Navra Bayko love Quotes in Marathi
जर तुम्हीं लोक Navra Bayko love Quotes in Marathi हे शोधत असाल तर तुमचा शोध येथे संपेल कारण मी या लेखात सुंदर असे Quotes लिहिले आहेत.नवरा बायकोचं नातं हे गाडीच्या पुढची दोन चाका प्रमाणे असतं ती दोन चाक जशी समान रेषेत चालतात तसे नवरा बायकोचे नाते असले पाहिजे.एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना,आदर, विश्वास असला पाहिजे तरच त्याचं नातं टिकतं.लग्नामध्येच आयुष्यभर एकमेकांना जपण्याची आणि साथ देण्याची वचने घेतली जातात.नवरा बायको दोघांनाही एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.तरच त्यांचा संसार सुखाचा होतो.छोटी मोठी भांडणे झाली तरी चालतात त्यातून पण एकमेकांचा रूसवा काढून प्रेम आणखी बहरते.असेच नवरा बायकोचे प्रेम दर्शवणारे Quotes मी Navra Bayko love Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत.
Navra Bayko love Quotes in Marathi
नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी नवरा एकमेकांचे उत्तम मित्र असतात जर दोघे एकमेकांचा सल्ला घेत असतील तर कोणत्याही संकटावरती त्यांना सहज मात करता येते.
नवरा बायको एकमेकांना इज्जत देत असतील,एकमेकांची किंमत करत असतील तर जगाला त्यांना नाव ठेवायला कोणतीच जागा मिळत नाही.
या जगात सर्वात संवेदनशील नाते कोणते असेल तर ते आहे पती-पत्नीचे. पती पत्नीचे नाते हे सर्व नात्यांचा पाया आहे.
नवरा आणि बायको ही एक टीम आहे दोघेजण सोबत मिळून एक नवे साम्राज्य निर्माण करू शकतात.
आपल्या आयुष्यामध्ये बहिणीची,आईची भुमिका पार पाडणारी दुसरी कोणी नसुन त्याची पत्नी असते.
नवरा आणि बायकोचे नाते हे असेच असते जितके वेळा भांडण असते तितक्याच वेळा प्रेम सुद्धा असते.
नवरा आणि बायकोमध्ये एकमेकांच्या चुका माहित असताना सुद्धा जर तुम्ही चांगले आनंदात जीवन जगत असाल तर यालाच खरे प्रेम म्हणतात.
एकमेकांना प्रोत्साहन देणे, एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांवर प्रेम करणे हेच तर नवरा बायकोचे खरे कर्तव्य आहे.
या जगात लग्नासारखे पवित्र नाते व पवित्र सोहळा दुसरा कोणताच नाही.
चूक नवर्याची असो किंवा बायकोची असो कारण नातं तर दोघांच आहे. कधीकधी दोघांना चूक मान्य सुद्धा करावी लागेल आणि दोघांना तडजोड सुद्धा करावी लागेल.
नवरा बायकोचे नाते असेच असते कितीही भांडले तरी मन भरत नाही आणि कितीही प्रेम केले तरी मन भरत नाही.
कधीकधी नशीब आणि बायको खूप त्रास देते पण ज्यावेळी नशीब आणि बायको साथ देते त्यावेळी आयुष्य स्वर्ग होऊन जाते.
सर्वजण म्हणतात बायको खूप त्रास देते पण कधी कुणी असं म्हणत नाही की ती संकटात साथ पण देते.
पती-पत्नीचं नातं असं निभावल पाहिजे की दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावरील हास्य बनल पाहिजे, मैत्रीच एक उत्तम उदाहरण बनल पाहिजे.
खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा,वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भाग्यात असायला, तू माझ्या आयुष्यात आहेस,यापेक्षा अधिक मला काहीच नको……
जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन.पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेन……दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पहायचा आहे.एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे…….
संसार म्हटला की आल्या कुरबुरी तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही
तुझ्या कवेत मला माझे आयुष्य सारे काढायचे आहे तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
वडिलांनंतर जो आपली काळजी करतो आणि कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही तो असतो नवरा तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी कायम देवाची ऋणी राहीन
तुझ्या कुकंवाशी माझं नात जन्मोजन्मी असावं मंगळसूत्र गळ्यात घालताना तू डोळ्यात पाहून हसावं कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हाती असावा आणि मृत्यूलाही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा
बायको असावी भांडण करणारी असावी हक्काने मारणारी पण असावी नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी
तू खूप प्रेम करतेस म्हणून तुझ्याशी भांडायला आवडते भांडण झाल्यावर तुझा रुसवा काढायला आवडते तू जवळ नसल्यावर तुझी आठवण काढायला आवडते आणि तू जवळ असल्यावर तुला चिडवायला आवडते तुझ्यावर प्रेम करत नाही हे भासवायला आवडते आणि तू जवळ नसल्यावर तुझ्या आठवणीत रडायला आवडते
खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं आज आहे उद्या नाही असं त्यात कधीच नसतं एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून जात नसतं कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं
सखे हातात हात घेशील तेव्हा भिती तुला कशाचीचच नसेल अंधारातील काजवा तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर दिसेल सहवासात तुझ्या आयुष्य म्हणजे नभात फुललेली चांदणरात असेल
मी प्रेम केले तुझ्या अंतकरणावर मी प्रेम केले तुझ्या भोळ्या भाबड्या मनावर मी प्रेम केले तुझ्या काजळी डोळ्यांवर मी प्रेम केले तुझ्या सोनेरी केसांवर मी प्रेम केले तुझ्या रसरशीत ओठांवर मी प्रेम केले तुझ्या सावळ्या देहावर मी प्रेम केले तुझ्या मधुर बोलीवर मी प्रेम केले तुझ्या स्मित हास्यावर
प्रिय नवरोबा मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे
तू हळूच मारलेली मिठी माझा थकवा दूर करते.थकलेल्या मनाला…क्षणात चूर करते..!!
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे श्वासामध्ये लपलेला श्वास तुझा आहे क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,जेणेकरून बायकोरूपी चंचल,आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्रालात्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.
तुझ्याशिवाय मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही. तू सोबत आहेस म्हणून मी जगत आहे. तुझ्याशिवाय संसाराचा विचारही मी करू शकत नाही. तू फक्त सोबत राहा अजून मी काही मागत नाही
अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस, यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे
दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे
नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते आणि मित्रमैत्रिणीनां वाटतं लग्नानंतर ‘ती’ बदलली. कळलं ना तुला तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस ते
आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारी व्यक्ती भेटायला नशीब लागते. नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात ढीगभर पडले आहेत. मी अत्यंत नशीबवान आहे की, तू माझा नवरा आहेस
पाणीदार डोळे तुझे बोलतात खूप काही, ओठांवर शब्द येत नाही पण सांगतात खूप काही, इवल्या इवल्या कारणाने रडतच राही, आहेस तू सुंदर तुझ्यासारखं माझ्यासाठी या जगात दुसरं कुणीच नाही
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल आणि मला कधीच तुझ्यातले दोष शोधण्यात रस नाही.
लोक आपल्याबद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वाचे आहे माझ्यासाठी कारण तू जीव आहेस माझा
रोज रोज गोड बोलून मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला, म्हणून कधीतरी भांडणही करावं लागतं, हस ना आता जरा
एवढ्या जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Navra Bayko love Quotes आवडले असतील तर तुम्हीं comment करून नक्की सांगा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.