Father’s day Quotes in Marathi

Father's day Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज आपण यापोस्टमध्ये Father’s day Quotes in Marathi हे लिहिणार आहोत.नेहमीच आपण आई बद्दल भरभरून बोलतो,लिहितो पण वडिलांना बद्दल बोलत नाही,लिहित नाही.आई चे प्रेम दिसते पण बाबांचे प्रेम दिसत नाही वडिल हे कधी आपल्या मूलांना बोलून दाखवत नाही की माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे पण आतून ते आपल्या मूलांवर अतोनात प्रेम करतात म्हणूनच तर दिवसरांत्र कष्ट करून त्यांना चांगले खायला कसे मिळेल, त्यांचे शिक्षण कसे चांगले होईल, त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

लहान पणा पासून मोठं होईपर्यंत वडिल आपल्या मूलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. अशा वडिलांना आपण कधीतरी तुमच्या वर मी प्रेम करतो असं म्हटलं पाहिजे. वडिलांना Father’s day दिवशी त्यांना आपल्याला त्यांच्या बद्दल वाटणारे प्रेम व्यक्त केले पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत.असे शुभेच्छा Quotes मी Father’s day Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत.ते तुम्हीं तुमच्या वडिलांना पाठवून त्यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत.

Father's day Quotes in Marathi

Father’s day Quotes in Marathi

बाबांचा मला कळलेला अर्थ बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी झटणारं अंतःकरण Happy Father’s day

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा Happy Father’s day

माझे वडील माझे सर्वात चांगले सोबती आणि ते नेहमीच असतील

आपल्या संकटावर निधड्या छातीने मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात Happy Father’s day

बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत

स्वप्नं तर माझी,पण ती साकारण्याची ताकद दिली.तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात,माझ्या पाठिशी,तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा बाबा

फादर्ड डे आमचा रोजच असतो.कारण आमचे बाबा आमच्या घरातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेत.तरीही आज पुन्हा एकदा जागतिक फादर्स डे च्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. Happy Father’s day

लग्न होवो, मुलीला मुलं होवो पण वडिलांसाठी ती नेहमी छकुलीच असते.

डोळ्यांत कधीही अश्रू न येणाऱ्या,पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या,बाबांना आजच्या जागतिक फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.माझे वडील, माझे परमेश्वरआणि माझे नशीब ते आहेत Happy father’s day

डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यँत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण… डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात…!

ध्येय दूर आणि प्रवास फार आहे‌ लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे मारून टाकले असते या जगाने केव्हाच..परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत फार आहे.हॅप्पी फादर्स डे पप्पा

बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे पण मला खात्री आहे की तुमच्या आशीर्वादाने मी इतका कर्तुत्ववान होईन एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल

आयुष्यभर…लढतो, झिजतो बाप माझा.त्याची कुणास कदर आहे.ढाळत नाही अश्रू कधी त्याला कुठं पदर आहे..!!

या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत ज्यांना वाटते की त्यांची मुले त्यांच्या पेक्षा जास्त यशस्वी व्हावेत..

झोप आपली विसरून झोपवले आम्हाला अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला गोदीत घेऊन खेळवले आम्हाला जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला खूप खूप धन्यवाद बाबा..!

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा

तुम्ही माझे सुपरहिरो, माझे चांगले मित्र,आणि समस्या निवारक आहात.पितृदिनच्या शुभेच्छा बाबा.

एक चांगला वडील म्हणजे,आपल्या समाजातील अतुलनीय, अप्रशिक्षित,कोणाचेही लक्ष न दिले गेलेले, आणितरीही सर्वात मौल्यवान संपत्तीं आहे.हैप्पी फादर्स डे पप्पा..

पिता हि एक अशी व्यक्ती आहे,ज्यात आपण किती उंच वाढलात,तरी या कडे लक्ष देत नसाल.

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…

आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतो आयुष्यात सोनेरी प्रत्येक दिवस असतो मिळते प्रत्येक कार्यात यश त्यांना ज्यांच्या सोबत बाबा प्रत्येक क्षण असतो बाबांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्य जगण्याची खरी मजा तर वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती आमच्या कमाईत तर आवश्यकता देखील पूर्ण होत नाही..!हॅप्पी फादर्स डे पप्पा!

चट्का बसला, ठेच लगली,फटका सला तर“आई ग…!”हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा”बाप रे!”हाच शब्द बाहेर पडतो.छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो.

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो…Father’s Day च्या शुभेच्छा!

आई बाळाला ९ महिने पोटात सांभाळते तर बाप बाळाला आयुष्यभर डोक्यात सांभाळतो जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही. त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.

स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो, तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो…Father’s Day च्या शुभेच्छा!

देवाने सर्व काही दिलं आहे, अजून काही मागावं वाटत नाही. फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Father’s day Quotes in Marathi आवडले असतील तर तुम्हीं ते इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.

..

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts