Pavbhaji Recipe in Marathi

Pavbhaji Recipe in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वप्रथम मी तुमचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर तुम्ही भेट दिली त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद मानतो.आज मी तुम्हांला Pavbhaji Recipe in Marathi याची माहिती देणार आहे. आपल्या महाराष्ट्रात खाद्य पदार्थांची खूप मोठी परंपरा आहे.अनेक खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रदेशात लोकप्रिय आहेत त्यापैकी एक असा  पावभाजी हा चवीला चविष्ट, मसालेदार असा खूप लोकप्रिय खाद्यपदार्थ महाराष्ट्रात आहे.

 

पावभाजीचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं.पावभाजी हा मसालेदार व्हेज खाद्यपदार्थ आहे.पावभाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करून वापरल्या जातात व त्यांच्या पासून पावभाजी ची भाजी तयार केली जाते आणि ही कशी तयार केली जाते यासाठी मी तुम्हांला Pavbhaji Recipe in Marathi ही मराठी भाषेमध्ये माहिती तुमच्यासाठी तुम्हांला करायला खूप सोपी आणि चवीला चविष्ट अशी पध्दत सांगणार आहे.ही पद्धत वापरून तुम्ही चवीला उत्कृष्ट अशी पावभाजी तयार करु शकाल..Pavbhaji Recipe in Marathi

पावभाजी साठी लागणारे साहित्य

2 मध्यम बटाटे कापलेले
3/4 कप फूलकोबी कापलेली
1/2 कप हिरवे मटर
1‌ मोठा कांदा बारीक कापलेला
1/2 कप कापलेल गाजर
1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
2 टोमॅटो बारीक कापलेले
1/2 कप शिमला मिरची कापलेली
1/4 टीस्पून हळदी पावडर
1 आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर
1 टीस्पून धने जिरे पावडर
1 टीस्पून रेडीमेड पावभाजी मसाला पावडर
मीठ चवीनुसार
1 टीस्पून लिंबाचा रस
2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून बटर
बटर वाढण्यासाठी
2 टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर
पाव

पावभाजी बनविण्याची कृती

• साहित्यात सांगितलेल्या यादी नूसार सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन कपड्याने पुसून घ्या आणि नंतर छोट्या छोट्या तूकडयात कापून घ्या

 

•‌ कापलेले बटाटे,गाजर , फूलकोबी, हिरवे मटर या़नां 2/3 लीटर क्षमता असलेल्या प्रेशर कुकर मध्ये टाका त्यात 1/2 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे.

 

• प्रेशर कुकरचे झाकण बंद करा आणि 2 शिट्यांशाठी गॅसच्या मध्यम आचेवर शिजण्यासाठी ठेवून द्या.2 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा आणि कूकरला थंड व्हायला द्या.जेव्हा सगळं प्रेशर आपल्या आपून निघून जाईल तेव्हा झाकण उघडा.

 

• शिजलेल्या भाज्यांना चांगलं चुरा. तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जास्त चुरा करा.भाजीचं टेस्कचर भाजी चुरण्यावर अवलंबून असते.

 

• एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून बटर मध्यम आचेवर एकत्र गरम करा.कापलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट त्यामध्ये टाका . कांद्याला हळकं गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

 

  • कापलेली शिमला मिरची , कापलेले टोमॅटो आणि मीठ टाका.

 

• टोमॅटो आणि शिमला मिरचीला नरम होईपर्यंत परतून घ्या.

 

•‌ दीड चमचा लाल मिरची पावडर,1/4 टीस्पून हळदी पावडर ,1 टीस्पून धने जिरे पावडर आणि 1 टीस्पून रेडीमेड पावभाजी मसाला पावडर त्यात टाका.

 

• चमच्याने ढवळून 1 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

 

• 3/4 कप पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून ‌ 2-3 मिनटे शिजवून घ्या.

 

• शिजलेल्या भाज्या आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घाला.

 

• चांगल्या प्रकारे मिक्स करून 4-5 मिनटे शिजायला द्या .भाजी थोडी हातावर घेऊन थोडी चाखून बघा आणि वाटल तर मीठ चवीनुसार घाला आणि चांगलं मिक्स करा . गॅस बंद करा . बारीक कापलेली कोथिंबीर त्यात टाकून द्या.
भाजी आता खाण्यासाठी तयार आहे.

 

• सगळ्या पावांना बटर लावून मस्तपैकी तव्यावर परतून घ्या.

 

• भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्या त्यावर बटरचे गानि॔श करा.शेकलेले पाव , कापलेला कांदा आणि लिंबू बरोबर गरम गरम खायला घ्या.

पावभाजी आणखी चांगली होण्यासाठी काही आयडिया

• तुम्हांला जशी भाजी पसंत आहे त्याप्रमाणे तुम्ही शिजलेली भाजी तूमच्या आवडीनुसार स्टेप-4 मध्ये तूंम्ही जास्त किंवा कमी चूरु शकतो.

 

• चवीमध्ये बदल करण्यासाठी तूम्ही तूमच्या आवडीनुसार वांगी , ब्रोकोली ,मका आणखी काही भाज्या टाकू शकता.

 

• भाजीची चव बटरवर अवलंबून आहे म्हणून त्याचे प्रमाण कमी करु नका.

 

• भाजीचा रंग आणखी लाल होण्यासाठी तूम्ही नियमित लाल मिरची पावडर च्या बदल्यात काश्मिरी लाल मिरची पावडरचा वापर करू शकतात.

 

‌ • भाजीचा रंग आणखी गडद होण्यासाठी तूंम्ही भाज्यांबरोबर बीट टाकून शिजवा.

 

• चीज पाव भाजी बनवण्यासाठी, भजीला मोझारेला चीजने सजवा.

पोषण मूल्ये.

एकूण उष्मांक: १०३५.०६ Kcal, मेद: ४२.८४ ग्रॅम,प्रथिने: २१.३५ ग्रॅम,कर्बोदके: १५१.७९ ग्रॅम,लोह: ७.९७ मि. ग्रॅम

 

पावभाजी आरोग्यासाठी चांगली आहे का?

अर्थात पावभाजी हा अतिशय चविष्ट खाद्यपदार्थ आहे , पण त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम तुम्ही किती वेळा खातात यावर अवलंबून असतो. साधारणपणे तुम्ही ऐकले असेलच की पावभाजी आरोग्यासाठी चांगली नसते, जे अगदी बरोबर आहे, कारण त्यात भरपूर लोणी आणि मैदा पाव असतो.

 

तथापि, त्यात भाज्या देखील असतात, ज्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत असू शकतात. परंतु, ते बहुतेक वेळा लोणी किंवा तेलाने शिजवले जाते, ज्यामुळे कॅलरी आणि चरबीचे प्रमाण वाढू शकते. जे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले नाही.  

 

घरी कोणीही बनवणार नाही, पण तुम्ही जर महाराष्ट्रातील असाल तर रस्त्यावरही त्याची चव चाखण्यासाठी आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित स्वरूपात खा.

 

 

 

मी आशा करतो की ही पावभाजीची रेसीपी तुम्हांला आवडलीअसेल .हि पावभाजीची रेसीपी ची चव उत्कृष्ट आहे.तूंम्ही पण करून बघा तुम्हांला पण नक्की आवडेल आणि इतरांना पण सांगा किंवा त्यांना ही रेसीपी शेयर करा.

 

Read More- Chakli Recipe in Marathi

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

More Posts