Shankarpali Recipe in Marathi
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या Blog वर स्वागत आहे.दरवषी॔ आपल्या इकडे एका मागोमाग एक सण येत असतात.मला सगळ्यात दिवाळी हा सण खूप आवडतो.दिवळीत नवीन कपडे,फटाके, आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असा फराळ मिळतो.फराळात चकली, करंजी,शेव, चिवडा, शंकरपाळी असे विविध प्रकार असतात.त्यामध्ये सगळ्यांना आवडते ती शंकरपाळी ही Shankarpali Recipe in Marathi बनवायला खूप सोपी आहे. शंकरपाळी ही खुशखुशीत आणी चवीला रुचकर लागली पाहिजे.आज आपण या post मध्ये Shankarpali Recipe in Marathi मध्ये शंकरपाळी कशी बनवायची याची पध्दत बघणार आहोत.
Shankarpali Recipe in Marathi
खुशखुशीत शंकरपाळी रेसिपी
साहित्य
- अर्धा कप तूप
- अर्धा कप दूध
- पाऊण कप पिठी साखर
- ३.५ कप मैदा
- तेल
कृती
- एक भांडे घ्या त्यात आधी तूप घाला, पिठी साखर, नंतर दुध घाला आणि हे सगळं मिश्रण चांगल ढवळून घ्या आणि मध्यम गॅसच्या आचेवर ३-४ मिनिट चांगले गरम करा. साखर विरघळे पर्यंत चांगली गरम करा आणि नंतर गॅस बंद करा. ( मिश्रणाला उकळी येऊ देऊ नका नाहीतर दुध फाटू शकते )
- आता मैदा घ्या आणि त्या मैद्या मध्ये तूप, दूध, साखरेचे मिश्रण घाला.
- आता या मिश्रणाचा गोळा बनवून घ्या हा गोळा खूप पातळ किवां खूप घट्ट बनवू नका मध्यम गोळा बनवा गोळ्याला थोड्या भेगा पडल्या तरी चालतील पण गोळा मध्यम बनवा.
- हा गोळा बनल्यानंतर एका भांड्यामध्ये मध्ये हा गोळा काढून घ्या आणि एक तास व्यवस्थित झाकून ठेवा.
- एक तास झाल्यानंतर या गोळ्यातून थोडा गोळा काढून लाटायला घ्या लाटायच्या आधी हा गोळा चांगला एकजीव करून घ्या.
- लाटून झाल्यावर शंकरपाळी कापून घ्या आणि त्या तुम्हला पाहिजे तशा आकारात कापून घ्या.जास्त करून चौकोनी आकारात शंकरपाळ्या कापतात.
- शंकर पाळ्या लाटून झाल्यवर एका कढईत तेल ओता व हे तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या.
- तेल मध्यम गरम करा आणि त्यात शंकरपाळ्या टाकून तळून घ्या.
- शंकर पाल्यांना सर्व बाजूने तांबूस रंग येईपर्यंत तळायच्या आहेत तसेच तांबूस रंग येपर्यंत शंकर पाळ्या व्यवस्थित ढवळत राहा.
- २ ते ३ मिनीटांनी शंकर पाळी तांबूस झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्या.
- आता तुमच्या शंकर पाळ्या खायला तयार झाल्या आहेत.
खारी शंकरपाळी रेसिपी
साहित्य
- पाव किलो मैदा
- पाव चमचा हळद
- १ चमचा जिरेपूड
- १ चमचा तिखट
- चवीनुसार मीठ
- २ चमचा डालडा
कृती
- मैदा, जिरेपूड,तिखट, हळद, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवून घ्या.मिश्रणात हवे असल्यास थोडे पाणी घाला.
- तयार पिठाची पोळी थोडी जाडसर लाटा.
- आता शंकरपाळ्या आकारात कापून घ्या.
- आता कढईत तेल टाका.तेल थोडे गरम झाल्यावर त्यात शंकरपाळी सोडा.मंद गॅसच्या आचेवर शंकरपाळी दोन्ही बाजूंनी तळून काढा.
- आता आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत.
गव्हाची शंकरपाळी रेसिपी
साहित्य
- २ वाटी गव्हाचे पीठ
- पाऊण वाटी पिठीसाखर
- तीन चमचे तूप
- अर्धा कप दूध
- वेलची पावडर
- चिमूटभर मीठ
- तेल
कृती
- सर्वप्रथम गव्हाचे पीठ चांगले चाळून घ्या.त्यात मीठ आणि वेलची पावडर मिसळा.
- दूधात पिठीसाखर मिसळून घ्या.पीठात तूपाचे मोहन टाकून चांगले एकजीव करुन घ्या.
- दूध आणि पाणी मिसळत हळूहळू पीठ चांगले मळून घ्या आणि अर्धा तास बाजूला ठेवा.
- नंतर पिठाचे एकसमान गोळे करा आणि गोळे चांगले लाटून घ्या.
- पोळीला शंकरपाळीचा आकार द्या.
- आता कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा.तेल गरम झाल्यावर
- शंकरपाळी टाका.दोन्हीं बाजूंनी शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्या.
- आता आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत.
मेथी शंकरपाळी रेसिपी
साहित्य
- एक वाटी मैदा
- एक चमचा लाल तिखट
- एक वाटी निवडलेली मेथीची भाजी
- अर्धा चमचा हळद
- एक चमचा धणे पावडर
- एक चमचा जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- तेल
कृती
- मेथीची भाजी चांगली निवडून, धुवून बारीक चिरून घ्या
- एका भांड्यात मैदा व्यवस्थित चाळून घ्या.
- मैद्यामध्ये तिखट, हळद, मीठ, धणे पावडर आणि जिरा पावडर मिसळून घ्या.
- तेलाचे गरम मोहन टाकून पिठात मेथीची भाजी मिसळा.
- सर्व घटक एकजीव करत पीठ मळून घ्या.
- पीठाचा गोळा पंधरा मिनीटे झाकून ठेवा.
- पंधरा मिनीटांनी पोळी लाटा आणि शंकरपाळीचे आकार व्यवस्थित पाडून घ्या.
- एका कढईत तेल गरम करा आणि मेथीची शंकरपाळी तळून घ्या.
- आता आपल्या शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत.
जिरा शंकरपाळी
साहित्य
- जिरे दोन चमचे
- मैदा दोन वाटी
- मीठ चवीपुरते
- तेल
कृती
- मैदा चांगला चाळून घ्या.
- जिरे जाडसर दळून मैद्यात व्यवस्थित मिसळा.
- तेलाचे मोहन पीठात टाका आणि एकजीव करा.
- पाणी लावून पीठ घट्ट मळून घ्या.
- पंधरा मिनीटे बाजूला ठेवून पोळी लाटा.
- शंककपाळे पाडून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या.
पट्टी शंकरपाळी
साहित्य
- पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या
- लाल तिखट
- मीठ
- चाट मसाला
- तळण्यासाठी तेल
कृती
- पट्टी सामोसे बनवल्यावर उरलेल्या पट्ट्यांचे तिखटमिठाचे शंकरपाळे करता येतात. असे तिखटमिठाचे शंकरपाळे कधीही खायला बनवता येतात.
- पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व मध्यम आचेवर तेलात तळून काढावे. तळून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे.
- नंतर एका बोलमध्ये घेऊन त्याला तिखट, मिठ, चाट मसाला लावून घ्यावा. हे शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.
मित्रांनो या चारही प्रकारच्या शंकरपाळी रेसिपी तुम्हीं तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि आम्हांला comments मध्ये सांगा आणि तुम्हीं ही शंकरपाळी रेसिपी इतरांना पण शेयर करा.
Read More:- Chakli Recipe in Marathi