Hanuman Jayanti Quotes in Marathi
Hii Friends,, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी भगवान बंजरग बली हनुमान यांच्या जयंतीनिमित्त Hanuman Jayanti Quotes in Marathi ही पोस्ट लिहिली आहे.प्रभू श्री रामांचा सर्वात आवडता आणि प्रिय भक्त म्हणजे श्री हनुमान.चैत्र पौर्णिमेला अंजनीच्या पोटी बजरंग बली हनुमान यांचा जन्म झाला.तो दिवस हनुमान जयंती म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.हनुमान जयंतीला लोक एकमेकांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतात . हिंदू धर्मातील लोक श्री हनुमान यांना खूप मानतात त्यांची मनोभावे भक्ती करतात.हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते.
Hanuman Jayanti Quotes in Marathi
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
राम लक्ष्मण जानकी… जय बोलो हनुमान की… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारूती रायाचा विजय असो… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
लंका जाळून सीता मातेला सोडवली, रामभक्त जय जय बजरंग बली… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरूद्राग्नी देखता कापती भये… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
महारुद्र अवतार हा सूर्यवंशीअनादिनाथ पूर्ण तारावयासीअसा चैत्री पौर्णिमेचा जन्म झालानमस्कार माझा तया मारुतीला🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!माझी प्रार्थना आहे की बजरंगबलीआपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या हृदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम…हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,शांती आणि समृद्धी मिळवून देवोआणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम…हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
श्री हनुमान आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ ||
जय देव जय देव जय हनुमंता ||
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ ||
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||
थरथरिला धरणीधर मानीला खेद ||
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||
रामी रामदासा शक्तपचा शोध ||
जय देव जय देव जय हनुमंता || २ ||
श्री मारूत्री स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा| पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम॥
श्री हनुमान चालीसा मराठी
।। दोहा ।।
श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुरू सुधारि ।
बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि ।।
बुद्धिहीन तनु जानिके , सुमिरौ पवन कुमार ।
बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।
।। चौपाई ।।
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर ।।
रामदूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवन सुत नामा ।।
महावीर विक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ।।
कंचन बरन बिराज सुवेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ।।
हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
कांधे मूंज जनेऊ साजै ।।
शंकर सुवन केसरी नन्दन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ।।
विद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ।।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
विकट रूप धरि लंक जरावा ।।
भीम रूप धरि असुर संहारे ।
रामचंद्र जी के काज संवारे ।।
लाय संजीवन लखन जियाये ।
श्री रघुबीर हरषि उर लाये ।।
रघुपती किन्हीं बहुत बडाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ।।
सहस बदन तुम्हरो यस गावै ।
अस कहि श्रीपति कंठ लगावै ।।
सनकादिक ब्रह्मादि मुनिसा ।
नारद सारद सहित अहीसा ।।
जम कुबेर दिकपाल जहां ते ।
कवि कोविद कहि सके कहां ते ।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ।।
तुम्हरो मन्त्र विभीषण माना ।
लंकेश्वर भये सब जग जाना ।।
जुग सहस्त्र योजन पार भानू ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ।।
प्रभू मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लांघि गये अचरज नाहीं ।।
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगमानुग्रह तुम्हरे तेते ।।
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ।।
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रक्षक काहु को डरना ।।
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनहु लोक हांक ते कांपै ।।
भूत पिशाच निकट नहिं आवै ।
महावीर जब नाम सुनावै ।।
नासे रोग हरे सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत वीरा ।।
संकट ते हनुमान छुडावै ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ।।
सब पार राम तपस्वी राजा ।
तिनके काज सकल तुम साजा ।।
और मनोरथ जो कोई लावै ।
सोई अमित जीवन फल पावै ।।
चारों जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ।।
साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ।।
अष्ट सिद्धि नव निधि के दाता ।
अस वर दीन जानकी माता ।।
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ।।
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ।।
अन्तकाल रघुबर पुर जाई ।
जहां जन्म हरि भक्त कहाई ।।
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेई सर्व सुख करई ।।
संकट कटे मिटे सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ।।
जय जय जय हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ।।
जो शत बार पाठ कर कोई ।
छूटहिं बंदि महा सुख होई ।।
जो यह पढे हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ।।
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मंह डेरा ।।
।। दोहा ।।
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला Hanuman Jayanti Quotes in Marathi हा लेख कसा वाटला ते तुम्हीं आम्हांला comment करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.