Marathi Ukhane For Female Romantic
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या महाराष्ट्रात लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी दोघांनाही वेगवेगळ्या सणांमध्ये आणि घरगुती कार्यक्रमात उखाणे घ्यावे लागतात.अशा वेळी अचानक कोणी उखाणे घ्यायला सांगितले तर लगेच उखाणे घ्यायला जमत नाही.जास्त करून नवरीला लोक उखाणे घ्यायला सांगतात असे Marathi Ukhane For Female Romantic उखाणे सहजपणे उपलब्ध झाले तर उखाणे घ्यायला सोपे पडते.
या Marathi Ukhane For Female Romantic लेखामध्ये सुंदर सुंदर नवविवाहित नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे सुद्धा सामायिक केलेले आहेत. या Marathi Ukhane For Girls संग्रहामधील Marathi Ukhane तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हे उखाणे तुम्हीं तुमच्या मैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर कर.
Marathi Ukhane For Female Romantic
सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
……रावामुळेच लागला मला त्यांचा लळा.
नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
……रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
……रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
……रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
हरीश्रंद्र राजा रोहिदास पुत्र
….रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र
सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान
…..रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
…..रावांची राणी झाले आहे मी भाग्यवान
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण
…..रावांचे नाव घेते ची सून
तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात
…….रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात
लग्नाच्या पंगतीत घेतला उखाणा खास
आणि …..रावांच्या घशात अडकला घास
एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व …..रावांची प्रेम ज्योती
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा
……रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
लग्नात लागतात हार आणि तुरे
……रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती
……रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी
……रावांचे नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी
रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास
……रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास
रुप्याची साडी तिला सोन्याचा गिलावा
…….रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
……रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी
एक तीळ सातजण खाई
……रावांना जन्म देणारी धन्य ती आई
सीते सारखे चारित्र्य रामा सारखे रूप
…….राव मला मिळाले आहेत ते अनुरूप
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध
…..रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद
आकाश आले भरुन चंद्र लपला ढगात
……रावांना हार अर्पण करून धन्य झाले जगात
विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर
…….रावांच्या साठी आई-वडिल केले दूर
शुभ मंगल प्रसंगी सर्वजण करतात आहेर
……..रावांच्या जीवनाकरिता सोडले मी माहेर
प्रेमरूपी संसार संसार रूपी सरिता
……रावांचं नाव घेते खास तुमच्याकरिता
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी
….रावांचे नाव घेण्याची वारंवार संधी
गार गार माठामधले पाणी ताजे ताजे
……राव माझ्या मनाचे झाले राजे
सासरचे निरंजन माहेरची फुलवतात
……रावांचे नाव घेण्यास करते मी सुरुवात
सोन्याची घागर अमृताने भरावी
…….रावांची सेवा आयुष्यभर करावी
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची
चांदणी तुमच्याच आशीर्वादाणे
बाग फुलवीत ……रावांच्या अंगणी
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
……. रावांना भरविते मी प्रेमाचा घास
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
…….रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
……….रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
…… रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद
शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
…….रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता
सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
…….रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
……. रावांचे नाव घेऊन सोडले काकण
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
……रावांना भरविते जिलेबिचा घास
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
…….रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
……रावांचे नाव घेते….. ची मी सुन
सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
……रावांचे नाव घेते ऐका सारेजण
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
……रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,
अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
चंद्र तारागणाच्या मेळाव्यात रजनी हसते,
………… बरोबर तोडे घेऊन बारशाला येते.
फोर प्लस फाइव इज इक्वल टू नाइन
माय मिस्टर,
………. इज व्हेरी व्हेरी फाइन.
वुलन कोट गोल्डन रिंग,
……… माय डिअर किंग.
श्रावण महिन्यात सण, उत्सवाची पर्वणी
………चं नाव घेते मी वाती सारण्याचा कारणी.
स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
………..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.
सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
………चं नाव घेऊन मी वाती सारते.
वेलीला शोभे फूल, स्त्रिला शोभे अपत्य,
………चं नाव घ्यायला वाती सारण्याचं निमित्त.
लक्ष्मी दानात शोभते, विद्या विनयेन शोभते,
……….चं नाव घेऊन मी वाती सारते.
क्षणाची विदयुलता ब्रम्हांड उजळी,
……..चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.
बागेतील फूल पूजेसाठी तोडते,
……… नाव घेऊन वाती सारते.
समईतील ज्योती भक्ती-भावाने उजळविते,
……… नाव घेऊन वाती सारते
आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,
…… ना घास देते गोड जिलेबीचा.
सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
…… ना देते….. चा घास.
चांदीच्या तबकात पकवणाची रास,
….. ना देते….. चा घास.
रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते,
…… चा घास….. ना देते.
गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा,
…… ना घास भरवते….. चा.
शरयू नदीत जन्म झाला मेघदूताचा,
….. ना घास घालते….. चा.
संसाराच्या सुख स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,
…… ना घालते…… चा घास.
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती,
….. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात
शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
….. रावांची मी छाया होऊन
सप्तपदी चालले
उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ….. रावां सारखे पती लाभले मला
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव ….. रावांचे घेते
वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा
चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
…..रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी
तुम्हांला जर हा लेख आवडला असला तर त्यावर तुम्हीं comment करा आणि इतरांना पण शेयर करा ही विनंती.
Read More :- Marathi Ukhane For Male Romantic