Friendship Quotes in Marathi
प्रत्येकाच्या जीवनात मित्र आणि मैत्रिणी असतात.कोणीही आपल्या सोबत नसले तरीही मित्र आपल्या कायम पाठीशी असतात.जवळचे मित्र खरोखरच जीवनाचा खजिना असतात, ते आपल्याला स्वतः पेक्षाही जास्त चांगले ओळखतात, ते नेहमी मार्गदर्शन करतात आपले सुख द्विगुणित करतात आणि अश्रू वाटून घेतात, त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी याची आठवण करून देते की आपण कधीच एकटे नाही.अशा मित्र आणि मैत्रिणींसाठी मी Friendship Quotes in Marathi मी या लेखात लिहिले आहेत ते तुम्हीं जरुर वाचा.
Friendship Quotes in Marathi
जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते
आयुष्य बदलत असतं वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात
आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते.
मैत्री ती नाही जी जीव देते,मैत्री तीही नाही जे हास्य देते,खरी मैत्री तर ती असते जी,पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.मैत्री नावाच्या नात्याची,वेगळीच असते जाणीव,भरून काढते आयुष्यात,प्रत्येक नात्यांची उणीव
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
तेज असावे सूर्यासारखे,प्रखरता असावी चंद्रासारखी,शीतलता असावी चांदण्यासारखी,आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफल होतं देवाच्या चरणी पडून जसं फुलांचही निर्माल्य होतं.
मैत्री करत असाल तर चंद्र तारे यांसारखी अतूट करा.ओंजळीत घेवून सुद्धा आकाशात न मावेल अशी करा.
निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो.
मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा.अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा.
एखादयाशी सहजचं हसता हसता,रुसता आल पाहीजे.त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,पुसताही आल पाहीजे.मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,राहता आल पाहिजे.
बंधना पलीकडे एक नाते असावे,शब्दांचे बंधन त्याला नसावे,एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,दु:खाला तिथे थारा नसावा,असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री हि नेहमी गोड असावी,जीवनात तिला कशाची तोड नसावी,सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
मेल्यावर स्वर्ग नको आम्हांस,जिवंत पणी यश पाहिजे,अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल.
विसरु नको तु मला,विसरणार नाही मी तुला,विसरतो का कधी कोण आपल्या मित्राला, मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,कस विसरु शकतो मी तुला.
चांगल्या काळात हात धरणे,म्हणजे मैत्री नव्हे,वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.
आपली मैत्री एक फुल आहे,ज्याला मी तोडू शकत नाही,आणि सोडू ही शकत नाही,कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
आपले मित्र ना राजा ना वजीर पण,मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !
एका मित्रासोबत अंधारात चालणे,एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येऊ शकतो,मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.
जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले
प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,मित्र तर जगात भरपूर आहेत,पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.
मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,जरी ते रोज बोलत नसले तरी…
कोणी कितीही बोललं तरी,कोणाचं काही ऐकायचं नाही,कधीही पकडले गेलो तरी,मित्रांची नावं सांगायची नाही…
मी तुला विसरणार नाही..याला विश्वास म्हणतात,आणि तुला याची खात्री आहे..यालाच मैत्री म्हणतात.
तेज असावे सूर्यासारखे,प्रखरता असावी चंद्रासारखी,शीतलता असावी चांदण्यासारखी,आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मैत्री माझी तोडू नकोस,कधीच माझ्याशी रुसु नकोस,मला कधी विसरु नकोस,फक्त माझ्या मैत्रीची..जागा कोणाला देऊ नकोस.
आयुष्यात माझ्या जेव्हा,कधी दुःखाची लाट होती,कधी अंधेरी रात होती,तेव्हा मित्रा तुझी आणि..तुझीच साथ होती.
आयुष्याचा अर्थच मला.तुझ्या मैत्रीने शिकवला! मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते…तुझ्याशी मैत्री केली आणि..जगण्याचे संदर्भ बदलत गेले
निखळ मैत्री ही अत्यंत दुर्मिळ आणि मोत्यासारखी मौल्यवान असते.
जवळचे मित्र खरोखरच जीवनाचा खजिना असतात, ते आपल्याला स्वतः पेक्षाही जास्त चांगले ओळखतात, ते नेहमी मार्गदर्शन करतात आपले सुख द्विगुणित करतात आणि अश्रू वाटून घेतात, त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी याची आठवण करून देते की आपण कधीच एकटे नाही.
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.
मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.
कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा.
मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.
मैत्री ना सजवायची असते , ना गाजवायची असते , ती तर नुसती रुजवायची असते …
मैत्री तुझी माझी रोज आठवण न यावी असे होतच नाही,रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात
मैत्री म्हणजे थोडं घेणं मैत्री म्हणजे खूप देणं मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाणं
जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही
चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते पण मैत्रीला नाही.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.
शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात करता येत नाही.
दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.
मित्र कितीही वाईट झाला तरी,त्याच्यासोबत मैत्री नका तोडू,कारण पाणी कितीही खराब झाले तरी,ते आग विजवण्याचा कामात येतच असते.
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे. हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Friendship Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comment करून नक्की कळवा.आणि हे Quotes तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला Friendship दिवशी जरूर पाठवा आणि तुमची मैत्री आणखी मजबूत करा.हे Friendship Quotes Marathi तुमच्या मित्रपरिवारला आणि तुमच्या कुटुंबात आणि जवळच्या लोकांमध्ये शेयर करा.