Holi Wishes in Marathi | होळीच्या शुभेच्छा
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे.भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. येथे प्रत्येक महिन्यात एक तरी सण येतो त्यापैकी होळी हा हिंदू धर्मातील खूप मोठा सण आहे. होळी हा सण लोक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना होळीच्या सुंदर अशा शुभेच्छा देतात.अशा होळीच्या शुभेच्छा मी या Holi Wishes in Marathi या Post मध्ये लिहिल्या आहेत.
Holi Wishes in Marathi
लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
होळी/रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
आली होळी, आली होळी,नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी, रंगी रंगू सर्वांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
मिळू द्या उत्सहाची सात
होऊ द्या रंगांची बरसात
होळी आली नटून सवरून
करू तिचे स्वागत जोशात
भरू पिचाकरीत रंग
बेभान करेल ती भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग
मिळू द्या उत्साहाची सात
घेऊ हातात आपण हात
अखंड बुडू या रंगात
बघा आली ती टोळी
घेऊन रंगांची ती पिचकारी
हसत खेळत अशीच साजरी करू
परंपरा आपली ही मराठमोळी
म्हणा एका जोशात एकदा
होळी रे होळी, आली स्पंदनची टोळी
तोंडात पुरणाची पोळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी
आली आली पाहा थंडीत होळी
मनाशी मन मिळवण्यासाठी
मनातील द्वेष मिटवण्यासाठी
थोडी तिखट उसळ चण्याची
नंतर मिळते पाहा पोळी पुरणाची
दिवस दुसरा रंगत सणांची
सर्वत्र होते उधळण रंगांची
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
होळीच्या हरित शुभेच्छा
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
बोंबा मारुनी केला शिमगा,
अरे, अमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
तमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
अनेकांचा होळीनिमित्त,
तिर्थ प्राशनाचाही कार्यक्रम झाला.
कारण, दुस-या दिवशी होती सुट्टी,
साजरी झाली होळी
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
होळीच्या रंगांचा उत्सव,
सुखाच्या तुमच्या जीवनात आनंद भरा,
आणि तुमच्या मनात चंद्रविना उजाळा झाला,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
केवळ होळीच्या रंगांचा नाही तुमच्या जीवनात उत्सव,
असे रंगांचे स्पर्श तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि उमंग घालतील,
याचा निश्चित सुख तुमच्या जीवनात अनुभवू द्या याची कामना आहे
माझ्याकडून,होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीचा उत्सव हर्षोल्हासाचं वेडा आणि प्रेमाचं वेडा आहे,
जोपर्यंत त्यात आम्ही सामील होतो तोपर्यंत तुमचं जीवन सुखाचं राहावं,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज होळीचा दिवस आहे, तर समुद्राच्या तटांवर काही जाहीर झाले नाहीत,
पण माझ्या तळावर जर कोणी फूल नेता तर मी त्यांच्यासोबतच वसू शकतो,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीचा उत्सव आणि त्याचा रंग ज्याला प्रेम म्हणतो त्याला रंग तणखेळ घडतो,
आणि ज्याला मनातलं झालं त्याला तो रंग भव्य आणि सुखद व्हावं,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगणात सजलेली गुलालची फुलझडी,
उत्साहाची सारी दुनिया झळकते रंगांची धुंद,
आणि मातीतल्या नवीन रंगांचा मस्तीचा विस्तार होईल,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे
रंग उधळू दे
मतभेद मिटू दे
प्रेमच प्रेम सर्वत्र बहरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
दहन व्हावे वादाचे पूजावे श्रीफळ संवादाचे
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दहन करूया वाईट विचारांचे
दहन करूया वाईट प्रवृत्तीचे
फाल्गुन पौर्णिमेच्या शुभदिनी
पेटवू वाईट विचारांची होळी
आनंदाने भरो आपली झोळी
साजरी करूया रंगबेरंगी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच करायची तर अहंकाराची- होळी करा,
असत्याची- होळी करा,
अन्यायाची- होळी करा, जातीयतेची- होळी करा
धर्मवादाची- होळी करा होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळी करा नकारात्मक विचारांची,
होळी करा व्यसनांची,
होळी करा वैर भावनेची,
वाईटाची होळी करा, चांगल्याची संगत धरा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून
सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग,
रंगपंचमी घेऊनि आली विविधतेचा संग,
उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे,
परस्परांवर प्रीत जडावी विसरू रुसवे फुगवे,
रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,
चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा,
करूया अग्निदेवतेची पूजा
होळी गोवऱ्यानी सजवा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण,
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझे शब्द नेहमी गोड असू दे,
तुझी पिशवी आनंदाने भरली जावो,
तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा
अंगणात सजलेली गुलालची फुलझडी,
उत्साहाची सारी दुनिया झळकते रंगांची धुंद,
आणि मातीतल्या नवीन रंगांचा मस्तीचा विस्तार होईल,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग न जाणती जात नि भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवुया प्रेम रंगाचे मळे…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
होली दर वर्षा येते आणि ,
सर्वाना रंगून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्य प्रेमाचा रंग,
तसाच राहतो,
होळीच्या शुभेच्छा….
इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्या मनातील वाईट विचारांना
होळीसारखे अग्नीत जाळून राख करावी व
नवीन विचारांची उधळण व्हावी
हाच होळी साजरा करण्याचा उद्देश
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
मित्रांनो तुम्हांला या शुभेच्छा आवडल्या असतील अशी मी आशा ठेवतो.तुम्हांला या शुभेच्छा वाचून मनाला समाधान वाटले असेल असं मी गृहीत धरतो.मित्रांनो तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Holi greetings n Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच शेयर करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी होळीच्या शुभेच्छा आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.