Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज मी या लेखामध्ये Diwali Essay in Marathi हा निबंध लिहिला आहे.दिवाळी म्हटले की प्रत्येक हिंदू व्यक्तींचा आवडता सण.हा सण संपूर्ण भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात खूप मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे लोक या सणाची‌ आतुरतेने वाट पाहत असतात.दिवळी दिवशी प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकांना भेटतो त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवाळी या सणाविषयी छोटासा निबंध मी या लेखात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.तेव्हा तुम्हीं हा निबंध जरूर वाचावा अशी मी विनंती करतो.

Table of Contents

 

Diwali Essay in Marathi

 

Diwali Essay in Marathi

भगवान प्रभू श्रीराम जेव्हा १४ वर्ष वनवास भोगून आणि रावणाचा वध करून अयोध्येत परत आले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती.अयोध्येतील लोकांनी आपापली घरे स्वच्छ करून, रांगोळ्या काढून दिवे लावले होते.त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी हिंदू धर्मातील लोक भारतात आणि भारताबाहेरही दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

 

भारतातील उत्तेरीकडील राज्यात या सणाला दिपावली असे म्हणतात.वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो.दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय .दिवाळी हा दिव्यांचा सण आहे.या दिवशी प्रत्येक घरात मोठमोठे कंदिल, घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात.

 

दिवाळी सणाच्या १५ दिवस अगोदरच दिवाळीच्या तयारीला सुरुवात होते.सर्वप्रथम लोक आपल्या घराच्या साफ साफ सफाईला लागतात.घराबाजूचा परिसरही स्वच्छ करतात.नंतर घरामध्ये वेगवेगळे गोड पदार्थ,लाडू, चकल्या, करंज्या, सकंरपाळी, फरसाण असे फराळाचे पदार्थ तयार केले जातात.घर वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तूनीं आणि विद्युत रोषणाईने मस्तपैकी सजवले जाते.घराच्या दरवाज्यात कंदिल लावला जातो.लहान मूलांची तर नुसती मज्जाच असते.लहान मुलांना घरातील प्रत्येकजण नवीन कपडे, भेटवस्तू आणि फटाके घेतात.लोकांची नवीन कपड्यांची आणि वस्तूंची खरेदी होते.दिवाळीची प्रत्येकाला सुट्टी मिळते.  शाळेतील मुलांना १५ दिवस दिवाळीची सुट्टी मिळते.

 

धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत असे मुख्यत्वे ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे पाच दिवस प्रत्येक घरी नुसती मज्जाच मज्जा आणि आनंद असतो.लोक एकमेकांच्या घरी, नातेवाईकांकडे आणि जवळच्या लोकांमध्ये जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात,एकत्र बसून फराळ करतात आणि त्यांना आपल्या घरी फराळाला येण्याचं निमंत्रण देतात. दिवाळीच्या फराळाशिवाय आणि मिठाई शिवाय दिवाळी सण झाला असा वाटतच नाही.दिवाळी हा सण आंनद ,हर्ष उल्लास आणि जीवन जगण्याची नवीन प्रेरणा घेऊन येतो.

 

दिवाळी हा सण लहानपणापासून आणि मोठ्या पर्यंत सगळ्यांचा खूप आवडता आणि उत्साहाचा सण आहे.या सणाला घरातील सगळे जण सर्व रुसवे फुगवे बाजूला करून एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात हा‌ सण साजरा करतात.दिवाळी या सणात लोक एकत्र आल्यामुळे एकीची भावना निर्माण होते.त्यामूळे दिवाळी हा सण मला खूप आवडतो.वर्षभर मी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो.

 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला मी दिवाळी सणाविषयी लिहिलेला Diwali Essay in Marathi हा लेख कसा वाटला ते तुम्हीं मला comment करून नक्की कळवा.तुम्हीं हा लेख तुमच्या मित्रपरिवारला, नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांमध्ये नक्की शेयर करा ही नम्र विनंती.

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts