माणूस वाटेल ते दूषण लावून घेण्यास व बोलणी ऐकण्यास साहजिक तयार असतो. तो अगतिक बनतो व शहाणा असून मूर्ख ठरतो
गरीबानं खपावं, धनिकानं चाखावं
कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच-मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
गाढव मेलं ओझ्याने अन् शिंगरू मेलं हेलपाट्याने-मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्व कळत नाही. कमाई साठी कष्ट करणारा ऐवजी लायकी नसलेला निरुपयोगी माणूस ती कमाई उपभोगतो
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता-मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो
गाढवाला गुळाची चव काय?-ज्याला एखाद्या गोष्टीचा काही उपयोग नाही, त्याला ती गोष्ट देणे व्यर्थ आ
गोरा गोमटा कपाळ करंटा – नुसते देखणेपण पण काही कामाचे नसते.
उंदराला मांजर साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे .
उडाला तर कावळा , बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते .
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की , तिच्या मागोमाग हाजी -हाजी करणारेही येतातच .
घरात नाही खायला, बायको बसली कांडायला-कोणत्याही गोष्टींची पूर्वतयारी न करता एन वेळेला धावपळ करणे
घर ना दार, वार्यावर बिर्हाड -फकिरासारखे जीवन जगणे
कावळा बसायला अन् फांदी तुटायला – एकाचा दुसऱ्या गोष्टीशी काहीही संबंध नसताना योगायोगाने त्यांचे एकाच वेळी घडणे
जनात एक मनात एक-दुटप्पी वर्तनाचा मनुष्य
चमत्कारा वाचून नमस्कार नाही आणि पराक्रमावाचून पोवाडा नाही-काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाही.
चढेल तो पडेल – गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही
चव ना ढव, दडपून जेव – स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणेजनात बुवा आणि मनात कावा:- बाह्य जगात बुवा, पण मनात कपट
जन्मा आला हेला, पाणी वाहता-वाहता मेला – अडाणी माणसाचे आयुष्य काबाडकष्ट करण्यातच व्यतीत होते
जसा भाव तसा देव -ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते
तोंड दाबून बुक्क्यांचा भार – आपले नुकसान होत आहे तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती
तहान लागल्यावर विहीर खणणे – एखाद्या गोष्टीची गरज पडल्यावरच त्यावर उपाय शोधणे
तळे राखी तो पाणी चाखी- ज्याच्याकडे काही वस्तू रक्षणासाठी ठेवलेली असते, त्या वस्तूचा तो स्वतः च उपयोग करून घेतो
बडा घर पोकळ वासा -दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव, नाव मोठे लक्षण खोटे
बडे बाप का बेटा-बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा
देवाची करणी नारळात पाणी -परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्यानं होत नाही
देव तसे धुपाटणे, न्हावी तसे थापटणे – जशासे तसे
देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे वागणे
देणे नास्ती, घेणे नास्ती – एखाद्या गोष्टीशी कसलाही संबंध नसणे
चोर तो चोर वर शिरजोर- गुन्हा करून वर मुजोरी
ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्या झाल्या हरण्या.
तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
थेंबे थेंबे तळे साचे.
थोडक्यात नटावे अन् प्रेमाने भेटावे.
दगडापेक्षा वीट मऊ- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.
डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही- कोणतीच गोष्टसाध्य होत नाही.
हत्ती गेला अन् शेपुट राहिले -एखादे काम बुहतांशी पूर्ण झाले आहे आणि एका किरकोळ मुद्द्यासाठी ते काम अडले असेल, तर त्याचे वर्णन सर्रास ‘हत्ती गेला अन् शेपूट राहिले’ असे केले जाते.
हसतील त्याचे दात दिसतील.
हातचे सोडून पळत्याच्या मागे-आपल्याकडे असणारी एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्यापेक्षा आपल्याकडे जी गोष्ट नाही तिचा हव्यास करणे किंवा ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे
हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात – सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात.
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला ही Mhani in Marathi|मराठी म्हणी व अर्थ Post कशी वाटली ते तुम्हीं आम्हांला comment करून कळवा आणि इतरांना पण शेयर करा.