Women’s Day Quotes in Marathi

Women's Day Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज आपण या post मध्ये Women’s Day Quotes in Marathi लिहिले आहेत.स्त्री आहे म्हणून हे जग आहे तिच्यामुळेच या जगाची उत्पत्ती आहे.तिच्याच मूळे आपल्याला एक बहिण,एक आई, एक पत्नी यांचे प्रेम मिळते.ज्या आई मूळे आपला या जगात जन्म झाला ती पण एक स्त्रीच आहे.ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,आणि केवळ ती आहे,म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे.तिच्यावरच या संपूर्ण विश्वाचे अस्तित्व टिकून आहे.अशा या महान स्त्रियांना मानवंदना देण्यासाठी आपण दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो.या दिवशी आपण स्त्रियांचे आभार व्यक्त करतो,त्यांनी केलेल्या त्यागाचे,प्रेमाचे, शौर्याचे आपण कौतुक करतो.

आजच्या काळातील प्रत्येक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे.अशा या महिलांना आपल्याला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांच्या बद्दल थोडंफार लिहिले पाहिजे.असे सुंदर Quotes मी Women’s Day Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत.

Women's Day Quotes in Marathi

Women’s Day Quotes in Marathi

ती आहे म्हणून सारे विश्व आहे,ती आहे म्हणून सारे घर आहे,ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,आणि केवळ ती आहे,म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…Happy Women’s Day!💐💐🎉

आईच्या आईपणाला शुभेच्छा…बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा…मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्छा.माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐💐🎉🎉

स्त्री असते एक आई,स्त्री असते एक ताई,स्त्री असते एक पत्नी,स्त्री असते एक मैत्रिण,प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान.महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐🎉

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐🎉🎉

महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!💐💐🎉

ती प्रत्येक वेदना विसरणारी,नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,ती शक्ती आहे एक नारी.

स्री म्हणजे वास्तव्य,स्री म्हणजे मांगल्य,स्री म्हणजे मातृत्व,स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.💐💐🎉

स्त्री मध्ये असते शक्ती अपार,स्त्री आहे या सृष्टीचा आधार,करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार.

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.💐💐🎉

रात्री रस्त्यावरुन जाणारी प्रत्येक मुलगी,ही संधी नसून जबाबदारी आहे.माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला,जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐

जी नेहमी करते केवळ त्याग,दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,मग तिलाच का केवळ त्रास,जगू द्या तिलाही अधिकाराने,करा तिचा सन्मान.महिला दिनाच्या शुभेच्छा.💐💐

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.

ती आहे म्हणून हे विश्व आहे.ती आहे म्हणून घराला घरपण आह.ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐

जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.”

“तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”

“तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”💐💐💐

आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”💐💐💐

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!💐💐🎉

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,सुखी ठेव तिला,जिने जन्म दिलाय मला…जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई🙏🌹🌹🙏

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई🙏🏻🙏🏻💐💐

तुच सावित्री, तुच जिजाई.. तुच अहिल्या, तुच रमाई..!जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🙏💐💐

मातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व.या तिन्ही गुणांचा संगम असलेली,निसर्ग दत्त देणगी लाभलेली महान शक्ती म्हणजे नारी शक्ती…जागतिक महिला दिननिमित्त सर्व माता- भगिनिंना हार्दिक शुभेच्छा.💐💐🙏

स्मरण त्यागाचे स्मरण शौर्याचे स्मरण ध्यासाचे स्मरण स्त्री पर्वाचे..!जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..!🙏🙏💐

एका स्त्री ची जबरदस्त इच्छाशक्ती जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य उध्वस्त करू शकते,हे राजमाता आई जिजाऊंनी अख्ख्या जगाला दाखवले.जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..💐💐🙏

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई🙏💐💐

ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🙏💐💐

आई नसेल तर मुलं पोरकी होतात पण खूप कमी लोकांना माहीत असेल अशा पोरक्या झालेल्या बाळांवरही आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची बरसात करतच असते.

आई तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला. तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 💐💐🙏

तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा💐💐💐

यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐🙏💐

पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐

महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐

तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.💐🙏🙏💐

विधात्याच्या नवनिर्माणाची कला कृती तू एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची किती पण पूजा करा, नवरात्रीचा अखंड उपवास करा, पण घरातील स्त्रीला आदर नाही दिला तर सर्व काही व्यर्थ आहे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐

नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर सोबत करणाऱ्या “ती”ला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐🙏💐

स्त्री म्हणजे एक खडतर वाट….अश्यक्य ते शक्य करून दाखविणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी जी बदलेल समाजाची वहिवाट..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐💐

स्त्री एक व्याख्या कधीही कुणास न समजलेली कधीही कुणास न उमगलेली कधीही कुणास न जाणवलेली जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐🎉

जन्मा येण्याचं कारण तू नात्यांमधील गुंफण तू आजच्या युगाची प्रगती तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🎉💐💐💐

दुःख असुनही दाखवायचं नसतं…….मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं….अशा माझ्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐🙏

“मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम स्त्री मध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎉

“इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला,जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला,अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान कायम करा अशा स्त्रीचा सन्मान Happy Women’s Day!”💐💐

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला या Women’s Day Quotes in Marathi कशा वाटल्या त्या तुम्हीं comment करून कळवा आणि इतरांना पण शेयर करा जेणेकरून ते लोक पण त्या दिवशी आपल्या सोशल नेटवर्कर साईटवर या शुभेच्छा स्टेटसला ठेवू शकतात.आणि घरातील महिलांना या शुभेच्छा पाठवू शकतात .

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts