Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम मी तुमचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत करतो.आज आपण या पोस्टमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये समजून घेणार आहोत . छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत.त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या जनतेसाठी अर्पण केले. छत्रपती शिवजी महाराजांचा जन्म कोठे झाला त्यांनी कोणकोणते किल्ले जिंकले किती लढाया लढल्या यांचा संपूर्ण इतिहास Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi या पोस्टमध्ये तुम्हांला वाचायला मिळेल.छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याची स्थापना करणारे भारतीय शासक होते. ते अत्यंत शूर, बुद्धिमान, शूर आणि दयाळू शासक होते.
प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज !!
Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म
पूणे जिल्हातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्म तारीख बद्दल अनेक मतभेद होते.आता तो वाद मिटला . महाराष्ट्र सरकारने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१( १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख म्हणून स्वीकारली . म्हणून दरवर्षी १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून महाराष्ट्र सरकार जाहीर करते.महाराष्ट्रा बाहरचे अनेक लोक वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात. तर महाराष्ट्रातील काही लोक मराठी पंचांगा प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शिवजयंती साजरी करतात. एका आख्ययिखेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पूत्र हवा अशी म्हणून प्रार्थना केली होते.म्हणून या मुलाचे नाव “शिवाजी” ठेवले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब
वडिल
शहाजीराजे
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.मलिक अंबर या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यू नंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स.१६३६ मध्ये अहमदनगर वर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले.आदिलशहाने त्यांना पूण्याची जहागिरी दिली.
आई
जिजाबाई
जिजाबाई व बाळ शिवाजी पूण्यात राहायला गेले तेव्हा पूण्याची फार बिकट अवस्था झालेली होती.तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून , जिजाबाईंनी दादोजी कोंडदेव यांच्या साहाय्याने पूण्याची पुन: स्थापना करायला सुरुवात केली.शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यानंतरही अनेक कठीण प्रसंगी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना खंबीर मार्गदर्शन केले.शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होत.हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
पत्नी
सईबाई निंबाळकर
सोयराबाई मोहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगणाबाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड
मुलगे
छत्रपती संभाजी भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले
मूली
अंबिकाबाई महाडिक
कमळाबाई (सकवारबाईंची कन्या)
दिपाबाई
राजकुंवरबाई शिके॔(सगुणाबाईची मुलगी , गणोजी शिर्के यांची पत्नी)
राणूबाई पाटकर
सखूबाई निंबाळकर (सईबाईंची मुलगी )
सुना
संभाजीच्या पत्नी येसूबाई
राजारामांच्या पत्नी ताराबाई
जानकीबाई
राजसबाई
अंबिकाबाई
सगुणाबाई
नातंवाडे
संभाजीचा मुलगा शाहू
राजारामांचा मुलगा दुसरा शिवाजी
राजसबाईचा मुलगा दुसरा संभाजी
पंतवडे
ताराबाईंचा नातू रामराजा
दुसऱ्या संभाजीचा मुलगा ३रा शिवाजी (कोल्हापुर
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक
शिवाजी महाराजांना युद्ध अभ्यास आणि रणनीती तसेच राज्यकारभार यासंबंधी प्राथमिक शिक्षण शहाजीराजांकडून तसेच दप्तर व्यवस्था आणि न्याय व्यवस्थचे शिक्षण व युद्धप्रशिक्षण दादोजी कोंडदेव यांच्या कडून मिळाले.परकीय सत्तेविरुद्ध लढण्याकरता आवश्यक असे शिस्तीचे शिक्षण जिजाबाईकडून मिळाले असे मात्र उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहिती वरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाईंनी लहाणपणीच शिवाजी महाराजांना रामायण महाभारत यांच्या साहाय्याने त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरले.
स्वराज्य स्थापनेची शपथ
रायरेश्वर हा किल्ला स्वराज्य स्थापनेचा शपथेचा साक्षीदार आहे.याच किल्ल्यावर धत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती.फक्त १६ वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर गडावर स्वराज्याचे तोरण बांधले.हिंदवी स्वराज्य स्थापनेची इच्छा असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी तरूणांचा एक समूह बनवला ज्याला त्यांनी ‘मावळा’ असं नाव दिलं.
ह्याच मूठभर मावळ्यांच्या साथीने त्यांच्यामध्ये धर्मप्रेम निर्मित करून त्यांना लढाईचे प्रशिक्षण दिले आणि स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली.हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्ताचे पाणी केले.केवळ पन्नास वर्षांच्या काळात त्यांनी विजापूर आणि दिल्ली या राज्यसत्तांना आपल्या समोर झुकायला लावले.
महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून आपला राज्याभिषेक करून घेतला.हिंदू धर्माला त्यांच्या हक्काचा राजा मिळाला.राज्याची जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाता म्हणून पाहू लागली.महाराजांनी हिंदू धर्माच्या वेदांचे , पुराणांचे आणि देवळांचे रक्षण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षात महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे ,बाजी पासलकर , तानाजी मालुसरे ,नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक,सुर्याजी काकडे, बापुजी मुदगल या मावळ्यांच्या साथीने २६ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
स्वराज्याची मुहूर्तमेढ
इ.स.१६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले .
तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे , असे शिवरायांनी ठरवले.निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले.साऱ्या मावळ्यांसह ते सिंहांच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपाझप तोरणा चढून गेले.मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या.
तानाजी मालुसरे या वीराने दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण उभारले .येशाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी त्याने चौकीवर पहारे बसवले.किल्ला ताब्यात घेतला.सर्वानी शिवरायांचा जयजयकार केला.नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात घुमला.शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले.
त्याच साली शिवाजी महाराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पूणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणागडा समोरील मुंरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी ‘राजगड’ असे ठेवले.
अफजलखान वध
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे मुघल, निजाम, आदिलशाही मध्ये हाहाकार माजला होता. इ.स. १६५९ साली आदिलशाहाने दरबारात त्याच्या सैनिकांना आव्हान दिले की तुमच्यातल्या कोणीतरी एकाने मला शिवाजीला मारून दाखवा. तेवढ्यात त्यांच्या दरबारी असलेला धीट अफजलखान हा समोर येऊन त्याने शिवाजी महाराजांना संपवायचा विडा उचलला.
शिवाजी महाराजांवर आक्रमक करण्यासाठी अफजलखान विजापूर वरुन १०००० सैन्य घेऊन निघाला. अफजलखान धाडधिप्पाड शरीरयष्टीचा होता. शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला. शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडावर तोंड देण्यास ठरविले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वता: यावे असा अफजलखानचा आग्रह होता.
शिवाजी महाराजांना अफजलखानच्या दगाबाजीची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढवले अणि सोबत बिचवा अणि वाघानखे ठेवली. अफजलखानने शिवाजी महाराजांना मारून टाकायचे या इराद्याने भेटीचे निमंत्रण पाठवले होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलिशान शामियान्यात भेट ठरली.
शिवाजी महाराजांसोबत तेव्हा जिवा महाल हे विश्वासू सरदार होते आणि अफजलखान सोबत सय्याद बंडा हे तत्कालीन प्रख्यात असे दांडपट्टेबाज होते. धाडधिप्पाड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफजलखान याने काट्यारिचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले.
अफजलखानचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर अफजलखानची प्राणांतिक आरोळी सगळीकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्टायाचा वार केला जो लगेच जिवा महालाने स्वत:वर घेतला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. तेव्हापासून “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली. आणि त्याचवेळी महाराजांपेक्षा दुप्पट असा अफजलखान जमिनीवर कोसळला. शिवाजी महाराजांनी अफजलखानच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लाम मधील पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली.
पन्हाळा वेढा
अफझलखानाच्या हत्येने आदिलशाही दरबारात खळबळ उडाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विजापुरातही पोहोचली होती. त्यामुळे आता आदिलशाही आणि मुघलांचे हाल होत असताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची खूप भीती वाटत होती. आदिलशाहीने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटेतून काढण्याचे ठरवले.अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला जिंकला.
आदिलशाहीला हा एक वेगळाच धक्का होता. वाई ते पन्हाळा पर्यंतचा मोठा भूभाग आता मराठा साम्राज्यात सामील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अफझलखानाचा मुलगा फजल खान आणि विजापूर येथील रुस्तम-ए-जमान या दोघांनी मराठा साम्राज्यावर कूच केले.
18 डिसेंबर 1659 रोजी महाराजांनी केवळ 5000 सैनिकांसोबत लढून दोघांचा पराभव केला. या दोघांच्या पराभवाने आता आदिलशाही सैन्य पेटले होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने सिद्धी जोहरला पाठवले.
सिद्धी जौहरसोबत 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ आणि तोफखाना होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाच्या किल्ल्याला वेढा घातला, पण सिद्धी जौहर मराठा साम्राज्यावर कूच करत असल्याचे कळताच, शिवाजी महाराज 2 मार्च 1660 रोजी पन्हाळगडावर आले. सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला.
सिद्धीने पन्हाळ किल्ल्यावर गोळीबार सुरू केला पण पन्हाळ किल्ल्याची उंची कमी झाल्यामुळे त्याचा उद्देश फसला. सिद्धीने मराठी इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारूगोळा खरेदी केले आणि इंग्रजांनी महाराजांशी केलेला शांतता करार मोडून सिद्दी जौहरला मदत केली. 10 मे 1660 रोजी सिद्धीने पन्हाळगडावर पुन्हा गोळीबार सुरू केला.
वेढा इतका गंभीर होता की महाराजांना वाटले की पाऊस जवळ येत असल्याने हा वेढा फार काळ टिकणार नाही. मात्र सिद्धी जोहरने पाऊस टाळण्यासाठी तिच्या छावणीवर गवत टाकण्यास सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आदिलशहा संतापला, म्हणून आदिल शहाने मुघलांची मदत घेतली आणि औरंगजेबाने शाहिस्तेखानला 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले.
पण आता आपले स्वराज्य धोक्यात आले होते. एका बाजूला सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला शाहिस्तेखान. 9 मे 1660 रोजी शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला. त्याच लाल महालात जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले. जिथे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्काराची शिदोरी दिली.आता शाहिस्तेखाना त्याच लाल महालात ठार मांडून बसला होता. त्याने तेथील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
वेढा तीव्र झाल्यावर नेताजी पालकरांनी थेट विजापूरवर हल्ला केला पण विजापूरच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. आता जिजाबाईंना शिवबाची फार काळजी वाटत होती. कारण आता पाऊस सुरू होणार होता आणि वेढा होण्यास जवळपास तीन महिने बाकी होते.
म्हणून जिजाबाईंनी स्वतः शस्त्र उचलून पन्हाळ्याचा वेढा तोडण्याचा निर्णय घेतला पण नेताजी पालकरांनी जबाबदारी घेतली. नेताजी पालकर यांनी सिद्धी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्धी वाहवाह यांच्यासह पन्हाळागडावर हल्ला केला. पण ते अपयशी ठरले.
आता सर्वांना आणि जिजाबाईंना शिवबाची काळजी वाटत होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी 12 जुलै 1960 रोजी त्यांचे वकील पंत यांचेकडून एक पत्र घेऊन सिद्धी जोहर यांना पाठवले. आणि सर्व कमावलेले पैसे आणि किल्ले तुमच्या ताब्यात येण्यास तयार आहेत.
हे पत्र वाचून मोगलांना खूप आनंद झाला आणि इतके दिवस सुरू असलेला वेढा त्यांनी कमी केला. या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री पन्हाळगड सोडून विशाल गडावर जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यावरील 8000 सैनिकांपैकी सुमारे 600 प्रमुख मावळ्यांसह त्यांनी विशालगडावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाराजांनी दूरचा मार्ग निवडला.
पावनखिंड युद्ध
अफजलखानच्या मृत्यूनंतर आदिलशाह चिडला आणि त्याने सिद्धि जौहर ला सैन्यासोबत शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी पाठवले. सिद्धि जौहर ने पन्हाळगड ला चौफेर वेढा घातला. त्या वेढ्यातून सिद्धीला तुरी देत राजे सैनिकांसह विशालगडाकडे रवाना झाले. शिवाजी महाराजांचा पाठलाग करत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत त्यांना गाठले आणि लढाई शुरू झाली. तेव्हा शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना तेथून जाण्याची विनंती केली.
“लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे” म्हणुन शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विशालगडाकडे कूच करायची विनंती केली. बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्धि च्या सैन्याला रोखून धरले. संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली प्राणाची बाजी लावत झुलवत ठेवले.
शिवाजी महाराज गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. शिवाजी महाराजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले अणि त्याच्या वाढीसाठी अशा अनेक सरदारांनी आपल्या राजासाठी प्राणाची आहुती दिली. शिवाजी महाराजांनी घोडखिंडीचे नाव “पावनखिंड” असे बदलून बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण जागवत ठेवली.
सुरतेची पहिली लूट
सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता.
अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
आग्राची गोष्ट
इ स. १६६४ साली शिवाजी महाराजांनी व्यवसायीक केंद्र सुरत वर आक्रमणं करून त्याला नेस्तनाबूत केले यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला. औरंगजेब राजा जयसिंग याला शिवरायांच्या खात्मा करण्यासाठी पाठवले. राजा जयसिंग दीड लाख सैन्यासोबत महाराजांवर चालून गेला मात्र या लढाईमध्ये महाराजांना हार पत्करावी लागली.
त्यांना आपले २३ किल्ले आणि ४ लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार इ.स १६६६ साली औरंगजेबाने शिवाजी राजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलाविले. त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात वाढदिवसाच्या दिवशी पोहचले.
त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा राजपुत्र शंभूराजे देखील होते. तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मोगलांच्या दरबारी नजरकैदेत करण्यात आले. शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. मिठाईच्या पेटीत बसून त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली आणि विजापुर मार्गे ते रायगडावर पोहोचले.
पुढे महाराजांनी आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला. १६८१ ते १६८४ या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्यात बरेच प्रयत्न केलेत पण तो पुर्णतः असफल ठरले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
अखेर तो दिवस उजडला ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. ६ जून १६७४ ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या अणि श्रेष्ठांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराई हे चलन शुरू केले. संपूर्ण रायगड त्या दिवशी नवरी सारखा सजवण्यात आला होता. महाराज केवळ शूर आणि युद्ध निपुणच नव्हे तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही.
त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूच्या स्त्रियांना देखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत. ०६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. यावेळी ३२ मन वजनाचे सुवर्ण सिंहासन घडविण्यात आले होते ज्यावर राजे विराजमान झाले.
राजमुद्रा
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते. तेव्हा त्यांना शहाजी राजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
6 जून 1674 ला रायगड येथे झालेल्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. अष्टप्रधान मंडळाची राज्यकारभाराच्या सोईसाठी आठ खात्यांत विभागणी केली. एकूण आठ खात्यांसाठी एक प्रमुख नियुक्त केला. या अष्टप्रधान मंडळातील प्रमुखांची नेमणूक करणे वा पदावरून हटवण्या चा अधिकार महाराजांचा होता. हे प्रमुख आपापल्या खात्याच्या कारभारासाठी महाराजांना जबाबदार होते.अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना रोख स्वरूपात पगार दिल्या जाई. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या जात नसत. गुण आणि कर्तृत्व या निकषावर महाराज अष्टप्रधान मंडळातील प्रमुखांची नेमणूक करीत असत.
1) पेशवा ( प्रधान ):पेशवा वा प्रधान यांचे कार्य म्हणजे राज्यकारभार चालविणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहणे. मोरो त्रिंबक पिंगळे हे पेशवेपदावर होते.
2) अमात्य :राज्याचा आर्थिक व्यवहार पाहणे हे अमात्य यांचे कार्य असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्यपदी होते.
3) सुरनिस वा सचिव :महाराजांचा पत्रव्यवहार सांभाळणे, परागण्यांचा हिशोब ठेवणे हे सचिवाचे कार्य होते. अण्णाजी दत्तो सचिव होते.
4) वाकनीस वा मंत्री :पत्रव्यवहार सांभाळणे, राजांची दैनंदिन कामांची नोंद करणे, गुप्तहेरांकडून माहिती मिळविणे आणि दरबारी पाहुण्यांची स्वागत व्यवस्था पाहणे ही कामे मंत्री करीत असे. या पदी दत्ताजी त्रिंबक वाकनीस होते.
5) सेनापती :सरंक्षण,आक्रमण, लष्करभरती, लष्करी मोहिमा पार पाडणे हे सेनापतीने करायचे प्रमुख करू होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते.
6) सुमंत :सुमंत याचे पराराज्याशी संबंध ठेवणे हे कार्य होते. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते.
7) न्यायाधीश :न्यायाधीश हा राज्यातील न्यायविषयक कामकाज पाहत असे. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
8 ) पंडितराव वा दानाध्यक्ष :पंडितराव हा धर्मविषयक कामगिरी पार पाडत असे. मोरेश्वर पंडितराव यापदी होते.न्यायाधीश आणि पंडितराव या खेरीज इतर मंत्र्यांना युद्धावर जावे लागत असे. केंद्रीय राज्यकारभाराची विविध कार्यांची विभागणी अठरा कारखाने आणि बारा महालांतून केलेली होती. त्यांचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्वतंत्र अधिकारी , हिशोब ठेवणारे कारकून नेमलेले होते.
शिवाजी महाराजांचा मृत्यू:
शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० मध्ये त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती गेल्या. एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठा साम्राज्याचे संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. अशा या महान राजाला कोटी कोटी प्रणाम..!
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १)शिवाजी महाराजांची ओळख कशी केली जाते?
उत्तर:छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक होते. ते पहिले आशियाई राजा होते ज्यांना संरक्षण क्षेत्रात नौदल बळ मिळाले. भारताच्या पश्चिम भागात असलेल्या मजबूत नौदल शक्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आपली मक्तेदारी प्रस्थापित केली.
प्रश्न 2)छत्रपती शिवाजीचे महाराज हे सर्व भारतीयासाठी प्रेरणादायी का आहेत?
उत्तर: शिवरायांचे नाव आपल्या मनात त्यांच्या निर्भीड आत्मा आणते जे संकटे आणि संकटात कधीही डळमळू शकत नाही. छत्रपती शिवाजीचे महाराज आव्हानांना धैर्याने उभे राहिले आणि वाटेत आलेल्या अडचणींवर त्यांनी मेहनतीने मात केली. “प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
प्रश्न 3) छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?
उत्तर: हिंदवी मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या महान शूर आणि पुरोगामी राज्यकर्त्यांपैकी एक.
प्रश्न ४): छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
उत्तर: 19 फेब्रुवारी 1630 रोजी
प्रश्न 5) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर: 3 एप्रिल 1680 रोजी
प्रश्न 6)छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
उत्तर : 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.