Time Quotes in Marathi

Time Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण या Post मध्ये वेळेचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्यासाठी मी Time Quotes in Marathi हा लेख लिहिला आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणून वेळेचं महत्त्व खूप मोठं आहे.वेळेचा उपयोग आपलं निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी करा, आपल्या स्वप्नांसाठी करा, जीवनात यशस्वी होण्यासाठी करा नाहीतर एकदा Time गेला तर तो परत येत नाही किंवा परत आणताही येत नाही.वेळेला आपल्या श्वासाप्रमाणे जपा म्हणजेच एकही मिनिट निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवू नका.आनंदाने जगायचे असेल तर वेळेची चांगल्या वेळेची किंमत जाणा नाहीतर संपूर्ण आयुष्याची वाट लागू शकते आणि नंतर त्या गोष्टीचा पश्चात्ताप होईल.

Table of Contents

Time Quotes in Marathi

Time Quotes in Marathi

मनात जे काही आहे ते बोलायला शिका वेळेवर नाहीतर आज सांगतो उद्या सांगतो करत वेळ कधीच येणार नाही आणि भरलेली ओंजळ रिती भासेल

अजून वेळ आहे अजून वेळ आहे म्हणत कधी वेळ निघून गेली कळलंच नाय

वेळ ही वेळ असते कधी चांगली तर कधी वाईट असते यश आणि अपयशाची साक्षी असते वेळ ही खरच वेळ असते राजा चे राजेपण आणि गरिबांची गरिबी दाखवणारी वेळच असते असते लहान पण शिकवते मोठे ती पण वेळच असते वेळेसाठी एक वेळ काढावा लागेल तरच कळेल वेळ ही खरच वेळ असते

आता तिलाही उसंत नाही मलाही वेळ नाही जुळविलेल्या गणिताचा कुठलाच मेळ नाही जोडणीत सरले आयुष्य कळले सोपा खेळ नाही आंबड गोड म्हणायाला जगणे काही भेळ नाही सगळेच कसे मनाजोगे तेव्हा आता ती सुवेळ नाही सूर हरवल्यावर ओठातून फुटत साधी शीळही नाही आठवणी मोजत बसलो तर पडत आता पीळ नाही चुकले कळून हातामध्ये उरला आता फार वेळ नाही

आपण वेळेला वेळेवर वेळ दिला की वेळ आपल्याला वेळेवर वेळ देते

अजून वेळ आहे, खूप काही करण्यासाठी स्वतःमधलं सामर्थ्य, सिद्ध करून दाखवण्यासाठी अजून वेळ आहे ,स्वप्नांचा गाव सजवण्यासाठी संकटावर ध्यैर्याने मात करून, त्यांना सामोरं ठाकण्यासाठी अजून वेळ आहे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सृष्टीवर जो मांडलाय विनाशाचा डाव, त्या विनाशाला आळा घालण्यासाठी अजून वेळ आहे, माणसातलं माणूसपण ओळखण्यासाठी न भेद करता माणसा-माणसांमध्ये, माणुसकीचं रोपटं पेरण्यासाठी अजून वेळ आहे, पण तो थांबणारही नाही म्हणूनच गरज आहे आज, त्या वेळेतच सगळं सावरण्याची

जो व्यक्ती आपल्या आयुष्यात वेळेचा योग्य वापर करेल, तोच यश मिळवेल. 

वेळ मोठा आहे पण आयुष्य लहान आहे.

वेळेचा गैरवापर करू नये कारण जेव्हा वेळ हातातून निघून जाते तेव्हा आयुष्य निरर्थक होते.

वेळ फुकट आहे, पण तो अमूल्य आहे.तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही तो वापरू शकता.तुम्ही तो ठेवू शकत नाही, परंतु खर्च करू शकता.एकदा तुम्ही तो गमावला की, तुम्ही तो कधीही परत मिळवू शकत नाही.

योग्य काम करण्यासाठी कधीही पुरेसा वेळ नसतो, परंतु ते पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ लागतो.

एक तास वाया घालवण्याचे धाडस करणाऱ्या माणसाला जीवनाचे मूल्य सापडलेले नाही.

वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहेकारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो,पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही.

वेळेवर झालेल्या गोष्टी या बऱ्या असतात,नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातात

वेळ काढावा तुम्हालाच लागतो,तो काही तुमच्यासाठी काढून मिळत नाही

आपल्या स्वप्नांना योग्य मार्ग दाखवला तर नशीब बदलायला वेळ लागत नाही.

वेळ सगळ्यांना मिळते,श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव ती अजिबात करत नाही

वेळ चांगली असो वा वाईटशब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणंहीच आपली ओळख आहे

पैसा कमवण्यासाठी इतका पैसाही खर्च करु नका,की तो खर्च करायला तुमच्याकडे वेळ राहिलेला नसेल

वाईट वेळ येते ती आपल्याला आयुष्य नव्याने घडवून दाखण्यासाठी

आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईलपण बदललेले लोक कायम लक्षात राहतील

वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरुन जा,पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचेमोल अजिबात विसरु नका

वाईट वेळ सांगून येत नाही,त्याची वाट पाहण्यापेक्षा सकारात्मक राहून कामे करा

चांगली वेळ हवी असेल तर आधी वाईट वेळेला सामोरे जा

आनंदाने जगायचे असेल तर वेळेची चांगल्या वेळेची किंमत जाणा

वेळेनुसार बदला, त्याचे फायदे होऊन आयुष्य सुकर होईल

वेळनुसार बदला, वेळ तुमच्यानुसार बदलेल आणि तुम्हाला चांगले आयुष्य देईल वाईट वेळ आली तर घाबरुन दाऊ नकात्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन धीराने काम करा

एकदा वेळ गेल्यावर ती कधीच परत येत नाही. जो व्यक्ती वेळेतील एखादा तास जरी व्यर्थ घालवत असेल त्या व्यक्तीने अजून जीवनाची किंमत ओळखली नाही.

एक मिनिट उशीर करण्यापेक्षा वेळच्या एक तास आधी पूर्ण करायला शिका.

यशस्वी लोकं आपल्या वेळेचा वापर विचारपूर्वक करतात आणि सामान्य लोकं वेळेचा वापर निरर्थक गोष्टीसाठी करतात.

कालचा दिवस गेलेला आहे, उद्याचा दिवस यायचा आहेआपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे म्हणून तुमच्या कामाला आजच सुरुवात करा.

वेळ ही श्रीमंताला भिकारी आणि भिकाऱ्याला श्रीमंत बनवू शकते

जे लोकं खेळण्यासाठी, चालण्यासाठी वेळ काढत नाही त्यांना मग आजारासाठी वेळ काढावा लागतो.

वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहेकारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो,पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही.

वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा

वेळ आणि वेळेचे गणित कधीच कोणाला कळत नाही,तुम्हालाही कळलं नाही तर चांगले पण कळलेतर त्यााच चांगला उपयोग करणेआपल्या हातात आहे

वेळ हे जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे

वेळ म्हणजेच खरे पैसे होय

जो वेळे ची किंमत करते हे जग त्याची किंमत करते

लक्षात ठेवा वेळ कधीच कोणासाठी थांबत नसतो

Time Quotes in Marathi हे तुम्हांला कसे वाटले ते तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts