Dhokla Recipe in Marathi
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात.त्यांची चव पण भारी असते. वेगवेगळ्या प्रदेशात तेथील स्थानिक पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत.आज आपण Dhokla Recipe in Marathi याची बनवायची पध्दत कशी आहे हे बघणार आहोत.Dhokla पण खूप चविष्ट पदार्थ आहे.सकाळी नाश्त्याला Dhokla बनवला जातो.खमंग ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं एवढा कालावधी लागतो.ढोकळा व्यवस्थित करणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते, कारण, बऱ्याचदा प्रमाण पुढे मागे झाले तर एक तर तो कोरडा तरी होतो नाहीतर संपूर्ण शिजत नाही. आम्ही तुम्हाला Dhokla Recipe in Marathi याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहोत.
Dhokla Recipe in Marathi
रवा बेसन ढोकळा
साहित्य
बारीक रवा १ कप
बेसन १ कप
हळद अर्धा टीस्पून
अर्धा कप दही किंवा १ कप ताक
खायचा सोडा
चवीनुसार मीठ
पाणी २ कप
तेल
मोहरी अर्धा टीस्पून
हिंग चिमूटभर
२ ते ३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
साखर १ टीस्पून
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात १ कप बारीक रवा,१ कप बेसन कप, अर्धा टीस्पून हळद,मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दही किंवा १ कप ताक टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
हे सगळं मिश्रण छान मिक्स झाल्यावर त्यात दीड कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करावे.
हे मिश्रण मिक्स झाल्यावर ते मिश्रण ते १० मिनिटांसाठी मुरविण्यासाठी ठेवून द्यावे.
मिश्रण मुरवून झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्यावे.आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे.पाणी गरम झाल्यावर त्यात हे भांडे ठेवून १० ते १५मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घ्यावे.
आता आपण साखरेचे पाणी तयार करु.अर्धा कप पाण्यात १ टीस्पून साखर टाकून साखरेचे पाणी तयार करावे.
१० ते १५ मिनिटे शिजवून झाल्यावर गॅस बंद करून ढोकळयाचे भांडे बाहेर काढावे व ढोकळा बाहेर न काढता त्यातच त्याचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
आता आपण त्या ढोकळयात हे साखरेचे पाणी घालावे त्याने ढोकळा मऊ आणि जाळीदार होतो.
आता आपण फोडणी देऊ
एका भांड्यात तेल गरम करायला ठेवावे.तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी टाकून घ्यावी.मोहरी चांगली तडतडली की त्यात चिमूटभर हिंग टाकून घ्यावी. आता त्या मध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या टाकाव्यात .
तयार झालेली फोडणी आपण आता त्या ढोकळयामध्ये घालावी आणि नंतर ढोकळयाचे कापलेले तुकडे एका डिश मध्ये बाहेर काढावे.
अशा प्रकारे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झाला आहे.
शिंगाड्याच्या पीठाचा ढोकळा
साहित्य
१ वाटी भाजलेल्या दाण्याची कूट
२ वाट्या शिंगड्याचे पीठ
२ वाट्या आंबटसर ताक
मीठ
मिरच्या
आले
जिरे
खायचा सोडा
ओले खोबरे
कोथिंबीर
तूप
कृती
सकाळी शिंगाड्याच्या पीठात ताक व भाजलेल्या दाण्याची कूट घालून ते २ ते ३ तास भिजवत ठेवावे.
३ तासानंतर त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या आणि आले , थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.
नंतर एका स्टीलच्या भांड्याला थोडे तूप लावून घ्यावे व त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात . वरती थोडे ओले खोबरे व कोथिंबीर घालून घ्यावी.
आता आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झाला आहे.हा ढोकळा खूप सुंदर लागतो.
डाळीचा ढोकळा
साहित्य
१/२ वाटी हरबरा डाळ
१ वाटी तांदूळ
१/२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
३-४ लसणीच्या पाकळ्या
अर्धा इंच आले
पाव चमचा हळद
फोडणीसाठी तेल
मोहोरी
जिरं
हिंग
सजावटीसाठी खोबरं
कोथिंबीर
मीठ
कृती
तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उ टाकुन इडली किंवा डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान तयार झाले पाहिजे.
पीठ तयार झाल्यावर पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या ,आल्याचा तुकडा , लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका ताटाला तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा.ढोकळा छान फुलतो. ताट नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते.
आता आपला ढोकळा तयार झाला आहे.