[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार
Hi friends , तुमचे माझ्या mdknowledge या Blog वर स्वागत आहे.मानवी जीवन हे अनेक समस्यांनी भरलेले आहे.जीवन नुसते कंटाळवाणे झाले आहे.अशा वेळी आपल्या मनाला समाधान आणि जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी आणि नवीन उमेद निर्माण करण्यासाठी काही विचांराची गरज असते.हे विचार सुविचार स्वरूपात उपलब्ध असतात.Marathi Suvichar -Best मराठी सुविचार मनाला शांती, समाधान देतात म्हणून मी मराठी भाषेमध्ये Marathi Suvichar तुमच्यापर्यंत उपलब्ध केले आहेत.या मध्ये तुम्हांला प्रेरणादायी, सकारात्मक, प्रेमाचे Best मराठी सुविचार वाचायला मिळतील.असे सुविचार वाचायला मिळाल्या मूळे तूमचे मन चांगल्या विचारांनी भरलेले राहील.रोज सकाळी असे Marathi Suvichar वाचण्याने आपल्या विचारात, आचरणात आणि ज्ञानात भर पडेल.
[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार
1.भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते. पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.
2 .रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो…नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो…..जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो…!
3.सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.
4.दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे.
5.जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल,तर स्वतःला खूप नशीबवान समजा!! कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो.ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
6.रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
7.ध्येय निश्चित करा.तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.ध्येयाने झपाटून जा.यश तुमच्याकडे अक्षरशा ओढलं जाईल.
8.”कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली कि माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो .
9.भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका.आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं .
10.ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
11.सुखात सुखी होतो ,आनंदात आंनदी होतो…. पण दुःखात हातात हात घालून बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र.
12.प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.
13.प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं.हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं .
14.नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…
15.तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका,वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.
16.डोळ्याला आवडतं ते प्रेम नसत. . मनाला भावत ते प्रेम.
17.आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही.
18.बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग
19.झाडासारखे जगा खूप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका
20.खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्या असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
21.शाती आणि आनंद विनामूल्य मिळवण्यासाठी नेहमी सर्वांना मदत करा.
22.आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
23.जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे.
24.आंनद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
25.यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही . जीवनात पूढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.
26.एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.
27.बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठ माहित असत एखाद्याच्या मनावर शब्द आणि शब्द कोरला जातो.
28.अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी तुमच्या अंगी जिद्दी पणाचा कस असावा लागतो.
29.जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे … आणि,ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.
30.विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
31.आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो
32.आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये.; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
33.एका आठवड्याचे ,’सात’ वारअसतात.’आठवा’ वार आहे “परिवार”; तो ठिक असेल तर सातहीवार ‘सुखाचे’ जातील !!
34.आयुष्य जगून समजते ; केवळ ऐकून,वाचून,बघून समजत नाही.
35.कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल ,तर अपयश पचविण्यास शिका.
36.आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
37.जेव्हा आपण मेहनत करून तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचे फळ भेटेल.अन्यथा देव पण कोणाला फूकट फळ देत नाही.प्रयत्नांशी परमेश्वर..!
38.प्रत्येक संकटात संधी दडलेली असते.
39.प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
40.शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो… कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ काहीच नाही…पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात… माणसे कमविण्यात जो आनंद आहे,तो पैसा कमविण्यात नाही.
41.जगाला काय आवडतं ते करू नका, तुम्हांला जे आवडतं ते करा, कदाचित उद्या, तुमच आवडतं जगाची “आवड” बनेल.
42..एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
43.प्रेम हे टवटवीत दिसणार्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काट्यांशी खेळावं लागतं.
44.दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका …!! वाटू शकलात तर आपला आनंद वाटा . . !! लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे …. !!!
45.परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
46.यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
47.जर तुम्हांला सूर्यासारखे चमकायचे असेल तर … तुम्हांला सूर्यासारखे जळाले लागेल…
48.दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
49.आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
50.कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
51.यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,हे मी सांगू शकणारनाही.पण स्वतःला ओळखून स्वतःला , स्वतःसाठी स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
52.देखणेपणावर जाऊ नका . सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो.
53.दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
54.”अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो “
55.आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
56.नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला
57.पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते .
58.पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर…. स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि……हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल.
59.विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही.
60.चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं…
61.कुणाची मदत करत असताना त्यांच्या डोळ्यात बघू नका..कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो.
62.जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.
63.भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
64.प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
65.सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते.
66.आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
67.तू येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही..पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळत नाही…!
68.आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
69.आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .
70.झाडे लावा झाडे जगवा.
71.एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
72.कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..दुःख असुनही दाखवायचं नसतं..अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..
हे ही वाचा: Motivational Quotes in Marathi