Life Status in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आयुष्य एकदाच भेटते म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि हसतमुखाने जगला पाहिजे.आयुष्यात कितीही संकटे आली तरी प्रत्येक संकटाच्या पुढे पोलादा सारखे उभे राहायचे.प्रत्येक व्यक्तीखडे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे आणि जीवन हे मस्तपैकी जगल पाहिजे.कोणत्यही गोष्टीचा विचार न करता आपल्या मेहनतीने जीवनातील प्रत्येक गड यशस्वीपणे सर केला पाहिजे.ज्या व्यक्तींकडे विचारांचा अनमोल खजिना आहे तो व्यक्ती आपले जीवन निडरपणे आणि हसतमुखाने आणि आनंदात घालवतो.असे Life Status in Marathi मी या लेखात लिहिले आहेत.असे सुंदर Life Status वाचून तुम्हीं तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकता.

Table of Contents

Life Status in Marathi

Life Status in Marathi

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

योग्य निर्णय घ्यायचे,तर हवा अनुभव..जो मिळतो,चुकीचे निर्णय घेऊनच!

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

विश्वास एखाद्यावर इतका करा की,तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात,ते महत्वाचं नाही,तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत,याला महत्व आहे.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधरण्याची संधी देते.

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे..तो त्यालाच मिळतो,जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.

झाडासारखे जगा… खूप उंच व्हा…पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,जे आपल्याशी वाईट वागतात,त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,ते चांगले आहेत म्हणून नाही,तर आपण चांगले आहोत म्हणून.

आपल्या आयुष्यात,एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका !कारण जेव्हा ते बदलतात,तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !

किती दिवसाचे आयुष्य असते,आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावं ते हासून-खेळून,कारण या जगात उद्या काय होईल,ते कुणालाच माहित नसते.

जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो,तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो.

विश्वास ठेवा,आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं..इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम, वागण्यात नम्रता,आणि हृदयात गरिबीची जाण,असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात.

कोणीतरी बर्फाला विचारले,आपण एवढे थंड कसे?बर्फाने अगदी छान उत्तर दिले,माझा भूतकाळ पण पाणी‌ आणि भविष्यकाळ पण पाणीच! मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा.

हसण्याची इच्छा नसली तरी,हसावे लागते..कसे आहे विचारले तर,मजेत म्हणावे लागते..जीवन एक रंगमंच आहे,इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही,निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

छोट्या या आयुष्यात,खूप काही हवं असतं,पण पाहिजे तेच मिळत नसतं,असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,माणसाला मिळत नसतात,पण न मिळणाऱ्या गोष्टीच,माणसाला का हव्या असतात ?

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,कारण उत्तम दिवस आठवणी देतात,चांगले दिवस आनंद देतात,वाईट दिवस अनुभव देतात,तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.

रात्र नाही स्वप्नं बदलते,दिवा नाही वात बदलते,मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,कारण नशीब बदलो ना बदलो,पण वेळ नक्कीच बदलते.

जीवन चहा बनवण्यासारखे आहे..अहंकाराला उकळू द्या,चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,दुखणं विरघळून जाऊ द्या,चुकांना गाळून घ्या आणि,सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात,‌ मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

आयुष्यात कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात.

इच्छा काहीच नाही फक्त आई खुश राहायला पाहिजे..!

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.

होणार की सगळी स्वप्न पूर्ण फक्त आपण हार नाही मानायची..!

एकटं चालायला लागलो तेव्हा कळालं कोण आपलं आहे आणि कोण परक..!

आईला खूप वेळा रडताना पाहिलंय पण ज्या दिवशी वडील रडतात तेव्हा काळजावर वार झाल्यासारखं वाटतं..!

पैश्या समोर नात्यांची तुलना करू नका कारण वेळ प्रत्येकाची येते..!

शांत राहणे ही सुध्दा एक नशा आहे,सध्या मी त्याचं नशेत असतो..!

अडचणी सर्वांना असतात तुम्ही त्यांना कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं‌ यश अवलंबून असतं..!

यशाची उंची गाठताना कामाची कधी लाज बाळगु नका आणि कष्टाला कधीच घाबरू नका..!

नावापुरती मानसं आणि गरजे पुरती नाती आयुष्यात नसलेली बरी..!

कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक फक्त तुमच्या सोबत असल्याचं..!नाटकं करत असतात

माहिती नाही काय चाललंय आयुष्यात दिसायला तर सगळं छान दिसतंय पण आतुन मन खूप दुखतंय..!

ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्दय जिंकत आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो आनंदाने जगा.

आपल्यावर जळणारे जरी परके असले तरी आग लावणारे मात्र आपलेच असतात..!

ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..!

इथे भारी कपडे, भारी फोन बघुन लोक श्रीमंत आहे का नाही याचा अंदाज लावतात..!

जिवनात वादळ येणं देखिल आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण आपलं आहे आणि कोण परकं..!

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत ?यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,जगात अशक्य काहीच नसतं.

आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या..!

पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि माज सोडून करावा लागतो..!

आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच दिला जातो..!

जबाबदारीच ओझ पण काय कमाल आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि उशीर झाला तर जड जातं..!

मरण आलं तरी ऐटीत असावं फक्त ईच्छा एकच आहे,पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..!

पैसा बोलायला लागला की समजुन जा माणसाची आणि नात्यांची किंमत संपली आहे..!

राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक झाल्यावर थोड नमल तर जगातल्या‌‌ सर्व समस्या दूर होतात..!

छोटसं आयुष्य आहे,ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमची किंमत जाणतात.

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..

परिस्थिती कशीही असुद्या हो,फक्त मनात इच्छा पाहिजे मदत करण्याची.

नशीब आणि मनाचं कधीच जुळत नाही कारण जे मनात असतं ते नशीबात नसतं.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.प्रत्येकजण आपापल्या‌ संकटांशी झगडत असतो..काहींना आपल्या वेदना लपवता येतात,काहींना नाही.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,चांगली पाने मिळणे,आपल्या हातात नसते.पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे,यावर आपले यश अवलंबून असते.

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा,सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्याच्यासाठी रडू नका ,कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ,ते तुम्हाला रडूच देणार नाहीत ..

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

विचार कराण्यासाठी वेळ द्या.पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे सोडून द्या आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे खरी परीक्षा असते,कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

अपयश म्हणजे संकट नव्हे;आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,फक्त दोनच कारणे असतात,एकतर आपण,विचार न करता कृती करतो,किंवा कृती करण्याऐवजी,फक्त विचारच करीत बसतो.

जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत,कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत..हे सूत्र लक्षात घेतले तर,मनुष्य सरळ वागू शकेल.

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते.

दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.

आयुष्य एकच आहे पण,त्याला चांगल्या प्रकारे जगलं ना,तर एकचं खूप आहे

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं.

आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत….चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत…चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात.

जन्म हा पाया तर मृत्यू हा जीवनाचा कळस असतो.

कले शिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फूल आणि प्राणा शिवाय शरीर.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Life Status in Marathi आवडले असतील तर तुम्हीं आम्हांला comment करून सांगा आणि हे Life Quotes तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये शेयर करा जेणेकरून ते लोक पण हे उत्तम विचार आपल्या जीवनात आत्मसात करतील.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts