Diwali Wishes in Marathi

Diwali Wishes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.भारतात वर्षभर वेगवेगळे सण येत असतात.दिवाळी हा त्यामधील सगळ्यात मोठा सण.दिवाळी म्हणजेच दिपावली दिव्यांचा सण.हा सण भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.हा एक भारतीय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण येतो.दिवाळीचा सण पाच दिवस चालतो- धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज.दिवाळीत लोक एकमेकांच्या घरी जातात एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात, फराळ खातात.लोक आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना whatsapp, message, fecebook वर Diwali Wishes in Marathi मध्ये शुभेच्छा पाठवतात.

Table of Contents

म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही निवडक Diwali Shubhechha in Marathi मध्ये आणल्या आहेत.तुम्ही ते आपल्या प्रियजनांना व्हाट्सअँप व फेसबुक द्वारे Marathi Diwali wishes आणि Diwali Greetings in Marathi मध्ये पाठवू शकता.

Diwali Wishes in Marathi

Diwali Wishes in Marathi

आली दिवाळी उजळला देव्हारा

अंधारात या पणत्यांचा पहारा

प्रेमाचा संदेश मनात रुजावा

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

 

 धनाची पूजा,

यशाचा प्रकाश,

कीर्तीचे अभ्यंगस्नान,

मनाचे लक्ष्मीपूजन,

संबंधाचा फराळ,

समृद्धीचा पाडवा,

प्रेमाची भाऊबीज,

अशा या दीपावलीच्या

आपल्या सहकुटुंब,

सह परिवारास सोनेरी शुभेच्छा

 

स्नेहाचा सुगंध दरवळला

आनंदाचा सण आला

विनंती आमची परमेश्वराला

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

आपणास आणि आपल्या परिवारास

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

 

महालक्ष्मीचे करून पूजन

लावा दीप अंगणी

धन-धान्य आणि सुख-समृद्धी

लाभो तुमच्या जीवनी

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त

मंगलमय शुभेच्छा…

 

चंद्राचा कंदील घरावरी,

चांदण्यांचे तोरण दारावरी

क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,

दिवाळीचे स्वागत घरोघरी

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

 

धनलक्ष्मी

धान्यलक्ष्मी

धैर्यलक्ष्मी

शौर्यलक्ष्मी

विद्यालक्ष्मी

कार्यलक्ष्मी

विजयालक्ष्मी

राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी

तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली…

 

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

 

माझ्याकडून आणि माझ्या

परिवाराकडून आपणास आणि

आपल्या परिवारास दीपावलीच्या

खूप खूप शुभेच्छा!

 

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..

विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो

तुम्हाला..

आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या

हार्दिक शुभेच्छा !

 

फटाक्यांची माळ,

विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,

फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,

भाऊबीजेची ओढ,

दीपावलीचा सण आहे

खूपच गोड..

दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

 

दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

जीवनाचे रूप आपल्या

तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,

खरोखरच अलौकिक असुन,

ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,

आणि वैभवाच्या दीपमाळांनी,

जीवन लखलखीत करणारी असावी…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दिवाळी अशी खास,

तिच्यात लक्ष्मीचा निवास…

फराळाचा सुगंधी वास,

दिव्यांची आरास…

मनाचा वाढवी उल्हास,

अशा दिवाळीच्या शुभेच्छा…

तुमच्यासाठी खास !!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची,

आनंदाची जावो…

* शुभ दिपावली *

 

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा

 

एक दिवा लावु जिजाऊचरणी

एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी

आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा

दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा.

आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच

जगदंबेचरणी प्रार्थना.

🚩 जय शिवराय 🚩

 

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..

बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या

परिवारास मनापासून शुभेच्छा

 

आज धनत्रयोदशी धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न

असू देत

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो.

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो.

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,

आनंदाची

आणि भरभराटीची जाओ.

!! शुभ दिपावली !!

 

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,

मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश

उजळवणारे फटाके,

येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी

!! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!

 

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी अत्तराचा घमघमाट,

लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,

पणत्या दारात एकशेआठ, आकाश दिव्यांची झगमगाट.

!!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

 

उटण्याचा नाजुक सुगंध घेऊन आली

आज पहिली पहाट

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी

उजळेल आयुष्याची वहिवाट

!! नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

सगळा आनंद, सगळे सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,

हे आपल्याला मिळू दे,

हि दीपावली आपल्या आयुष्याला,

एक नवा उजाळा देऊ दे.

!! दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !!

 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

!! आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली,

हासत, नाचत, गात यावी दीपावली,

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे,

शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे.

!! शुभ दीपावली !!

 

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

सुखं होवोत ओव्हरफ्लो,

मस्ती कधी न होवो स्लो,

धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,

असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

 

धनाची पुजा यशाचा

प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान

मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा

फराळ समृध्दीचा पाडवा

प्रेमाची भाऊबीज अशा या

दिपावलीच्या आपल्या

सहकुटुंब, सहपरिवरास

🪔सोनेरी शुभेच्छा!!!🪔

 

दीपावली असा आहे सण,

जो येतो बऱ्याच काळानंतर

वर्षातून एकदा.

चला मस्तपैकी करू फराळ

आणि खाऊ मिठाई,

तुम्हा सर्वांना दीवाळीच्या

खूप खूप शुभेच्छा.

🪔हॅपी दिवाळी.🪔

 

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,

आपल्या मेंदूला आणि बुद्धीला

गणेशासारखं बनवा.

सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या

आणि दिवाळीचा आनंद लुटा.

 

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,

फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,

पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,

दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,

🪔हॅपी दिवाळी.🪔

 

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,

प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,

नका विचार करू कोणी दिलं दुःख,

सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,

कधी न होवो निराशा…

आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔

 

दीप जळत राहो मन मिळत राहो,

मनातील गैरसमज निघून जावो,

साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,

हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात

आनंदाच्या भेटी आणो.

 

आहे सण रोषणाईचा,

येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,

सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,

लुटून घ्या सारा आनंद,

जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,

दिवाळीच्या पावन दिवशी

सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

 

अंधार दूर झाला रात्रीसोबत,

नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,

डोळे उघडा एक मेसेज आला आहे,

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.🪔

 

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल

सगळीकडेच

खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा

फटाक्यांचा पसारा

जशी दिवाळी ही सणांची सुरुवात होते, तशीच तुमच्या

आयुष्यातील चांगल्या काळाचीही सुरुवात व्हावी अशी

माझी इच्छा आहे…. माझ्या गोड भावाला दिवाळीच्या

हार्दिक शुभेच्छा.

 

रांगोळीच्या रंगांची,

उटण्याच्या सुगंधाची,

आकाश कंदिलाच्या रोषणाईची,

फराळाच्या चटकदार चवीची,

हि दीपावली आनंदाची, हर्षाची,

सौख्याची, समाधानाची!

आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष

सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि

आरोग्य संपन्नतेचे जावो…

शुभ दीपावली!

 

दीपावली आल्यावर काढा रांगोळी,

लावा दीवे,फटाक्यांचा होवो धूमधडाका,

तुम्हा सगळ्यांना दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,

कधी न होवो निराशा…

आम्हा सगळ्यांकडून दीवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.

 

सज्ज होवो संपूर्ण संसार,

अंगणात विराजो लक्ष्मी,

करे विश्व सत्कार,

मन आणि अंगणात उजळो हा दीव्यांचा सणवार.

 

दीवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही

लावतील फुलबाजे,

त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही

हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी

रोषणाई…

सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.

 

सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला

दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय

शुभेच्छा

!!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…

 

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निराशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 

लाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू

शकतात

प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद. तुला‌

मिळत राहो.

आणि‌ तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे…….

 

दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती,

समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य. दीपावली

शुभेच्छा……

 

दिवाळी हा सण पराभवावर विजय, अंधारावर प्रकाश,

अज्ञानावर ज्ञानाने केलेला विजय साजरा करणारा

प्रसंग. या शुभप्रसंगी तुमचे जीवन आनंदाने शांततेने

उजळून जावो.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा……

 

आपल्यासारख्या प्रेमळ लोकांच्या शुभेच्छांसह

दीपावलीचा हा आनंदमय उत्सव अपूर्ण आहे.

दीपावलीच्या  मनःपूर्वक  शुभेच्छा…..

 

दिवाळी म्हणजे काळया रात्रीवर उजेडाने मिळवलेला

विजय.

तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

फुलांची सुरुवात कळी पासून होते. आयुष्याची सुरुवात

प्रेमाने होते. प्रेमाची सुरुवात आपल्या माणसांपासून

होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्यापासून

होते.हॅप्पी दिवाळी…..

 

दिवाळीच्या शुभ दिनी तुम्हाला यश आणि समृद्धी

लाभो.दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

 

दिवाळीच्या या शुभ प्रसंगी मी अशी आशा करतो की,

दिवाळीच्या झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशाने तुझ्या

डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल

आणि तू माणसात येशील.

हॅप्पी दिवाळी…..

 

शंका अंधारा सारखी असते, तर विश्वास प्रकाशा

सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार

नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि

सुरक्षितपणे साजरी करूयात…..

 

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी

लक्ष्मीचं,या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप

खूप आनंद,रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता

लक्ष्मीचं आगमन……

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा

खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी,

मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी

खरी दिवाळी. हॅपी दिवाळी……

 

एक करंजी… आनंदाने भरलेली,

एक शंकरपाळी… चौकस विचाराची,

एक चकली… कीर्ती विस्तारणारी,

एक लाडू… ऐक्याने एकवटलेला,

एक मिठाई…मनात गोडवा भरलेली,

एक दिवा… मांगल्य भरलेला,

एक रांगोळी…जीवनात रंग भरणारी,

एक कंदील…यशाची भरारी घेणारा,

एक उटणे…जीवन सुगंधित करणारे,

एक सण… समतोल राखणारा,

अन एक मी… शुभेच्छा देणारा.

तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप

शुभेच्छा….

 

“मराठमोळी संस्कृती आपली

मराठमोळा आपला बाणा

मराठमोळी माणसे आपण

मराठमोळी आपली माती

अशीच चिरंतन राहो

आपली ही प्रेमाची नाती

शुभ दिपावली…”

 

“चंद्राचा कंदील घरावरी,

चांदण्यांचे तोरण दारावरी..

क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,

दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभ दीपावली…”

 

“चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,

टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती

थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी

ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती

अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !!

दिपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!”

 

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान

असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच

देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

 

दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या

सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.

 

दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे,

सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत

आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे.

 

जर या Diwali Wishes in Marathi तुम्हांला पण आवडल्या असतील तर तुम्हीं त्या इतरांना पण शेयर करा जेणेकरून दुसरी लोक पण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या Happy Diwali Wishes इतरांना पाठवू शकतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts