Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये अखंड भारतवर्षाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्ल Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi मध्ये लिहिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत आहेत.महाराज म्हणजे आपला जाणता राजा . छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच संपूर्ण शरीरात विलक्षण असे तेज निर्माण होते . त्यांच्या नावातच इतका दरारा आहे की समोरच्या माणसाला धडकी भरते.धत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी अर्पण केले,गोरगरिबांचे रक्षण केले, अनेक लढाया लढल्या,मंदिरे वाचवली, आपल्या प्रजेच्या हितासाठी आपले जीवन बहाल केले. महाराज होते म्हणून आज आपण ताठ मानेने जगत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना मुघलांच्या तावडीतून सोडविले आणि आपले स्वतःचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज…छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आणि त्यांचे ज्वलंत विचार प्रत्येकाच्या हृदयात पेटत ठेवण्यासाठी आणि शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi मी या लेखात लिहिलेले Quotes तुम्हांला जरूर आवडतील.ते तुम्हीं तुमच्या what’s up, Facebook इत्यादी सोशल नेटवर्किंग साइटवर शेयर करु शकता.

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे..!

तुमच्यात जर आत्मविश्वास व हिंमत असेल तर मोठ-मोठ्या संकटांना तोंड देवून तुम्ही स्वतःच साम्राज्य उभं करू शकता..!

जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं, सगळं संपलं असं वाटतं, तेंव्हा मी माझ्या राज्याला डोळ्यासमोर ठेवतो. माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो. || शिवराय असे शक्तीदाता ||

जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं, सगळं संपलं असं वाटतं, तेंव्हा मी माझ्या राज्याला डोळ्यासमोर ठेवतो. माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो. || शिवराय असे शक्तीदाता ||

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है ।।अर्थातजसा अंधकारावरती सुर्य जसा कंसा वरती श्री कृष्ण तसे म्लेच्छ वंशावरती विनाशकारी शिवराज ‘सिंह’ आहेत…

जोवर सुर्यकिरणांचा भंडारा या मातीवर उधळत राहील; तोवर या हृदयाच्या पालखीत छत्रपती नावाच वादळ निरंतर घुमत राहील….🍁 छत्रपती 🍁

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही, पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला..!

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस,आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासींनीचे कपाळ आणि स्वराज्याची सकाळ.

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगवले, भगवा झेंडा हातात घेऊनी खिंड ज्याने लढविली आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली.

माहीत नाही काय जादू असते शिवरायांच्या चरणात आशीर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो, तितके मोठे झाल्यासारखे वाटते.

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा,दरीदरीतून नाद गुंजला,महाराष्ट्र माझा.सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा,दरीदरीतून नाद गुंजला,महाराष्ट्र माझा.

सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.जय शिवराय

जिथे शिवभक्त उभे राहतात..तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..अरे मरणाची कुणाला भीती..कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारू ।॥ श्रीमंतयोगी ॥

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,आकाशाचा रंगच समजला नसता !जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

शिवराय सांगायला सोपे आहेत,शिवराय ऐकायला सोपे आहेत,शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की

अंगी लावण्यास मला सुगंधीसाबण वा अत्तर नसु दे..पण गर्वाने ओढलेला माझ्या कपाळी भगवा टिळा असु दे.

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे,म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.जय शिवप्रभूराजे

विजे सारखी तलवार चालवुन गेला !निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला !मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला !

शब्द पडतील अपुरे,अशी शिवबांची कीर्ती,राजा शोभूनी दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,हा जन्म काय, हजार जन्म झाले,तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.जय भवानी जय शिवाजी

एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही,आमच्या राजाची शिकवण आहे,अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन जगायचा सन्मान मिळतोय,कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.जय जिजाऊ जय शिवराय

तुझी किर्ती अशीच आसमाना मंदी राहू दे,तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे.जय शिवराय

ना शिवशंकर, तो कैलाशपती,ना लंबोदर, तो गणपती,नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती,देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती.

रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो आजन्म ही काया जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया शिवाजी महाराज कि जय”

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। ..जय शिवाजी, हर हर महादेव.

औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य

जिथे महाराजांचा घाम पडला,तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात,त्यांना छत्रपती म्हणतात

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी अरे गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला भीती कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता जय शिवराय

सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला शिवजयंतीच्या शुभेच्छा

ताठ होतील माना, उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा शिवजयंतीच्या शुभेच्छा

जागविल्याशिवाय जाग येत नाहीओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,शिवजयंतीच्या शुभेच्छा

शिवाजी महाराजांनी दिली शपथ या मातीसाठी आपणही मिटू शत्रूसमोर कधी नका झुकू मग धड नाही राहिले तरी चालेल

शक्तीशाली मुघलही घाबरायचे जेव्हा शिवाजी महाराज समोर यायचे

देशाचा अभिमान शिवाजी,राष्ट्राची शान शिवाजी,स्वराज्याचे दुसरा नाव शिवाजी,प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरीवर प्रगटला

हातात तलवार घेऊनी, शत्रूंवर बरसला महाराष्ट्रात एकच असा, शिवाजी राजा होऊन गेला

तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या,ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवंदरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच काळीज हवं

छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने,भवानीच्या तलवारीने,सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने

आम्ही सिंहगर्जना करतो कारण आमच्या मनामनात छत्रपति शिवाजी महाराजांचा आहे वास छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

न थांबता सतत लढत स्वराज्या निर्माण करणे नाही सोपे त्यासाठी लागते निधडी छाती,हवी त्यासाठी शिवरायांची स्फूर्ती

लहानपणापासून एकच ध्यास,व्हायचे आहे शिवबासारखे खास आईकडून ऐकल्या या गाथा,बस शिवबाचा अंश मिळावा

मरण आले तरी चालेल,पण शरण जाणार नाही,हाच एक ध्यास, जय शिवराय

शूरवीरांची आहे ही धरती,वीर शिवाजी पालनहार,वाईटपणाही ज्याला घाबरतो‌असा हा शिबवाचा हुंकार

हिंदुस्थानचा मुकुटमणी, अतुल्य शौर्याची गाथा लक्ष युगे गर्जत राहील, स्वराज्याची कथा जय शिवराय

देव माझा शक्तीचा, सामर्थ्य आणि युक्तीचा शत्रू हा गनिमाचा, कैवारी हा जनतेचा,जाणता राजा रयतेचा

हाती झेंडा भगवा, एक हाती शिदोरी,पाऊल वाटेवरूनी ठेपल्या नजरा शिखरांवरती,श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

जाणता राजा माझा, एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला

छत्रपती शिवराय प्रत्येक मावळ्यांच्या मनात आहे अढळ श्रद्धास्थान,जाणता राजा आहे माझा न्यायालंकार पंडित त्यांची किर्ती आहे अवघ्या त्रिभुवनी अखंडित

कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्रधर्म वाढविण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी झाला

छाती होती पोलाद ज्याची, डोळ्यात ज्याच्या अंगारत्या माझ्या शिवबाचा आज, गर्जा जयजयकार

गुणवान, धैर्यवान, बलवान, प्रजापति, छत्रपती जाणता राजा हा असा, गर्जा जयजयकार

सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी हसू आणले गरीबां ओठी, माझा जाणता राजा

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

तुला पैसा, गाडी, बंगला असल्याचा गर्व असेल तो तुझ्याकडेच ठेव भाऊ आपल्याला शिवभक्त असल्याचा माज आहे Kattar Shivbhakt

ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. Shivaji Maharaj Ki Jai

माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष Raja Shiva Chhatrapati Shivaji Maharaj Manacha Mujra

तुमचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे राजे तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच आज आम्ही आहोत राजे वंदन ! त्रिवार वंदन !

आमचे महाराज माणसातले देव आहेत हे सिध्द करायची गरज नाही इतिहास आहे साक्षीला दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला जय जगदंब जय शिवराय

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे Shivaji Maharaj Ki Jay

इतिहास घडवुन गेलात तुम्ही भविष्यात तुमची आठवण राहील दुनीया जरी संपली तरी राजे तुमची शान राहील॥ जय_शिवराय ॥

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की शिवरायांचा शिवभक्त म्हणून जगायचं सन्मान मिळतोय. कारण यापेक्षा श्रेष्ट स्थान जगात कोणतच नाही जय शिवराय

सुर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वाकत नाही मराठी असल्याचा अभिमान बाळगा…कारण मराठी माणूस कोणाच्या बापाला घाबरत नाही जय शिवराय..

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा होणे अजिबात शक्य नाही कारण ते नुसते राजे नव्हते तर प्रजेचे पालक होते.एखाद्या बापा प्रमाणे ते आपल्या प्रजेची काळजी घेत.संपूर्ण हिंदुस्थान एक पराक्रमी राजा आणि एक आज्ञाकारी पुत्र म्हणून शिवरायांना इतिहास नेहमीच आठवण ठेवेल.अशा या थोर आणि महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा अंखड दंडवत आणि कोटी कोटी प्रणाम.मी या लेखात लिहिलेले Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi तुम्हीं इतरांना पण शेयर करा आणि स्वराज्याचे आणि शिवरायांचे विचार अखंडपणे प्रज्वलित ठेवा.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts