Chakli Recipe in Marathi

Chakli Recipe in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friend सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे. आज मी तुम्हांला Chakli Recipe in Marathi या बद्दल माहिती देणार आहे. आपल्याकडे वर्षभर विविध सण येतात. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत नुसती सणांची ये जा असते.होळी, गणपती, नवरात्र संपल्यानंतर येते ती आपल्या सर्वांची आवडती दिवाळी. दिवाळी हा सर्वांचा आवडता सण आहे.दिवाळीत नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी केल्या जातात.दिवाळीत फराळ हा सगळ्यांचा अगदी जवळचा विषय.चिवडा, शंकरपाळी, अनारसे, चकली,बेसन लाडू,रवा लाडू, करंजी असे पदार्थ दिवाळीत केले जातात.चकली तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते त्यासाठी Chakli Recipe in Marathi सर्वांना माहीत पाहिजे.ही Chakli Recipe in Marathi वाचून तुम्ही उत्तमप्रकारे चकल्यांचे प्रकार बनवू शकता.चकली वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात त्यातील काही प्रकार आपण या Post मध्ये पाहू.

Chakli Recipe in Marathi

 

भाजणीची चकली

      साहित्य

  • तीन वाटी चण्याची डाळ
  • सहा वाटी तांदूळ
  • दीड वाटी उडदाची डाळ
  • एक वाटी मूगाची डाळ
  • दोन चमचे जिरे
  • दोन चमचे धणे
  • दोन चमचे लाल तिखट
  • दोन चमचे चकली मसाला
  • मीठ
  • हळद
  • पाणी
  • ओवा
  • पांढरे तीळ
  • तूप
  • तेल

‌     कृती

  • कढईत धान्य प्रत्येकी मंद गॅसवर भाजून घेणे
  • धणे, जिरे तव्यावर भाजून घेणे
  • थंड झाल्यावर सर्व साहित्य एकत्र करून घरघंटीवर जाडसर पीठ दळून घ्यावे.
  • एका भांड्यात चार वाटी पाणी उकळत ठेवावे
  • पाणी उकळले की त्यामध्ये तिखट, चकली मसाला, चवीनुसार मीठ, हळद,ओवा, पांढरे तीळ, तूप टाकून गॅस बंद करा. 
  • चार वाट्या भाजणी त्या पाण्यात टाका आणि उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळून घ्या.
  • भांड्यावर झाकण ठेवून साहित्य थंड होऊ द्या.
  • दोन ते तीन तासांनी भाजणी मळून घ्या
  • चकलीच्या साच्यामध्ये भाजणीचे गोळे भरा आणि चकल्या पाडा
  • चकली मंद गॅसवर कुरकुरीत तळून घ्या.

मूगडाळ चकली

     साहित्य

  • दोन वाटी मूगडाळ
  • एक चमचा पांढरे तीळ
  • एक चमचा ओवा
  • एक चमचा जिरे
  • दोन चमचे लाल तिखट
  • एक वाटी मैदा
  • चवीपुरते मीठ
  • तेल

     कृती

  • कुकरच्या एका डब्यात पाणी घालून मूगडाळ शिजवून घ्या.
  • दुसऱ्या डब्यात मैदा कापडात गुंडाळून उकडून घ्या.
  • कुकर थंड झाल्यावर मैदा फोडून चाळून घ्या.
  • मूगडाळ गाळून घोटून घ्या.
  • मैद्यामध्ये मूगडाळीचे मिश्रण, मीठ, तिखट, पांढरे तिळ, ओवा, जिरे टाकून पीठ भिजवून घ्या.
  • चकलीच्या साच्यात पीठ भरा आणि चकल्या पाडा.
  • गरम तेलात मंद गॅसवर कुरकुरीत तळा.

मैदा चकली

      साहित्य

  • तीन वाटी मैदा
  • एक वाटी मूगडाळीचे पीठ
  • एक चमचा बटर
  • दोन चमचे तीळ
  • एक चमचा ओवा
  • एक चमचा जिरे
  • हिंग
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट

      कृती

  • मैदा आणि मूगडाळीचे पीठ कापडात गुंडाळून कुकरमध्ये वीस मिनीटे वाफवून घ्या.
  • थंड झाल्यावर पीठ फोडून घ्या त्यात जिरे, ओवा, मीठ, हळद, लाल तिखट आणि तेलाचे मोहन टाका.
  • पीठ चांगले मळून घ्या आणि एक तासाने त्याच्या चकल्या पाडा
  • मंद गॅसवर चकला कुरकुरीत तळून घ्या.

 रवा चकली

      साहित्य

  • रवा एक ग्लास
  • तुप अर्धी वाटी
  • स्वादानुसार मीठ व जीरे
  • मिरची /मिरची पावडर
  • तेल तळणासाठी
  • पाणी पीठ मळण्यासाठी

      कृती

  • एका कढईत पाणी गरम करून त्यात तुप टाका.
  • पाणी उकळल्या नंतर त्यामध्ये रवा टाका व चांगले मिश्रण करून घ्या.
  • तयार झालेला रवा एका ताटात काढून त्यामध्ये मीठ, जीरे, हळद व बारीक चिरलेली मिरची हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • गॅसवर तेल गरम करायला ठेवा.
  • रव्याचे जे मिश्रण बनवले आहे त्याचा गोळा करून त्याचे पीठ मळून त्याच्या चकली पाडा.
  • मंद आचेवर चकल्या तळून घ्या.

साबुदाणा चकली

      साहित्य

  • साबुदाणा
  • बटाटे
  • मीठ स्वादानुसार
  • बारीक चिरलेल्या मिरच्या
  • तेल

     कृती

  • सर्वात पहिल्यांदा साबुदाणा चांगला पाण्यात भिजवुन घ्या. व त्यानंतर बटाटे उकडून घ्या.
  • बटाटे उकडल्यानंतर ते गार होऊद्या आणि गार झाल्यानंतर बटाटे खिसून घ्या.
  • भिजलेला साबूदाणा व किसलेला बटाटा चांगला मिक्स करून घ्या.
  •  आता त्या मिश्रणात मिठ व बारीक चिरलेल्या मिरच्या टाका.
  • एकदा हे सर्व चांगले मिक्स करून ते मळून घ्या.
  • आता मळलेल्या त्या मिश्रणाचा गोळा करून तो चकली मशीन मध्ये घालून त्यापासून गोलाकार चकली पेपरवर काढून घ्या.
  • काढलेल्या चकल्या चांगल्या वाळून ध्या नंतर गॅसवर गरम तेल करून कमी आचेवर चकली तळून घ्या.

 गव्हाची चकली

      साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • उडदाचे पीठ
  • स्वादानुसार मीठ व तिळ
  • पाणी व तेल
  • मिरची पावडर व हळद
  • ओवा

      कृती

  • एका मोठया ताटात किंवा पराती मध्ये गव्हाचे व उडदाचे पीठ एकत्र करून घ्यावे.
  • त्यात मीठ, तिळ, मिरची पावडर, हळद आणि आवडत असल्यास ओवा देखील टाकावा.
  • पाणी एकत्र करून पीठ मळून घ्यावे व पीठाचा गोळा करा.पीठ मळताना ते पीठ जास्त चिकट नसावे म्हणजेच पाणी व्यवस्थित टाकून पीठ मळा.
  • नंतर पीठ एका चांगल्या सुती कपडयात गुडांळून ठेवा.
  • पिठाच्या चकल्या पाडा
  • मंद गॅसवर  चकल्या तेलात तळून घ्या.

 बटर चकली

      साहित्य 

  • दोन चमचे मैदा
  • दोन चमचे साबुदाणा पीठ
  • दोन चमचे कॉर्नफ्लोअर
  • एक कप बटर
  • तीळ
  • हिंग
  • चवीनु
  • सार मीठ
  • तांदळाचे पीठ दोन वाटी

     कृती

  • एका भांड्यात बटर गरम करून घ्या.
  • त्यात तांदळाचे पीठ, मैदा, कॉर्न फ्लोअर, साबुदाणा पीठ मिसळा.
  • हिंग आणि तीळ टाका.
  • मीठ टाकून पीठ चांगले मळून घ्या.
  • चकलीच्या साच्यात पीठ भरा आणि चकली पाडून घ्या.
  • गरम तेलात मध्यम गॅसवर चकली तळून घ्या. 

नाचणीची चकली

      साहित्य

  • अर्धी वाटी ज्वारीचे पीठ
  • दोन वाटी नाचणीचे पीठ
  • दोन चमचे लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • जिरे
  • ओवा
  • हिंग
  • तूप
  • मीठ चवीनुसार
  • तेल

      कृती

  • एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा
  • तांदळाची उकड काढतो तशी नाचणीचे पीठ आणि ज्वारीच्या पिठाची उकड काढा.
  • उकडीसाठी पाण्यात पीठ घालण्यापू्र्वी पांढरे तीळ, जिरे, हिंग, तिखट, मीठ घाला आणि गॅस बंद करून ज्वारी आणि नाचणीचे पीठ मिसळा.
  • भांडे बंद करून ठेवा. 
  • थंड झाल्यावर पीठ मळून घ्या आणि अर्ध्या तासाने चकलीच्या साच्यात घालून चकल्या पाडा.
  • नाचणीच्या चकल्या गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या. 

 

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हीं चकलीचे हे सर्व प्रकार तूमच्या घरी बनवून नक्की बघा आणि तूम्हांला जर या चकल्या आवडल्या तर तुम्हीं या चकल्या बनविण्याच्या पध्दती इतरांना नक्की शेअर करा ही नम्र विनंती.

 

Read More – Pavbhaji Recipe in Marathi 

 

Read More- Shankarpali Recipe in Marathi 

 

 

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

More Posts