Dr.Babasaheb Ambedkar Quotes in Marathi
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी लेखामध्ये Dr.Babasaheb Ambedkar Quotes in Marathi लिहिले आहेत .डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतातील एक महान विभूती.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाला स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी घालवले.डाॅ.बाबासाहेबआंबेडकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे . त्यांचे नाव कोणाला माहीत नाही असा भारतात कोणताही व्यक्ती नाही.दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते म्हणून मी या लेखामध्ये Dr.Babasaheb Ambedkar Quotes in Marathi हे Quotes लिहिले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित करून अस्पृश्यांना समस्याच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी केले.आपल्या भारत देशाचा कारभार ज्या संविधान मूळे चालतो ते संविधानडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले.
Dr.Babasaheb Ambedkar Quotes in Marathi
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा ग्रंथालयात जाऊ लागतील त्या दिवशी भारत महासत्ता बनेल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आकाशातील ग्रह-तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग ? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवण्याच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी अशा धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हा. पृथ्वीसारखे परप्रकाशित होऊ नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!.– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. – डॉ बाबासाहेब आंबेडकर
“धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.” — डॉ.बाबासाहेब आंबेडकर
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते”. — डॉ.बाबासाहेब आंबेडकर
वाचाल तर वाचाल.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हीं हे Dr.Babasaheb Ambedkar Quotes in Marathi वाचले असतील तर ते तुम्हीं इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.