Appe Recipe in Marathi

Appe Recipe in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friend सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या Blog वर स्वागत आहे.आज आपण Appe Recipe in Marathi या Post मध्ये आप्पे कशे बनवायचे याची recipe बघणार आहोत.आप्पे हा दक्षिण भारतातील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.आता तो भारतात बहुतेक ठिकाणी बनवला जातो.आप्पे चवीला खूप भारी आहे.साधारणपणे आप्पे नाश्त्याला बनवले जातात.सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी असली की, मनसोक्तपणे अगदी पोटभर हा नाश्ता करावा वाटतो.आप्पे ही रेसिपी अतिशय सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे आपण घरातील साहित्यांचा वापर करून आप्पे बनवू शकतो.आपल्या महाराष्ट्रात आप्पे कधी फेमस झाले हे समजलं पण नाही.चला तर मित्रांनो आपण Appe Recipe in Marathi बनवायला शिकूयात.

Appe Recipe in Marathi

Appe Recipe in Marathi

 रव्याचे आप्पे

     साहित्य

  • 400ml ताक
  • 200 ग्रॅम रवा
  • 1 लहान कांदा बारीक चिरलेला
  • पाव कप मटरचे दाणे(ताजे)
  • पाव कप किसलेले गाजर
  • अर्धा कप किसलेले ताजे खोबरे
  • पाव टीस्पून हिंग
  • अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ हिरवी मिरची बारीक चिरून
  • अर्धा टीस्पून मोहरी
  • ५-६ कढीपत्ता बारीक चिरून
  • १ टीस्पून मीठ
  • तेल

 

     कृती  

  • सर्वप्रथम रव्याला हलके भाजून घ्यावे.मिश्रण ‌बनविण्यासाठी एका मोठ्या भांड्यात रवा घालून त्यात खोबरे कोथिंबीर ताक घालून चांगले मिक्स करून घ्यावे.मिक्स करताना त्यात गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत.
  • फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करून कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात . नंतर कांदा घालून मऊ होईपर्यंत परतावा .
  • कांदा मऊ झाला की त्यात मटारचे दाणे, किसलेले गाजर घालून शिजवून घ्यावेत . २ मिनिटांत भाज्या शिजल्या की त्या आप्प्यांच्या मिश्रणात मिसळून घ्याव्यात.आता त्याच्यात खाण्याचा सोडा , आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण झाकून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावे.
  • दहा मिनिटांनंतर मोठ्या आचेवर आप्पेचे भांडे गरम करून घ्यावे . भांड्यात अगदी थोडे तेल घालून घ्यावे . आच मंद करावी आणि साच्यांत आप्प्यांचे मिश्रण चमच्याने घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
  • ५ मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटी करून दुसऱ्या बाजूने ही कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यावेत.
  • आता तुम्हीं आप्पे नारळाच्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता.

 

मिश्र डाळीचे आप्पे

     साहित्य

  • १ वाटी उडीद डाळ
  •  १ वाटी मुगाची डाळ
  • २ चमचे मेथी दाणे
  • ४ वाट्या तांदूळ
  •  २ वाट्या हरबरा डाळ
  • २ वाट्या पोहे
  • भाज्या आवडीनुसार (पर्यायी)
  • तेल
  • ८-९ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • जिरे
  • चवीनुसार मीठ

 

     कृती

  • २ वाटी हरभरा डाळ ,४ वाटी तांदूळ,२ वाटी पोहे , १ वाटी मूग डाळ,१ वाटी उडीद डाळ,हे सर्व साहित्य एकत्र करून 3- ४ वेळा पाण्याने धुऊन टाका.नंतर त्यात पाणी टाकून ६ तास भिजत ठेवा.
  • भिजलेले मिश्रण नंतर मिक्सरमध्ये वाटून बारीक रवाळ पेस्ट करून घ्या.
  • वाटलेली पेस्ट एका स्टीलच्या भांड्यात काढून रात्रभर दमट जागेवर झाकून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं मिश्रण छान टम फुगलेल दिसेल त्याला चमच्याने चांगले हालवून घ्या.
  • त्यामध्ये आता मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरव मिरची,आले आणि जिरे टाका.
  • चवीनुसार मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर नि आवडीनुसार भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिश्रण हे खूप पातळ पण नसले पाहिजे आणि घट्ट पण नसले पाहिजे.मिश्रण मिडीयम असले पाहिजे.
  • आता हे मिश्रण तयार झालं. आता गॅसवर अप्पेच भाडं ठेऊन गरम करून घ्या. नि भांड्याला आतून तेल लावून घ्या.
  • आता वरील बनवलेलं अप्पेच मिश्रण भाड्यात टाकून ४-५ मिनिटे झाकण ठेऊन अप्पे लालसर होईपर्यंत भाजून घ्या नि अप्प्याना पलटी मारून वरतून तेल टाकून दुसऱ्या पण बाजूने तसेच भाजून घ्या.आता आप्पे खायला रेडी आहेत.

 

डोसा बॅटरचे आप्पे

     साहित्य

  • ३ वाट्या उकडीचा किंवा साधा तांदूळ किंवा इडलीचा रवा असल्यास अडीच वाटी
  • एक वाटी उडीद डाळ
  • पाव वाटी जाड पोहे
  • तेल
  • चवीनुसार मीठ

 

     कृती

  • सकाळी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला.
  • रात्री दोन्ही साहित्य मिक्सरमध्ये वाटून एकत्र करुन एका भांड्यात ठेऊन द्या. रात्री उडीद डाळ वाटल्यावर त्यात रवा मिक्स करुन थोडे पाणी घालायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण वर आलेले असेल.
  • मिश्रणात अर्धा वाटी पोहे भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या.पीठ डोशाच्याच पिठाप्रमाणे पातळ ठेवा.त्यामध्ये मीठ घालून चांगले ढवळून घ्या.
  • आप्पे बनवायचे भांडे चा़गले तापवा.त्यात तेल टाकून घ्या.आप्पेपात्राच्या भांड्याच्या वाट्यात मिश्रण टाकून ५-६ मिनटे मध्यम आचेवर। शिजू द्यावे.
  • दुसऱ्या बाजूने पण परतून घ्या आणि चांगले खरपूस भाजून घ्या.आता आपले डोसा बॅटरचे आप्पे तयार आहेत.

 

साबुदाणा आप्पे

     साहित्य

  • भिजलेला साबुदाणा
  • उकडलेला बटाटा
  • हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • शेंगदाणे कूट
  • जिरे
  • शेंगदाणे
  • आल्याचे तुकडे
  • वरीचे पीठ
  • आलं – मिरची पेस्ट
  • साखर

 

     कृती

  • रात्रभर साबुदाणे भिजत ठेवा. बटाटा उकडून मॅश करून घ्या
  • एका भांड्यात भिजलेला साबुदाणा काढून घेणे.
  • त्यात वरीचे पीठ, जिरे, चिरलेली कोथिंबीर (हवी असल्यास), मॅश केलेला बटाटा, शेंगदाणे कूट, मीठ, साखर, आलं मिरची पेस्ट हे सर्व मिक्स करून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या.
  • हाताने व्यवस्थित मळून त्याचा गोळा करून घ्या आप्पे पात्रात तेल घाला. त्यात साबुदाण्याचे बनवलेले गोळे घाला. दोन्ही बाजूने खरपूस भाजा. साबुदाण्याचे आप्पे तयार आहेत.
  • दुसऱ्या बाजूला शेंगदाणे, मिरची, आलं, मीठ, कोथिंबीर, साखर घालून मिक्सरमधून जाडसर चटणी वाटून
  • घ्या आणि आप्पे यासह खायला घ्या.

 

आप्पे बरोबर लागणारी चटणी

     साहित्य

  •  २ चमचे फुटण्याच्या डाळ्या
  • अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे
  •  अर्धी वाटी ओला नारळ
  • कोथिंबीर
  • आलं
  •  २ चमचे साखर
  • १ चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  •  ५-६ हिरवी मिरच्या
  • २ चमचे तेल
  • १ चमचा उडीद डाळ
  •  मोहरी
  • जिरे
  •  कडीपत्ता

 

     कृती

  • २ चमचे फुटण्याच्या डाळ्या,अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे कोथिंबीर, ५-६ हिरवी मिरच्या, आलं,अर्धी वाटी ओला नारळ, १ चमचा लिंबाचा रस, २ चमचे साखर , चवीनुसार मीठ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून चटणी करा.
  • आता आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे
  • एका पॅनमध्ये २ चमचे तेल टाकून गरम करून घ्या नि त्यात मोहरी, जिरे, १चमचा उडीद डाळ, कडीपत्ता टाकून तडका करून घ्या नि चटणीत टाका.
  • अशा प्रकारे चटणीला तडका देऊन चटणी तयार झाली.

 

आप्पे या चटणी बरोबर खायला मस्त लागतात.

 

तुम्हीं ही Appe Recipe in Marathi तुमच्या घरी नक्की बनवून बघा तुम्हांला नक्की आवडेल.तुम्हीं ही Recipe इतरांना पण शेयर करा ही विनंती.

 

Read MoreDhokla Recipe in Marathi

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts