Funny Jokes in Marathi
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे. सध्याच्या काळात माणसाचे जीवन हे खूप निराशाजनक आणि कंटाळवाणे झाले आहे.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही टेंशन आणि दुःख आहे त्यामूळे माणूस हसायचा विसरून गेला आहे.आपण रोजच्या जीवनात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला चेहरऱ्यावर थोडे तरी हसू आवश्यक असते.
हसल्यामूळे मनाला थोडा तरी आनंद मिळतो.थोडतरी टेंशन दुर होते.हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसणे गरजेचे आहे.असे Funny Jokes in Marathi मी तुमच्यापर्यंत या लेखाच्या माध्यमातून आणले आहेत.हे Funny Jokes वाचून तुमच्या चेहऱ्यावर हास्य आले तर माझे प्रयत्न यशस्वी होतील.
Funny Jokes in Marathi
वैभव पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
वैभव : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू !!
😜😜😜
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो..
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,त्या तुझ्या मावश्या आहेत..
😜😜😜😜
जो नेहमी हसत असतो त्याला HAS MUKH म्हणतात… आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्यालाHUS BAND म्हणतात.
😆😆😆
सासू: कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने…!
😆😆😆
शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन..
पिंट्या: ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा.. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…
😜😜😜😜
तुमचे वडील गरीब असतील, तर ते तुमचं दुर्भाग्य..पण तुमचा सासरा गरीब असेल, तर तो तुमचाच गाढवपणा…! 😃😃😃😃
रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद: बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय..
नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो
😆😆😆😆
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला.लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही 😆😆😆
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू
दुसरा – येडा झालास का तू पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…
😃😃😃😃
एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते
दुसरा – अरे खूपच नशीबवान आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते
😜😜😜😜
इतके कमी गुण, दोन कानाखाली मारायला हव्यात गण्या – हो बाबा लवकर चला, मी तर त्या शिक्षकांचे घरही पाहून ठेवले आहे 😃😃😃
टिचर : बंड्या तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस ?
बंड्या : बाई मी गरीब घरचा आहे, मला “WhatsApp” 💬 परवडत नाही.
😜😜😜
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते.त्यात एक कुत्रा हि नाचत होता. लोकांनी विचारले तू का खुश आहेस ?त्यावर
कुत्रा 🐕 म्हणाला, वीज येईल तर खांब पण लागतील ना ! 😆😆😆😆
आय. आय. टी. चे विद्यार्थी : सर आज आम्ही अशी एक वस्तू बनवली आहे की,ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आर – पार बघू शकता ?
सर : गुड जॉब मुलांनो, काय बनवल आहे तुम्ही ?
विद्यार्थी : भिंतीला ‘होल’ पाडलाय !
😂😂😂😂
माणूस : केस बारीक कापा कटिंग वाला : किती बारीक कापू ?
माणूस : बायकोच्या हातात येणार नाही इतके..
मास्तर : कॉफ़ी शॉप आणि वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ? विद्यार्थी : सोप्प आहे सर, प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते आणि
शेवट वाइन शॉप मध्ये.
🤣🤣🤣🤣
काकू – काय गं लग्न झाले का तुझे ? मुलगी – हो..काकू – काय करतो तुझा नवरा ? मुलगी – पश्चात्ताप.
🤗🤗🤗🤗🤗
शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते. मुलगा : तुझे नाव काय गं ? मुलगी : मला ना सगळे ताई म्हणतात.
मुलगा : घ्या, काय योगा-योग आहे, मला सगळे दाजीम्हणतात.
😎😎😎😎😎😎
पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे. साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर : ३ लाख रुपये. पेशंट (थोडा विचार करून) : आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?
🤓🤓🤓🤓
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला.
मुलगी: बावळट, ब्रेक नाही का मारता येत…?
मुलगा (पुणेरी उत्तर) : अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु ?
😜😜😜😜😜
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो. नवरा : प्यायला पाणी आण गं?
बायको : तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून) : नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
😂😂😂😂
रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो. “बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही ?” हरहुन्नरी बायको उत्तर
देते :एकदम टक्कलच 👩🦲 करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात ,टाकून खेळवले असते.😎😎😎😎
नवरा : कुठे गेली होतीस ? बायको : रक्तदान करायला. नवरा : हे बरोबर नाही, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.
😎😎😎😎
नवरा : आजकाल तू खूप उदास असतेस. तुझ्याकडे पाहून तू आजारी आहेस असं वाटतं.जरा डॉक्टरांकडे जाऊन ये.
बायको : जाऊन आले. ते म्हणाले, रक्तामध्ये शॉपिंगची कमी आहे.तर दोन-चार मॉलमध्ये जाऊन या.खरेदी करा, वातावरण बदललं की
आपोआप ठीक व्हाल.
😎😎😎😎😎
नवरा : साजणी, तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा गं जरा
बायको : लाजत… तुम्ही पण ना… इश्य
नवरा : आईशप्पथ जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला..
😂😂😂😂
बायको : अहो ऐकलं कां ? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले !!
नवरा : एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते
😜😜😜😜
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.channel वर म्हैस दिसते.
नवरा : ती बघ तुझी नातेवाईक बायको :
अय्या… सासूबाई.
😜😜😜😜😜
शीला- मी काल माझ्या नवर्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुली बरोबर पाहिलं.
टीना- मग तू त्याला पकडलंस का?
शीला- कसं पकडणार मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना.
😆😆😆😆😆
मुलगीः माजा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः तुज्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे.तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर…
😎😎😎😎
एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.बाजूने एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!
😎😎😎😎
मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला..
😜😜😜😜
चिंटूचे वडील : बेटा, मला लग्न केल्याचा विलक्षण पश्चाताप होतोय. माझ्यावरून धडा घे आणि कधीही लग्न करू नको.
चिंटू : तुमची शिकवण नक्कीच लक्षात ठेवीन बाबा. तीच मी माझ्या मुलांनाही देईन.
😎😎😎😎
पती – आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून मी सिनेमाची तीन तिकीटे आणली आहेत.
पत्नी – पण तीन तिकीटे कोणासाठी?
पती – तू आणि तूझ्या आई- बाबांसाठी😂😂😂😂
पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना,ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.
🤓🤓🤓🤓
मुलगी : मला असा काहीतरी उपाय सांगा जेणेकरुन मी दिवसभर गोरी दिसेन…
डॉक्टर : पिठाच्या गिरणीत कामाला लाग ..
😜😜😜😜
बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही ?
वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …मग दाजी आयुष्यभर ..
🤣🤣🤣🤣
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की, कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा
अँडमिन “उगाचच” 5 किलोमीटर जाऊन आला…….!!
सासू – सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत सून – मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी😂😂😂😂
पुणेरी सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या
सासू – मग मी काय घालू?
सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना
😜😜😜😜
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
मुंबईकर : नको हो,आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण अजून खा की, इथे कोण मोजत बसलंय?
😜😜😜😜
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता
😆😆😆😆
एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात… बहिण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहीण त्याला विचारते.,
बहीण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो
बहीण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : फँड्री
😜😜😜😜
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हीं हे Jokes वाचले असले तर तुम्हांला थोडा टाईम तरी बरे वाटले आणि तुम्हांला जर हे Funny Jokes आवडले असतील तर तुम्हीं ते इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.