Happy Life Quotes Marathi
आयुष्य सुंदर आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आंनदी असणे गरजेचे आहे.मिंत्रानो आणि मैत्रिणींनो जीवन म्हणजे सुख आणि दुःख.जीवन आपल्याला एकदाच भेटलं आहे म्हणून प्रत्येकाने आपला प्रत्येक क्षण आनंदाने जगता जगावा.दु:ख तर येतंच असतं, संकट तर येतातच पण प्रत्येक संकटात चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे.कधीही हार मानता कामा नये .आनंद हा कधीही पैशामध्ये नसतो तर आपल्या समाधानावर असतो.गरीब माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानून आनंदात राहतो या उलट श्रीमंत व्यक्ती भरपूर पैसा कमवून सुध्दा दुःखी असतो.म्हणून मी आजच्या लेखामध्ये माणूस कसा सुखी आणि आनंदी राहू शकतो यासाठी काही Happy Life Quotes Marathi लिहिले आहेत.ते तुम्हीं नक्की वाचा.
Happy Life Quotes Marathi
आनंदी राहण्यासाठी एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा, इतरांकडून नाही.
सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जात बळजबरी केली तर मरून जात, निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसतं
खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
इतरांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते, त्यांची प्रगती साक्षात देव ही रोखू शकत नाही.
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्याला वाटाल,तेवढाच किंबहुना जास्त आनंद तुम्हांला प्राप्त होत असतो.
परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे.सतत कामात राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते.
वसंत ऋतूप्रमाणे प्रसन्नता ही मनोदयानातील सर्व कळयांना फुलवते.
आनंद हे अमृत आहे; परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे . दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होते.
तुम्हाला आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय करता यात समानता असेल.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी असणे,तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद लुटता हेच महत्त्वाचे आहे.
आनंद मिळवण्यासाठी, प्रथम स्वत: च्या मनाला शिस्त लावणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे.
ज्याच्या गरजा कमी,त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही,मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…
तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा
काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं
आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत
कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे
आनंदासाठी काम केले तर सुख मिळणार नाही,पण आनंदाने काम केले तर सुख नक्कीच मिळेल
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
आनंदी राहणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
वेळ म्हणतो मी परत नाही येणार काय माहीत तुला हसवणार की रडवणार जे जगायचे तुला या क्षणाला जगून घे कारण या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार म्हणून नेहमी आनंदी रहा.
यशस्वी व्यक्ती आनंदी असेल की नाही माहीत नाही पण आनंदी व्यक्ती यशस्वी अवश्य होतो.
पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.
मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय.
आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले,आता कळले आनंदी तर ते होतेजे आनंद वाटत होते.
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा…..प्रेम् मधुर आहे,त्याची चव चाखा….क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका….संकटे ही क्षणभंगुर आहेत,त्यांचा सामना करा….आठवणी या चिरंतन आहेत,त्यांना ह्रदयात साठवून ठेवा….
पाच सेकंद हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल.
” माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. “
” फक्त आनंद शोधा गरजा तर आयुष्यभर संपत नाहीत…!! “
दुसरं कोणी काय म्हणत आहे, याकडे कधीही लक्ष देऊ नका. कारण असं केलंत तर आनंंद कधीच मिळणार नाही.
” चिंता कशाला करत राहायची. चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येत, पुन्हा चांगली वेळ येते. स्थायी काहीच नाही. त्यामुळे आनंदी राहा. “
जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल.
” तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही. ”
” तुम्हाला नक्की काय हवंय हा आनंद नाही तर तुम्हाला नक्की काय मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं हा आनंद आहे…!! “
आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो.
तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.
जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल
आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं.
आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत
लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो.
आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही.
कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळवू देणार नाही
मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही.
पैशांसाठी काम न करता आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते काम केले तर संपूर्ण जीवन आनंदी होऊन जाते.
नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा
आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो..काहींना आपल्या वेदना लपवता येतात,काहींना नाही.
आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी आपली बोटे सुगंधित होऊन जातात
कोणत्याही बाजारात आनंद विकत मिळत नाही आनंद मिळवण्यासाठी स्वभाव पवित्र असावा लागतो
माणसाच्या मोठ्या दुःखात छोटासा आनंद मिसळला कीआयुष्यात सुखाची चव येते
छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणार आनंद जीवनात मोठे मोठे सुख देऊ शकते
स्मरणातील गोड क्षणाचा आनंद भूतकाळ आपल्याला देतो इच्छित स्वप्नांचा आनंद भविष्यकाळ आपल्याला देतो पण जीवनात खरा आनंद आपल्या वर्तमानकाळातच मिळतो
तुमच्याकडे काय आहे काय नाही यापेक्षा तुम्ही कसे आहात तुमची वागणूक कशी आहे हे सर्वात महत्वाचे आहे यामुळेच दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणू शकता
आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्या कठीण काळात आपल्या सोबत असणे म्हणजे सर्वात मोठा आनंद होय
मनुष्याच्या जीवनात आनंद हा अमृतासमान आहे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी सागरमंथन करणे गरजेचे आहे आनंदरूपी अमृत मिळवण्यासाठी दुःखाचे मंथन करणे आवश्यक असते
तुम्ही दुःख कधी मौल्यवान दागिन्यासारखे घालून मिरवू नका जर काही दुसऱ्याला देयायचेच असेल तर आनंद द्या आपण दुसऱ्यांकडून आनंदाची अपेक्षा करतो कारण दुःख तर आपल्याकडेही भरपूर आहे
जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसती तरी चालेल परंतु जीवनात आनंदचा बॅलन्स भरपूर हवा
आपल्याला मिळालेल्या गोष्टीत समाधान मानले कि प्रत्येक गोष्टीत आनंद वाटतो
आनंद मिळवण्यासाठी स्वप्न पाहायला शिका स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला शिका आपले जीवन जगायला शिका
तुमच्या कर्मामुळे तुम्हाला आनंद मिळतो त्यामुळे चांगले कर्म करा आणि आनंदित व्हा
आनंद हि अशी गोष्ट आहे जी वाटल्याने अजूनच वाढते
स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या त्रासानंतर स्वप्नपूर्ती नंतर मिळतो तो खरा आनंद
मित्रांनो तुम्हांला हे Happy Life Quotes Marathi कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comment करून सांगा.आणि हे Quotes इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.