Swami Vivekananda Quotes in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या भारत देशातील एक महान युगपुरुष, विचारवंत, समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचे विचार, प्रेरणादायक संदेश Swami Vivekananda Quotes in Marathi या लेखातून समजून घेणार आहोत.त्यानी आपले संपूर्ण आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी आणि हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी केला.स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी होते.त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आणि महत्त्वाचे आहे.अशा या थोर व्यक्तीचे विचार आपल्याला Swami Vivekananda Quotes in Marathi या पोस्ट मध्ये वाचायला मिळतील.
Swami Vivekananda Quotes in Marathi
हजार वेळा ठेच लागल्या नंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही,तोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही
जो अग्नी आपल्याला उष्णता प्रदान करतो,तोच अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकतो. यात दोष अग्निचा नाही आहे.
आपण ते आहोत हे आपल्याला विचारांनी बनवले आहे.म्हणून तुम्ही काय विचार करतात याचे भान असू द्या.शब्द दुय्यम असतात. विचार राहता, ते दूरवर प्रवास करतात.
तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात,स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल
जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्वकाही सोपे वाटते,परंतु जेव्हा तुम्ही आळशी असतात तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते.
शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी,अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे.प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
” असं कधीच म्हणू नका की, मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.”
आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय
परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बलवानच बनाल.
या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.
जग हि एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहोत.
अश्या गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोष्टीं विष आहेत असे समजून त्यांचा त्याग करा.
एक विचार घ्या. त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा, त्याची स्वप्ने पहा, आपला मेंदू, स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊद्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे
दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्ती सोबतची बैठक गमावाल
मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा
स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे
स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं करायला, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल
जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत.
सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.
स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.
एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे.
कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
Swami Vivekananda Quotes in Marathi हे Quotes तुम्हीं वाचले असतील तर तुम्हांला ते कसे वाटले ते तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा.