Marriage Anniversary Wishes in marathi
पती आणि पत्नीच नातं हे खूप खास असतं.ज्या दिवसापासून ते एकमेकांचे झाले म्हणजेच त्याच्यांत पती आणि पत्नीचं नातं निर्माण झालं तो दिवस त्या दोघांसाठीही खूप खास असतो.तो दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा दिवस.म्हणून प्रत्येक वर्षी ते दोघेही जण तो दिवस लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.त्या दिवशी आपण त्यांना Marriage Anniversary Wishes in Marathi मध्ये शुभेच्छा दिल्या तर त्यांचा दिवस आनंदात जातो.
नवरा-बायकोच्या नात्यामध्ये अधिक गोडवा वाढतो तो एखाद्या शुभदिनी. मग तो शुभ दिवस तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस असू शकतो किंवा लग्नाचा वाढदिवस. अशा शुभप्रसंगी त्यांना प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांच्या प्रति असलेली भावना, प्रेम व्यक्त करण्याची जणू काही सुवर्ण संधीच असते. आपल्या नात्यातील सर्व खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद डबल करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Marriage Anniversary Wishes in Marathi हे मेसेज आपण जोडप्याला पाठवून त्यांचा आनंद डबल करू शकता.
Marriage Anniversary Wishes in Marathi
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव करो ,असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश ,
असंच सुगंधित राहावं,हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो क्षण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अशीच क्षणा-क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्रापेक्षा सखोल तुमचे नाते,
आकाशापेक्षा उंच तुमचे नाते,
असेच असू द्या एकमेकांसोबत चे तुमचे नाते,
प्रेमाची ओळख असावी तुमचे हे नाते,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी,
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear
अतूट नातं हे लग्नाचं,
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं,
हीच आहे माझी शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ घडीला सदा
कायम राहो सहवास तुमचा.
तुझं माझं नातं असंच प्रेमळ राहावं,
तुझ्याशिवाय जीवन एक क्षणही नसावं,
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा,
यालाच समजून घे माझी शायरी,
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी ,
रंगून जावो प्रेमात तुम्ही
मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील चांगला काळ आठवणीत ठेवा
आणि वाईट काळ विसरून जावा
चांगल्या आठवणी साठवून ठेवा
दुःखी आठवणी विसरून जावा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
खरे प्रेम कधीच मरत नाही ते
काळानुसार दृढ होते आणि
वाढतच राहते ,आणि हे स्पष्ट
आहे की आपले एकमेकांवर
खूप प्रेम आहे आणि हे प्रेम
खूप मजबूत आहे
Happy Marriage Anniversary
हाच तो मिलनाचा क्षण
तुमची प्रेम गाठ सात जन्मासाठी बांधली
आणि तुमच्या नवीन पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झाली,
त्या क्षणाची आठवण करून देणारा हा क्षण तुमचं हे पवित्र नातं
असच फुलत राहावं सदैव प्रेम
तुमच्यात वाढत राहावं
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी कधी न तुटो ,
ईश्वर करो आणि तुमच्या दोघांवर कोणीही न रुसो ,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण न सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि
एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Marriage Anniversary Wishes In Marathi
दररोज उगवणारा सूर्य चकाकी देवो तुम्हाला
आयुष्यात प्रत्येक पावलावर यश मिळावे तुम्हाला
सर्व सुख समृद्धी देव तुमच्या पदरात घालो
या जन्मा सारखे असंख्य जन्म तुम्हाला एकमेकांसोबत मिळो
लग्नवाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
प्रत्येक वेळी एकमेकांना सांभाळून घ्या
वळणावळणावर साथ एकमेकांना द्या
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त जन्मोजन्मी तुम्ही असेच सोबत रहा
Happy Wedding Anniversary
वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
Happy Wedding Anniversary
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कणाकणाने चंद्र वाढतं जातो
तसंच क्षणाक्षणांनी तुमचे नातं फुलत जावो
आणि त्या प्रत्येक क्षणात तुम्हाला एकमेकांची साथ मिळत राहो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी पत्नी होतेस तर कधी आई
कधी बहीण होतेस तर कधी मैत्रीण
माझ्या आयुष्यात येऊन प्रत्येक नात्याचे
प्रेम तू मला दिलेस याबद्दल तुझे आभार.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू सोबत असलीस कि,
मला माझाही आधार लागत नाही,
तू फक्त सोबत राहा,
मी दुसरं काही मागत नाही.
Happy Marriage Anniversary
विश्वासार्हतेची हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृध्दी भरून जावो.
Happy Marriage Anniversary
तुम्ही एकमेकांचे हात धरून असेच संपूर्ण
आयुष्यभर सोबत रहा,
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
Happy Anniversary
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि
आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना
तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे
नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.
तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.
हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू
तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते.
तुमची जोडी खूप सुंदर आहे.
तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे.
हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.
जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट
तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे
प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते.
आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे
आणि हे प्रेम खूप
मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.
विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना.
हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.
तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले की
नात्याची गुरुकिल्ली म्हणजे एकमेकांवरील विश्वास आणि अतूट संबंध.
सर्वात गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू ,
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary…
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे बंध रेषमाचे एका
नात्यात गुंफलेले
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार
तुमचा …लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण
होवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम
!!लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!
साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सोबत असताना आयुष्य किती छान
वाटत,,,,उनाड मोकळ एक रान
वाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळ पान वाटत,,,
कधी बेधुंद कधी बेभान
वाटत, खरच तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत,,नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला सतत प्रेरणा देणारी
Happy Anniversary Darling!!!
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी इच्छा खास
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे,
सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे,
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या अंबराने,
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने,
बागडावे तू नभी, उंच उडावे तू,
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू,
Happy Anniversary Sweetheart!!!
“जन्मो जन्मी च हे नातं असच टिकून राहो ,आंनद आपल्या जीवनात नवीन रंग
भरत राहोप्रार्थना करतो देवाकडे की तुमचं हे नातं असच सुखी राहोलग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.“
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्हां दोघांचा एक स्वप्न खरा झाला…
आज एक वर्ष पूर्ण झाला..
मन अगदी आनंदाने भरून गेला.
जीवनाच्या अनमोल आणि सुंदर क्षणांच्या
आठवणींच्या दिवसाच्या….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जेव्हा सोबती सोबत असतो…
तेव्हा प्रवास सुंदरच होतो.
तुमच्याआयुष्याच्या प्रवासाला
सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला
जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
क्षणा-क्षणाला अशीच
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आणि आनंदाचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हीं या Post मधील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या लोकांची marriage anniversary आहे त्यांना पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.तुम्हीं हा लेख इतरांना पण शेयर करू शकता.