Karma Quotes in Marathi

Karma Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज या लेखामध्ये तुम्हांला Karma Quotes in Marathi हे Quotes वाचायला मिळतील.माणसाचे जीवन हे कर्मावर अवलंबून आहे.कर्म केले तरच फळ मिळते चांगले कर्म केले तर चांगले आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते.तुम्हीं ही म्हण लहानपणापासून ऐकलीच असाल‌ “जे पेरले तेच उगवेल!” हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम आहे.

Table of Contents

माणसाने कर्म करणे जरूरी आहे.या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे.या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवाचा जन्म कर्म करण्यासाठीच झाला आहे.कर्माच्या नियमांनुसार माणसाने देवाचे नाही तर स्वतःच्या वाईट कर्मांचे भय बाळगावे. कारण देव तुम्हांला क्षमा करू शकतो.पण तुमची वाईट कृत्ये तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात.असे काही कर्माविषयी Quotes मी Karma Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत ते तुम्हीं जरुर वाचा.

Karma Quotes in Marathi

Karma Quotes in Marathi

जर तुम्हांला यशस्वी व्हायचे असेल……तर तुम्हांला तुमच्या कर्माची चिंता करावी लागेल…..फळाची नाही.

आपले कर्मच आपली ओळख आहे…..नाहीतर एकाच नावाचे‌ करोडों माणसे आहेत.

उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच.

आयुष्य संपल्यावर देव तुमचा धर्म बघणार नाही तर तुमचे कर्म बघेल.

जसे कर्म तसे फळ

मनुष्य हा कर्माने महान ठरतो धर्माने नाही.

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे…..त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले कर्म करत राहा‌….वाईट गोष्टी स्वतःहून किनाऱ्याला लागतील

जर तुम्हीं धर्म कराल तर तुम्हांला देवाकडून मागावे लागेल आणि जर तुम्हीं कर्म कराल तर देवाला तुम्हांला द्यावे लागेल.

परमेश्वरापेक्षा कर्माची भीती बाळगा एकवेळ परमेश्वर तुम्हांला माफ करेल पण कर्म माफ करणार नाही.

मनुष्य जन्मतः कधीच भाग्यवान नसतो त्याचे नशीब कर्माने घडते.

जे पेराल तेच उगवेल हेच कर्माचं फळ आहे आपण जसे वागू तसेच आपल्या सोबत घडत जाईल.

लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्हीं त्यावर कसा प्रतिसाद देतात हे तुमचे कर्म आहे.स्वता:वर विश्वास ठेवा स्वतःचे कर्म चांगले ठेवा.

मित्रांनो चांगले काम कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका योग्य वेळ आल्यानंतर ते आपल्याला आपोआप मिळतच असते.

कर्म हे रबरा सारखे असते जितके तुम्हीं ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते म्हणून चांगले कर्म करत राहा तुमच्याकडे फिरून चांगलेच येईल.

ब्रम्हांडात कोणताही नियम बदलू शकतो हे खरं आहे.मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

वेळेची वाट पाहा.कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच याच जन्मात मिळणार हे नक्की.

चांगले कर्म केल्याने बाकी काही असो या नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते.

तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.

कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका.

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते, मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव आणि कर्मच ठरवतो.

मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही

आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो.

आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील.

तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका. कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते.

आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल.

फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेत खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म.

कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.

कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे

फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते

जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही.

कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे Karma Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं comment करून आम्हांला नक्की कळवा आणि इतरांना पण हे शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts