Swami Samarth Quotes in Marathi

Swami Samarth Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज आपण दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटात आधार देणाऱ्या Swami Samarth Quotes in Marathi बघणार आहोत.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ऐकल्यावर , वाचल्यावर स्वामी समर्थ डोळ्यासमोर येतात.स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुदेव दत्तांचे अवतार.स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात.स्वामी समर्थांचे भक्तांची त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे.स्वामी समर्थांचे Quotes जीवनाचं खरं महत्त्व समजावून सांगतात.येणाऱ्या प्रत्येक संकटात उभं कसं रहायचं यांचं बळ देतात.नेहमी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या आणि सदैव पाठीशी उभे राहणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे Quotes नक्की वाचले पाहिजेत . म्हणूनच मी या लेखात Swami Samarth Quotes in Marathi लिहिले आहेत.

Swami Samarth Quotes in Marathi

Swami Samarth Quotes in Marathi

हिऱ्यांमुळे जशी दागिण्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते ।। श्री स्वामी समर्थ ।।

आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याची किंमत कधी विसरू नका

अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्यादिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल

भोळा भाबडा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनि कधी ना रिकामा जाई जो आला स्वामी दारी त्याची झोळी सुखाने भरून जाई

ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावली हि सोडेल तुझी पाठ तू घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हाथ

आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट ।। श्री स्वामी समर्थ ।।

जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला ।। श्री स्वामी समर्थ ।।

आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार

श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधी हारु देणार नाही या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही, तझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

श्री स्वामी समर्थ म्हणतात ,अडचणीत असणाऱ्यांचे सहाय्य करा म्हणजे त्याची सोबत मिळेल ।। श्री स्वामी समर्थ ।।

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी ,आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे’

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा!

असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं.

जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे.

मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठिशी आहे.

हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो.

भगवंताशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांडनायकाला असेल. ।। श्री स्वामी समर्थ ।।

जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते।। श्री स्वामी समर्थ ।।

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. ।।श्री. स्वामी समर्थ ।। 🙏

तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. श्री. ।। स्वामी समर्थ ।। 🙏

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. ।। श्री. स्वामी समर्थ ।। 🙏

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो.।।श्री. स्वामी समर्थ ।।

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.।। श्री. स्वामी समर्थ ।।🙏

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी.।।श्री. स्वामी समर्थ ।। 🙏

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका.।।श्री. स्वामी समर्थ ।। 🙏

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे.।।श्री. स्वामी समर्थ ।।🙏

गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.।। श्री. स्वामी समर्थ ।।🙏

नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. ।।श्री. स्वामी समर्थ ।।🙏

संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात. ।। श्री. स्वामी समर्थ ।।🙏

मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही. ।। श्री. स्वामी समर्थ ।। 🙏

कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते.नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते .श्री स्वामी समर्थ

देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत‌ ते अडचणींना सांगी की तुमचा देव किती मोठा आहे‌ स्वामी समर्थ

फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही

उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ

तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणेही माझी जबाबदारी आहे स्वामी समर्थ

कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थिती वरून खिल्ली उडवू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो श्री स्वामी समर्थ

विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात‌ कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते‌ श्री स्वामी समर्थ

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका‌ उत्तम कर्म करत राहा लोकचं तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ

तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे‌ श्री स्वामी समर्थ

कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत स्वामी तर तेव्हा दिसतात‌ जेव्हा कोणीच दिसत नाही श्री स्वामी समर्थ

स्वामीजी या नावातच एक ताकत आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे

भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्ती चे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ

तर मित्रहो आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम Swami Samarth Quotes in Marathi शेअर केलेत. हे Quotes आपण सोशल मीडिया वर स्टेटस म्हणून शेअर करू शकतात.आपणास हे Positivity motivational Swami Samarth Quotes कसे वाटले ते कमेन्ट करून नक्की सांगा. याशिवाय जर आपल्याकडे देखील आणखी काही स्वामी समर्थ सूविचार मराठी असतील तर आम्हांला comment करून सांगा.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts