Vishwas Quotes in Marathi

Vishwas Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे,विश्वास नसेल तर कोणतंही नातं चांगले बनू शकत नाही, कोणतंही ध्येय साध्य करता येत नाही म्हणून विश्वास हा शुद्ध असला पाहिजे.असेच विश्वास व्यक्त करणारे काही Quotes मी ‌या Vishwas Quotes in Marathi या लेखामध्ये लिहिले आहेत.ते तुम्हीं जरूर वाचा.पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.म्हणून विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे.हे‌ संपूर्ण दुनिया विश्वासावर चालते आहे.

Vishwas Quotes in Marathi

Vishwas Quotes in Marathi

शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते कारण श्वास संपल्यावर जीवन संपतं आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं

प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या ही फिलिंगशी खेळू शकतात

तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे तो एकदिवस विश्वासघात करणारच‌ हे कायम लक्षात ठेवा

न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यां समोर नशीबही हरतं या गोष्टीवर विश्वास ठेवला तर नक्कीच जग जिंकता येतं

जगात सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मरण पावणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास

मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही

मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याने मला शिकवलं की आता कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तरच उंच भरारी मारता येईल

तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करत असतो. त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा सर्व काही नीटच होईल

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. ”मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा आणि आठवणी या चिरंतन आहेत यावर नेहमी विश्वास ठेवा

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा. पण कोणाच्या विश्वासाचा फायदा कधीच घेऊ नये कारण एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका. कारण प्रत्येक माणूस तुमच्या विश्वासाच्या पात्र असतोच असं नाहीत. विश्वासघात झाल्यावर मात्र त्याचा त्रास होतो 

तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करत असतो. त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा सर्व काही नीटच होईल

विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य

विश्वास करणाऱ्या पेक्षा विश्वास तोडणारा मूर्ख असतो कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळील व्यक्तीला गमावतो

“पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

विश्वास ठेवा…… आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असतं. इतकचं की, ते आपल्याला दिसत नसतं.

जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात.

ज्या लोकांवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो , बहुतेक वेळा तीच माणसे आपले डोळे उघडून जातात.

शब्दांवर विश्वास ठेवू नका कारण काही लोकांच्या जीभेवर साखर ठेवलेली असते आणि मनात विष साठलेलं असतं.

विश्वास हा शब्द किती छोटा आहे वाचायला सेकंद लागतो विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस लागतो आणि सिध्द करायला आयुष्य लागते.

विश्वास हा खोडरबरा सारखा असतो तुम्हीं केलेल्या प्रत्येक चूकीबरोबर तो कमी होत जातो.

न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यां समोर नशीबही हरतं या गोष्टीवर विश्वास ठेवला तर नक्कीच जग जिंकता येतं

मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे , खऱ्या मैत्रीवर नेहमी विश्वास राहू दे

जीवनात खर बोलून मन दुखावले तरी चालेल. मात्र खोटे बोलून कोणालाही कोणताच आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्याचे आयुष्य असते ते फक्त तुमच्या विश्वासावर

विश्वास” आणि “प्रेम” जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत

फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्या पक्ष्याचा फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखावर विश्वास असतो.

हरवलेला हिरा पुन्हा मिळेल पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही

विश्वास ठेवा जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा देव ही आपल्या साठी कुठेतरी काही चांगलं करत असतो

विश्वास हा स्टिकरसारखा असतो दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही

जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाहीस्वतःवर विश्वास ठेवा चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Vishwas Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

More Posts