Blogging Meaning in Marathi
सध्या या वर्तमानकाळात Online मार्गाने पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत . त्यापैकी एक आहे Blogging . ब्लॉगिंग करणे खूप सोपे आहे.कोणताही मनुष्य अगदी काही मिनिटांत Blog तयार करू शकतो त्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नाही. असे ब्लॉग बनवून आपण पैसे कमवू शकतो.म्हणून मी तुम्हां सर्वांसाठी Blog म्हणजे काय? Blog कसा तयार करावा? ब्लॉग बनवून पैसे कसे कमवायचे? याची संपूर्ण माहिती Blogging Meaning in Marathi या Post मध्ये बघणार आहोत.ब्लाॅगबद्ल पूर्ण माहिती मराठी मध्ये आपल्याला या ब्लॉगमध्ये मिळेल.
Blogging Meaning in Marathi | ब्लॉग म्हणजे काय ?
एखाद्या कोणत्याही विषयावर सविस्तरपणे आणि सुटसुटीत आणि कोणत्याही भाषेत Internet च्या माध्यमातून Digital platform वर लिहलेली माहिती किंवा Article याला Blog असे म्हणतात.
ब्लॉगिंगमध्ये तुम्हीं तुमचा स्वतःचा ब्लॉग पूर्णपणे विनामूल्य आणि Paid पण बनवू शकता.Blog तुम्हीं Blogger वर फुकट आणि WordPress वर तो ब्लॉग Paid मध्ये बनवू शकता.ब्लाॅग बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्ही तुमचा ब्लॉग सहज तयार करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही विषयावर लेख लिहायचा आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त त्या विषयाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. लेख लिहिला पाहिजे. जर तुम्हाला लेख कसा लिहायचा हे माहित नसेल तर? त्यामुळे तुम्ही Google मध्ये एक कीवर्ड टाका आणि पहिला निकाल उघडा आणि तो काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तुमच्या आवडीनुसार एक लेख तयार करा.असे ब्लॉग बनवून आपण पैसे कमवू शकतो. या सर्व क्रियेला Blogging असे म्हणतात.
Blogging चे प्रकार
1) Personal Blogging
Personal Blogging मुख्यत्वे प्रसिद्ध सेलेब्रिटी द्वारे केली जाते . आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलेब्रिटी आपली माहिती ब्लॉग च्या माध्यमातून त्यांना शेयर करतात. पर्सनल ब्लॉगिंग मधून पैसे कमावता येत नाही.
2)Micro Blog
ब्लॉग तयार करून एकाच विषयावर सर्व माहिती लिहिणे याला मायक्रो ब्लॉग म्हणतात.
3)Events Blogging
या प्रकारचे ब्लॉग आगामी सण,उत्सव, कार्यक्रम इत्यादींवर बनवले जातात ज्याला इव्हेंट ब्लॉगिंग म्हणतात.
4)Professional Blogging
प्रोफेशनल ब्लॉगर हे मुख्यत्वे पैसे कमविण्यासाठीच ब्लाॅगिग करतात. हे लोक वाचक जी माहिती इंटरनेटवर शोधतात त्या प्रकारची शोधली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहितात. अश्या प्रकारची माहिती लिहिल्याने, माहितीच्या शोधात त्यांच्या ब्लॉग वर जास्तीत जास्त लोक येतात. व आपल्या ब्लॉग वर ads दाखवून हे ब्लॉगर्स पैसे कमवतात.
5)Business Blog
या प्रकारचे ब्लॉग कोणत्या ना कोणत्या कंपनीशी किंवा संस्थेशी संबंधित असतात. कंपन्या या ब्लॉगवर त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती पोस्ट करतात. बहुतेक कंपन्यांमध्ये ब्लॉग व्यवस्थापन करण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली जाते. कंपन्या या ब्लॉगवर त्यांची उत्पादने आणि सेवांची माहिती पोस्ट करतात. तुम्ही ते खरेदी करू शकता किंवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कंपनीशी संपर्क साधू शकता.
6)Affiliate Blog
एफिलिएट ब्लॉग हा ब्लाॅगिंगचाच एक प्रकार आहे.ज्यामध्ये ब्लॉगर्स वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांना प्रोत्साहन देतात. ते त्यांच्या ब्लॉगवर त्यांची उत्पादने आणि सेवांबद्दल लिहितात.त्या बदल्यात कंपन्या या ब्लॉगर्सना कमिशन देतात
ब्लॉग कसा तयार करावा ?
आतापर्यंत आपण Blog Meaning in Marathi यामध्ये Blog म्हणजे काय ? ब्लॉगचे प्रकार यांची सविस्तरपणे माहिती घेतली.आता आपण ब्लॉग कसा तयार करावा ? हे पाहू.Blog आपण दोन प्रकारच्या Platform वर बनवू शकतो एक Blogger.com वर ज्यावर Free मध्ये Blog बनवता येतो आणि दुसरा WordPress जो paid व्हर्जन आहे.Wordprss जास्त सुविधा उपलब्ध आहेत.म्हणून लोक जास्त आता WordPress चा वापर करतात.
ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी किंवा तुमचा ब्लॉग तयार करण्यापूर्वी, सर्वप्रथम तुम्हाला एक Niche निवडावा लागेल. Niche म्हणजे, तुमच्याकडे एखाद्या विषयाची माहिती असली पाहिजे जी तुम्ही लोकांशी चांगल्या प्रकारे शेयर करू शकता.यानंतर तुम्हाला कस्टम डोमेन नेम खरेदी करावे लागेल आणि होस्टिंग देखील खरेदी करावे लागेल. जर तुम्हाला मोफत ब्लॉगिंग करायचे असेल, तर तुम्ही Blogger.com या Google च्या प्लॅटफॉर्मवरून ब्लॉगिंग सुरू करू शकता .
तुम्हाला WordPress आणि Blogger.com दोन्हीमध्ये खाते तयार करावे लागेल आणि पूर्ण सेटअप करावे लागेल. आता तुम्हाला या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नियमितपणे पोस्ट प्रकाशित करत राहाव्या लागतील आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगवर 25 ते 30 चांगल्या दर्जाच्या पोस्ट टाकाल, त्यानंतर तुम्ही Google Adsense साठी अर्ज करू शकता, जर तुमचा Google Adsense मंजूर झाला असेल. त्याद्वारे पैसे कमवू शकता.
ब्लॉग बनवून पैसे कसे कमवायचे ?
1)Google Adsense
Google Adsense म्हणजे आपल्या Blog वर Google Ads दाखवून पैसे कमवणे.हा 90% ब्लॉगर्ससाठी रेवेन्यूचा मार्ग असतो. जास्तीत जास्त ब्लॉगर्स याने भरपूर पैसे कमावतात. फक्त गुगल एड्स वापरणं हाच एक पर्याय नसतो. आपण दुसऱ्याही एड्स वापरू शकतो. गुगल अँडसन्स त्यासाठी Approval मिळावं लागत.
2)स्पॉन्सर पोस्ट (Sponsor post)
बाजारात काहीतरी नवीन Product आले आहे. तर त्यांच्याबद्दल आपण पोस्ट लिहिण्यासाठी सुद्धा खूप खूप पैसे मिळतात. जसे आपण बघतो एखादं नवीन प्रॉडक्ट् आलं की युट्युबर्स त्याची विडिओ बनवतात त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. तुम्हालाही अशीच पोस्ट लिहायला पैसे मिळतील. पण त्यासाठी आपल्या ब्लॉगिंगची ट्रॅफिक जास्त लागते.
3)एफिलिएट मार्केटिंग (Affiliate marketing
एफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तू तुम्ही विकतात आणि त्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळते. समजा जर तुम्ही ॲमेझॉनच्या एखाद्या प्रॉडक्टचे प्रमोशन तुमच्या ब्लॉग वर केलं आणि तुमच्या ब्लॉग वरून कोणी ते प्रॉडक्ट विकत घेतलं तर त्याबद्दल तुम्हाला काही कमिशन मिळेल.आपण ॲमेझॉन अफिलिएट मार्केटिंग करू शकतो. ॲमेझॉन हे फक्त एकच एफिलिएट मार्केटिंगचं नेटवर्क नाही, खूप ठिकाणी अफिलिएट मार्केटिंगचे नेटवर्क आहेत.
4)डिजिटल प्रॉडक्ट्स (Digital products)
डिजिटल प्रॉडक्ट्स विकून सुध्दा तुम्हीं पैसे कमवू शकता.जर तुम्हाला योगा येत असेल, डान्स येत असेल, किंवा काहीही येत असेल त्याबद्दल जर तुम्ही पुस्तक लिहिले(Ebook) किंवा कोर्स बनवला तर त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकतात. डिजिटल प्रॉडक्ट सध्या खूप जास्त वापरले जातात आणि त्यांचं कमिशन पण चांगल मिळत.
Blog आणि Website मध्ये काय फरक आहे ?
Blog एक Online माध्यम आहे जो Website सारखाच दिसतो पण Website पेक्षा खूप वेगळा आहे.Blog आणि Website मध्ये खूप फरक आहे आणि दोघांचे उद्देश आणि काम पण वेगवेगळीआहेत. Blog मध्ये Regular Post पब्लिश केली जाते.Website मध्ये Post पब्लिश केली जात नाही तर काही महत्त्वाची माहिती आणि Pages बनवले जातात. Website मध्ये जसे की Company किंवा Organisation किंवा Local Business ची माहिती दिली जाते.Blog एखाद्या विषयावर बनवला जातो आणि त्याच विषयावर त्याच्या Related Sub Topic वर भरपूर Post Publish केल्या जातात.
(FAQ )नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?
१)पैसे कमवण्यासाठी किती ब्लॉग पोस्ट लिहावे ?
ब्लॉग मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली ब्लॉग पोस्ट लिहावी लागतील आणि कमीत कमी तुम्हाला 30 ते 35 ब्लॉग पोस्ट तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करायचे आहेत त्यानंतर तुम्ही गुगल एडसेंस ला अप्लाय करू शकता. जर तुम्हाला गुगल एडसेंस कडून अप्रूवल मिळाले त्यानंतर तुमच्या वेबसाईटवर गुगल च्या ऍड दाखवल्या जातील. आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल..
२)मोफत ब्लॉगिंग कसे करावे ?
जर तुम्हाला मोफत ब्लॉगिंग करायचे असेल, तर तुम्ही blogger.com या Google च्या प्लॅटफॉर्मवरून ब्लॉगिंग सुरू करू शकता , यामध्ये तुम्हाला ₹ 1 देखील खर्च करण्याची गरज नाही.
३)मराठी ब्लॉगद्वारे पैसे कमावता येतात का ?
होय मित्रांनो, मराठी ब्लॉगद्वारे तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता, मराठी ब्लॉगमध्ये तुम्ही Google Adsense, Affiliate Marketing आणि उत्पादनांची जाहिरात करून पैसे कमवू शकता.
४)ब्लॉगमधून पैसे मिळवण्यासाठी किती दिवस लागतात ?
जर तुम्ही ब्लॉग तयार केला तर सुरुवातीला थोडा वेळ लागू शकतो कारण कोणत्याही लेखाला Google वर रँक होण्यासाठी वेळ लागतो पण काही काळानंतर जेव्हा तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येऊ लागते तेव्हा तुम्ही पैसे कमवू शकता.
माझ्या प्रिय वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर ही Post वाचून समजली असेल तर ही Post तुम्हीं इतरांना पण शेयर करा ही विनंती जेणेकरून दुसरे पण Blogging म्हणजे काय ? हे समजून ब्लॉगिंगच्या करियर सुरूवात करू शकतात आणि तुम्हीं पण लवकरात लवकर Blogging सुरू करा.